
Pune ST Mahila Samman Yojana 2026, Women 50 Percent Discount Pune ST,
Pune ST Mahila Samman Yojana 2026 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसमध्ये महिला सन्मान योजनेअंतर्गत महिला प्रवाशांसाठी ५० टक्के सवलत देण्यात येते. पुणे एसटी विभागात या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, २०२५ मध्ये ३ कोटी १३ लाख महिलांनी याचा लाभ घेतला आहे. जानेवारी २०२६ मध्ये २२ लाख ७८ हजार महिलांनी या योजनेअंतर्गत प्रवास केला आहे. एकूण तेरा महिन्यांत पुणे एसटी विभागातून ३ कोटी ३६ लाख महिलांनी एसटीने सुसाट प्रवास केल्याची नोंद झाली आहे.
Purandar Airport: पुरंदर भूसंपादनाबाबत नवा वाद; शेतकऱ्यांचा जिल्हा प्रशासनावर गंभीर आरोप
महिला सन्मान योजनेद्वारे महिला प्रवाशांना राज्याच्या हद्दीत सर्व प्रकारच्या (साधी, निम-आराम, शिवशाही इ.) बसमध्ये निम्प्या दरात प्रवास करता येतो. ही योजना १७ मार्च २०२३ पासून संपूर्ण महाराष्ट्रात लागू केली आहे. २०२५ मध्ये महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून पुणे एसटी विभागाला १ अब्ज २० कोटी ९५ लाख उत्पन्न मिळाले. तर जानेवारी २०२६ मध्ये ११ कोटी १७ लाख ७१ हजार उत्पन्न मिळाले आहे. एकूण या तेरा महिन्यांत तब्बल १ अब्ज ३२ कोटी १२ लाख ६६ हजार इतके उत्पन्न मिळाले आहे. एकंदरच या आकडेवारी वरून महिला सन्मान योजनेची लोकप्रियता दिसून येते. विशेषः ग्रामीण भागातील महिला या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत. ही योजना अंमलात आल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातच महिलांचा प्रवास हा सुसाट झाल्याचे बोलले जात आहे.
पुणे एसटी विभागाला १ अब्ज २० कोटी ९५ लाख उत्पन्न मिळाले. तर जानेवारी २०२६ मध्ये ११ कोटी १७ लाख ७१ हजार उत्पन्न मिळाले आहे. एकूण या तेरा महिन्यांत तब्बल १ अब्ज ३२ कोटी १२ लाख ६६ हजार इतके उत्पन्न मिळाले आहे. एकंदरच या आकडेवारी वरून महिला महिला सन्मान योजनेअंतर्गत गेल्या तेरा महिन्यात ३ कोटी ३६ लाख महिलांनी एसटीतून प्रवास करून पुणे एसटी विभागाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. सुरक्षित आणि सवलतीच्या दरात प्रवासासाठी जास्तीत जास्त महिलांनी एसटीने प्रवास करावा. – अरुण सिया, विभाग नियंत्रक, पुणे एसटी विभाग
रोहोकडी परिसरात कांदा काढणीला वेग; मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजा संकटात
सर्व महिलांना ५०% तिकीट भाड्यात सूट
सर्व प्रकारच्या बसेस (ग्रामीण आणि शहरी) महाराष्ट्रातील सर्व महिला (वयस्कर, तरुण) यांना प्रवास करता येतो
१७ मार्च २०२३ पासून महिला सन्मान योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. सवलतीसाठी आधार कार्ड किंवा तत्सम सरकारी ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे
महिलांना सुरक्षित आणि परवडणारी सार्वजनिक वाहतूक सेवा पुरवणे हा या योजनेचा उद्देश आहे.
राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या महिला सन्मान योजनेला २०२५ या वर्षात प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. वर्षभरात ३ कोटींहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून, एकूण १२० कोटींहून अधिक रुपयांचे उत्पन्न/वितरण झाले आहे.
| महिना | लाभार्थी संख्या | उत्पन्न / वितरित निधी (₹) |
| जानेवारी | ७०,७३,६९९ | ९,२६,१७,८६१ |
| फेब्रुवारी | २०,१०,८६६ | ९,२३,७४,७७० |
| मार्च | १८,४८,७१४ | ९,४७,५३,५१२ |
| एप्रिल | २२,६९,७३० | १०,३२,९२,५५२ |
| मे/जून | २४,०४,५०७ | १२,२४,३८,०८५ |
| जुलै | २२,१३,८९३ | ९,९९,७८,५६४ |
| ऑगस्ट | २१,६२,६१४ | ९,२३,१९,१७१ |
| सप्टेंबर | २३,८६,३६९ | १०,४४,१५,४७३ |
| ऑक्टोबर | २१,१७,७२३ | ८,५०,४१,०८९ |
| नोव्हेंबर | २२,७३,७०९ | १०,६७,५३,७३३ |
| डिसेंबर | २२,२६,६८१ | १०,५०,६८,९४४ |
| अतिरिक्त | २३,३५,२९३ | ११,४५,१३,६४० |
| एकूण | ३,१३,२३,७९८ | १,२०,९४,९५,११८ |