China deploys 6 nuclear subs near Taiwan escalating tensions
बीजिंग/तैपेई : आशियाई खंडात पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटताना दिसत आहेत. चीनने पिवळ्या समुद्रात सहा अणु पाणबुड्यांची तैनाती केल्याची माहिती गुगल मॅप्सवरील छायाचित्रांद्वारे समोर आली आहे. या हालचालीमुळे तैवान आणि जपानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सुरक्षा विश्लेषकांचे म्हणणे आहे की ही पाणबुडी तैनाती चीनकडून तैवानला पूर्णपणे वश करण्याचा प्रयत्न असून जपानलाही थेट इशारा देण्याचे माध्यम आहे.
गुगल मॅप्सवरील प्रतिमांनुसार, चीनने ही पाणबुड्या किंगदाओ बंदरापासून केवळ १८ किमी अंतरावर समुद्राच्या मध्यभागी तैनात केल्या आहेत. यामध्ये प्राणघातक टाइप 091, दोन 093A, एक अज्ञात पाणबुडी आणि आणखी एक 092 प्रकारची अणुऊर्जेवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी यांचा समावेश आहे. या हालचालीमुळे तैवान आणि जपानला एका झटक्यात उद्ध्वस्त करण्याचा चीनचा उद्देश स्पष्ट होत असल्याचे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 15 वर्षांनंतर ढाकामध्ये एकत्र येत आहेत भारताचे दोन शत्रू; पाकिस्तान-बांगलादेश संबंधात नव्या समीकरणांची सुरुवात?
अलीकडेच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जपानला उघड इशारा देताना म्हटले होते की, “जपानने हिरोशिमा विसरू नये, कारण आम्ही त्याहून मोठे नुकसान करू शकतो.” जपान सतत तैवानच्या बाजूने उभा राहत असल्यामुळे चीनचा रोष अधिकच तीव्र झाला आहे. चीनचे मत आहे की तैवान हा त्यांचा भाग असून, तिथले सरकार बेकायदेशीर आहे.
चीनने पापुआ न्यू गिनीपासून सामोआपर्यंत युद्धनौकांची रचना करून संपूर्ण प्रशांत महासागरात 3,000 किलोमीटरचा वेढा तयार केला आहे. या पावसामुळे अमेरिका, जपान आणि इतर सहयोगी देशांकडून तैवानकडे सैन्य किंवा युद्धसाहित्य पोहोचवण्याचा मार्ग बंद करण्याचा उद्देश असल्याचे बोलले जात आहे. यासाठी चीनने केवळ अणु पाणबुड्याच नव्हे तर मोठ्या नौदल जहाजांचीही तैनाती केली आहे, जी वेळ पडल्यास क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये सामील होऊ शकतात.
तैवानने अलीकडेच समुद्रात चीनविरुद्ध सामरिक हालचाली केल्या, त्यानंतर चीनने तैवानभोवती आपला सैन्यकवच उभारले. याशिवाय जपानकडून सतत तैवानच्या बाजूने समर्थन दिले जात असल्याने चीनने आता दोघांविरुद्ध थेट युद्धाची तयारी सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत. चीनचे म्हणणे आहे की तैवान आणि जपान हे अमेरिका व सहयोगी देशांवर खूप अवलंबून आहेत. त्यामुळे युद्ध झाले तर तयार राहा – सर्वांत मोठा फटका तुम्हालाच बसेल, असा संदेश बीजिंगकडून सातत्याने दिला जात आहे.
चीनच्या या हालचालींमुळे जागतिक भू-राजकीय स्थितीत मोठा उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाश्चिमात्य देश, विशेषतः अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन यांचे लक्ष आता पुन्हा एकदा आशियाकडे वळले आहे. जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर, चीनच्या या अणु पाणबुडी तैनातीला युद्धपूर्व तयारीचे स्वरूप असल्याचे सांगितले जात आहे. जगाच्या सुरक्षेसाठी आता हा विषय संयुक्त राष्ट्रसंघाच्या पटलावरही चर्चेचा विषय होऊ शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जगातील सर्वात शक्तिशाली देशांची यादी जाहीर; पाहा भारत कोणत्या स्थानी?
चीनची ही आक्रमक पावले स्पष्टपणे सूचित करतात की तैवान आणि जपानविरुद्ध निर्णायक टप्प्यावरचा सामना लवकरच घडू शकतो. या पार्श्वभूमीवर जगाने या संघर्षाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा, या संघर्षाचे पडसाद संपूर्ण जगावर उमटू शकतात, आणि एक नव्या शीतयुद्धाचा प्रारंभ होऊ शकतो.