लंडन : मॅसी ग्रॅटनने भाड्याचे घर सोडले आहे. ती शेजारच्या कुटुंबासह स्थलांतरित झाली आहे. तिने कॉलेजला जाणे बंद केले आहे. ऑनलाइन क्लास घेते. किमान ३-४ नोकऱ्या करते. प्रथम किराणा दुकानात, तिथून इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, मग रात्री पबमध्ये काम करते. असे असूनही, इंग्लंडमध्ये आपला खर्च भागवू शकेल याची तिला खात्री नाही. ग्रॅटन एकटी नाही.
इंग्लंडमधील (England) मध्यमवर्गाला महागाईचा (Inflation) तीव्र फटका बसला आहे. कोरोनानंतर (Corona) जेव्हा बाजार उघडले तेव्हा महागाई अनेक पटींनी वाढली, पण पगार वाढला नाही. वीज बिल (Light Bill) २० पट, घरभाडे (House Rent) ४ पट, सार्वजनिक वाहतूक (Public Transport) २.५ ते ३ पट आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तू दुपटीने महाग झाल्या आहेत.
परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, गेल्या वर्षभरात ३४ लाख लोकांनी देश सोडला आहे. असा अंदाज आहे की पुढील एका वर्षात आणखी ४५ लाख लोक ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसारख्या कमी खर्चिक देशांमध्ये जातील. लोक रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करत आहेत.
ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थेत परिचारिकांची कमतरता आहे. कमी पगारामुळे त्यांना इतर उद्योगांकडे वळावे लागत आहे. परिणामी असे ६० टक्के रुग्ण रुग्णालयात अडकले आहेत. एव्ही हरग्रेव्हज घरभाडे देऊ शकत नाही. त्यामुळे ती आई-वडिलांकडे गेली आहे. अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनीही कार्यालयात येणे बंद केले आहे. ते घरून काम करत आहेत. लिव्हिंग वेज फाउंडेशनच्या संचालिका कॅथरीन चॅपमन म्हणतात, इंग्लंडमधील ६० टक्के तरुण सध्या अत्यंत कमी वेतनावर काम करत आहेत. देशात चलनवाढ ४० वर्षांतील उच्चांकावर आहे. अमेरिका आणि इतर युरोझोन देशांपेक्षा इंग्लंडमध्ये महागाई सर्वाधिक वेगाने वाढली आहे.