Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

4 वर्षांत पुन्हा वैश्विक महामारी येण्याची शक्यता; या अब्जाधिशाचं भाकीत, कोरोनाची भविष्यवाणी ठरली होती खरी

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी जागतिक आरोग्यासंदर्भात मोठं भाकीत केलं आहे. येत्या ४ वर्षांत आणखी एक साथीचा आजार येण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 28, 2025 | 04:37 PM
4 वर्षांत पुन्हा वैश्विक महामारी येण्याची शक्यता; या अब्जाधिशाचं भाकीत, कोरोनाची भविष्यवाणी ठरली होती खरी

4 वर्षांत पुन्हा वैश्विक महामारी येण्याची शक्यता; या अब्जाधिशाचं भाकीत, कोरोनाची भविष्यवाणी ठरली होती खरी

Follow Us
Close
Follow Us:

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी जागतिक आरोग्यासंदर्भात मोठं भाकीत केलं आहे. येत्या ४ वर्षांत आणखी एक साथीचा आजार येण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे, वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही भीती व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्याने जगाची चिंता वाढवली आहे.

भारताने पुन्हा बजावली ‘विश्वबंधुची’ भूमिका; इराकला केली ‘ही’ मोठी मानवतावादी मदत

“पुढील चार वर्षांत साथीचा आजार येण्याची शक्यता १० ते १५ टक्के आहे. बील गेट्स यावर ठामपणे आपलं मत व्यक्त केलं आहे. आपण गेल्या वेळेपेक्षा अधिक तयार आहोत, असा विचार करणं चांगलं आहे. प्रत्यक्षात मात्र आपली अजून तेवढी तयारी झालेली नाही. जगात पुन्हा एकदा कोरोनासारखी परिस्थिती निर्माण झाली तर त्याच्याशी लढण्यासाठी आपण खरोखरचं तयार नाही. जागतिक महामारी आली तर त्याच्याशी लढण्यासाठी आपण तयार नाही, असं म्हणत त्यांनी आरोग्य सुविधांविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

बिल गेट्स गेल्या अनेक वर्षांपासून वैश्विक महामारीसंदर्भात सातत्याने भाष्य करत आहेत. जगातील साथीचे आजार आणि त्यापासून मानवाला असलेला धोका यासंदर्भात जनजागृती करत असतात. 2015 साली टेड टॉकमध्ये बोलताना बिल गेट्स यांनी एक वक्तव्य केले होते. त्यावेळी बिल गेट्स यांनी जग हे मोठा साथीचा आजार आल्यास तयार नसल्याचं म्हटलं होतं आणि त्यांचं हे भाकीत खरं ठरलं, 2019 साली कोरोनाची साथ आली, या महामारीत संपूर्ण जग हादरून गेलं होतं . कोरोनाच्या महामारीत तब्बल 7 लाख लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे अशा साथीच्या आजारांशी लढण्यासाठी आपल्याकडे कोणत्या साधनांची कमतरता आहे याबाबत जगातील सर्व देशांनी एकमताने निर्णय घेतले तर अनेक अडचणी दूर होतील. मात्र, जगातील बहुतांश देश जुन्या चुकांची पुनरावृत्ती करत असल्याचं बिल गेट्स यांनी म्हटलं आहे.

एलॉन मस्क यांच्या राजकीय प्रभावाने बिल गेट्स आश्चर्यचकित; म्हणाले…

GB सिंड्रोमचे पुण्यात १०१ रुग्ण

मागील अनेक दिवसांपासून राज्यात गुलियन बॅरे सिंड्रोमचे (GBS) या दुर्मिळ आजारांचे रुग्ण आढळत आहेत. यामुळे सर्वांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. GBS च्या रुग्णात वाढ झाली आहे. पुण्यामध्ये या आजाराचे अधिक रुग्ण आढळत आहेत. शहरात गुइलेन बॅरी सिंड्रोम या आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्येने शतक ओलांडले असून  १०१ रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान या आजाराबाबत एसओपी लवकरच सादर केली जाणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस यांनी या आजाराबाबत आढावा घेतला आहे.  ६२ रुग्ण पुणे ग्रामीण, १९ रुग्ण पुणे महापालिका, १४ रुग्ण पिंपरी चिंचवड महापालिका आणि ६ रुग्ण इतर जिल्हयातील आहेत. त्यामध्ये ६८ पुरुष व ३३ महिला आहेत. यापैकी १६ रुग्ण व्हेन्टीलेटरवर आहेत. रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे दिसून येत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Bill gates predicts chance of new pandemic coming in next 4 years like covid 19

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2025 | 04:33 PM

Topics:  

  • Corona Virus

संबंधित बातम्या

Covid-19 Cases: कोरोनारूपी राक्षस वाढतोय? 6 महिन्यात तब्बल120 मृत्यू; बाधितांचा आकडा पोहोचला…
1

Covid-19 Cases: कोरोनारूपी राक्षस वाढतोय? 6 महिन्यात तब्बल120 मृत्यू; बाधितांचा आकडा पोहोचला…

IISER Pune: रंग बदलून सांगेल संसर्ग आहे की नाही; IISER पुण्याची क्रांतिकारी शोधपद्धत
2

IISER Pune: रंग बदलून सांगेल संसर्ग आहे की नाही; IISER पुण्याची क्रांतिकारी शोधपद्धत

Corona Update: आरोग्यमंत्र्यांचे कोरोनाबाबत भाष्य; म्हणाले, “रुग्णसंख्येत वाढ होतेय, मात्र…”
3

Corona Update: आरोग्यमंत्र्यांचे कोरोनाबाबत भाष्य; म्हणाले, “रुग्णसंख्येत वाढ होतेय, मात्र…”

Corona Update : सावधान! कोरोनाचा होतोय देशभरात विस्तार; सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजारांच्या पार
4

Corona Update : सावधान! कोरोनाचा होतोय देशभरात विस्तार; सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजारांच्या पार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.