एलॉन मस्क यांच्या राजकीय प्रभावाने बिल गेट्स आश्चर्यचकित; म्हणाले... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: टेस्ला आणि स्पेसएक्स कंपनीचे मालक एलॉन मस्क सध्या कोणात्या ना कोणत्या विषयावरुन चर्चेचा विषय बनत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मैत्रीनंतर मस्क अनेक वेळा चर्चेचा विषय बनले आहे. एकीकडे पाकिस्तान मस्क यांच्यावर संतापलेला असून दुसरीकडे मायक्रोसॉफ्टचे सीईओ बिल गेट्स यांनी देखील मस्क यांच्या राजकीय भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केले आहे. गेट्स यांनी अमेरिकेला होणाऱ्या सांभाव्य धोक्यांबद्दलही आपले मत मांडले आहे.
अमेरिकच्या सामाजिक घटनांवर नकारात्मक परिणाम
बिल गेट्स यांनी एका अमेरिकन वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत एलॉन मस्क यांच्या अमेरिकेच्या राजकारणात त्यांच्या मध्यस्थीमुळे होणाऱ्या बदलांवर भाष्य केले आहे. मस्क यांचे अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नंट एफिशियन्सीत लक्ष केंद्रित केले आहे. गेट्स यांनी अमेरिकेच्या महत्त्वाच्या जागतिक आरोग्य उपक्रमांना होणाऱ्या सांभाव्य धोक्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेचा सरकारी खर्च कमी करता यावा यासाठी एलॉन मस्क अनेक पावले उचलत आहे. मात्र, यामध्ये असलेल्या काही योजनांमुळे अमेरिकेच्या सामाजिक घटानांवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असल्याचे बिल गेट्स यांनी म्हटले आहे.
DOGE टास्क फोर्सवरील गेट्स यांचे विचार
इंग्रजी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बिल गेट्स यांनी मस्क यांच्या DOGE टास्क फोर्सद्वारे सरकारी खर्च कमी करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. सरकारी तुटीवर नियंत्रण मिळवण्याचे महत्त्व त्यांनी मान्य केले असून म्हटले आहे की, “सरकारी तुटीला कमी करणे गरजेचे आहे, कारण भविष्यात हे आपल्या आर्थिक स्थिरतेसाठी मोठा धोका ठरू शकते.”
बिल गेट्स यांनी बजेट कपातीसाठी संतुलित दृष्टिकोन ठेवण्याची गरज अधोरेखित करत त्यांनी HIV उपचारांसाठी सुरू असलेल्या योजनांसारख्या आरोग्यविषयक कार्यक्रमांना निधी मिळत राहावा, यावर भर दिला आहे. मात्र, गेट्स यांनी “जर अशा कार्यक्रमांना निधी देणे थांबवले, तर अनेकांचा जीव जाईल. तसेच, आफ्रिका आणि इतर गरजू भागांमध्ये अमेरिका आणि तिच्या धोरणांविरोधात नकारात्मक भावना निर्माण होऊ शकतात.” असेही स्पष्ट केले आहे.
मस्क यांचा राजकीय प्रभाव
बिल गेट्स यांनी एलॉन मस्क यांच्या अमेरिकेतील राजकीय हस्तक्षेपामुळे आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांनी युरोपमधील राजकारणात मस्क यांच्या सक्रियतेकडे लक्ष वेधले आहे. गेट्स यांनी मस्कच्या राजकीय भूमिकेची तुलना ‘लोकप्रिय आंदोलनां’शी केली आहे. गेट्स यांनी जर्मनीतील अल्टरनेटिव फॉर जर्मनी (AFD) यासारख्या दक्षिणपंथी पक्षांना मस्क समर्थनाचाही उल्लेख केला.
त्यांनी परदेशी निवडणुकांवर प्रभाव टाकणाऱ्या श्रीमंत व्यक्तींच्या भूमिकेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. गेट्स यांच्या मते, सरकारच्या कठोर उपाययोजनांमुळे जागतिक स्तरावर अमेरिकेविरुद्ध नकारात्मक भावना वाढू शकतात, ज्याचा समाजावर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे.