Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गलवानमध्ये जखमी सैनिकाच्या हाती ऑलिम्पिक मशाल देण्यामागे चीनचा राजकीय डाव, भारताला उसकवण्याचा प्रयत्न

भारतीय सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत जखमी झालेल्या लष्करी अधिकाऱ्याला ऑलिम्पिकसाठी ( Winter Olympics 2022) मशाल वाहक बनवण्याच्या चीनच्या (India -China Relation) निर्णयाचा अमेरिकन सिनेट फॉरेन रिलेशन कमिटीच्या एका सर्वोच्च खासदाराने निषेध केला आहे. जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात (Galwan Valley) भारतीय सैन्यासोबत झालेल्या हिंसक चकमकीत गंभीर जखमी (Injured Chinese Soldier Became Olympic Torch Bearer) झालेला चिनी सैन्याचा रेजिमेंटल कमांडर बीजिंग गेम्समध्ये मशालवाहक बनला आहे.

  • By साधना
Updated On: Feb 03, 2022 | 01:04 PM
olympic flame in the hands of injured chinese soldier

olympic flame in the hands of injured chinese soldier

Follow Us
Close
Follow Us:

चीन (China) सातत्याने भारताला उसकावण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरू असलेल्या तणावादरम्यान चीनने पुन्हा कोणते चुकीचे पाऊल उचलले तर परिस्थिती बिघडू शकते. चीनने बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकला राजकीय रंग दिला आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीचे रेजिमेंट कमांडर क्यूई फैबाओ हे ऑलिम्पिक (Winter Olympics 2022) रिले दरम्यान मशालवाहक (Injured Soldier Became Olympic Torch Bearer) म्हणून दिसत आहेत. भारतासोबत गलवान व्हॅली (Galwan Valley) सीमेवर झालेल्या चकमकीत फैबाओच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे चीनच्या या कृत्याने भारतीय सैनिकासोबत (India China Relation) संघर्ष झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

[read_also content=”२०२४ पर्यंत आम्ही चौकशीचा ससेमिरा सहन करु, “कुछ मिला क्या?” केंद्रीय तपास यंत्रणेवरुन संजय राऊतांची भाजपावर जोरदार टिका https://www.navarashtra.com/india/until-2024-we-will-endure-the-interrogation-sasemira-did-you-find-anything-sanjay-raut-strongly-criticizes-bjp-from-central-investigation-agency-231742.html”]

भारतीय सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत जखमी झालेल्या लष्करी अधिकाऱ्याला ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक बनवण्याच्या चीनच्या निर्णयाचा अमेरिकन सिनेट फॉरेन रिलेशन कमिटीच्या एका सर्वोच्च खासदाराने निषेध केला आहे. जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारतीय सैन्यासोबत झालेल्या हिंसक चकमकीत गंभीर जखमी झालेला चिनी सैन्याचा रेजिमेंटल कमांडर बीजिंग गेम्समध्ये मशालवाहक बनला, असे स्थानिक माध्यमांनी सांगितले.

एकीकडे बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकबाबत राजकारण करू नये, असे चीन सातत्याने सांगत आहे. चीन विरोध करत असलेल्या ऑलिम्पिकबद्दल अमेरिकेसह अनेक युरोपीय देशांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुसरीकडे, चीननेच हिवाळी ऑलिम्पिकला राजकीय मैदान बनवले आहे आणि त्याद्वारे तो आपला प्रचार करत आहे.

लडाखसह अनेक भागात सीमावादावरून भारत आणि चीनमध्ये तणाव कायम आहे. आतापर्यंत दोन्ही पक्षांमध्ये चर्चेच्या १४ फेऱ्या झाल्या आहेत मात्र अद्याप कोणताही निष्कर्ष निघालेला नाही. तर, दोन्ही देशांनी आपापसात समस्या सोडवण्याची चर्चा केली आहे आणि कोणत्याही तिसऱ्या देशाच्या हस्तक्षेपास विरोध केला आहे.

२०२२ चा अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सीमावर्ती गावांसाठी नवीन व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम (व्हीव्हीपी) जाहीर केला आहे. याचा संबंध चीनसोबतच्या सीमेवर सुरू असलेल्या तणावाशी जोडला जात आहे. अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी सांगितले की, कमी लोकसंख्या, मर्यादित कनेक्टिव्हिटी आणि मूलभूत पायाभूत सुविधा असलेली सीमावर्ती गावे अनेकदा विकासापासून दूर राहतात. उत्तरेकडील सीमेवरील अशा गावांना नवीन व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम अंतर्गत समाविष्ट केले जाईल. गेल्या काही वर्षांत चीनच्या सीमावर्ती भागात लोकसंख्या वाढली आहे. यातून चीनने या भागांवर आपला दावा बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा स्थितीत भारत सरकारच्या या निर्यणाकडे चीनला उत्तर म्हणून पाहिले जात आहे.

Web Title: China gave olympic torch to injured soldier of galwan valley nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2022 | 01:03 PM

Topics:  

  • China
  • Galwan Valley

संबंधित बातम्या

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस
1

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर
2

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी
3

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी

China Flash Flood : चीनमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे कहर; ८ जणांचा मृत्यू, ४ बेपत्ता
4

China Flash Flood : चीनमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे कहर; ८ जणांचा मृत्यू, ४ बेपत्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.