Flood in Spain More than 200 dead so far due to floods, government declares emergency
स्पेनमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे सध्या देशातील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. हा पूर गेल्या 50 वर्षांतला सर्वांत मोठा असल्याचे मानले जात आहे. अतिवृष्टी आणि वादळांमुळे आलेल्या पुरात आतापर्यंत 200 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यातच व्हॅलेन्सिया हे शहर सर्वाधिक प्रभावित झाल्याने, तिथे जनजीवन ठप्प झाले आहे.
सीएनएच्या अहवालानुसार, या पूर परिस्थितीत आतापर्यंत 205 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू व्हॅलेन्सिया या शहरात झाले असून, तिथे जनतेला सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. परिस्थिती बिकट बनल्यामुळे अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने आणि काही ठिकाणी रस्ते तुटल्याने आपत्कालीन सेवांना पोहोचण्यात अडचणी येत आहेत, ज्यामुळे मदतकार्यात विलंब होण्याची शक्यता आहे.
स्पेनच्या आपत्कालीन सेवांना नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात तातडीची मदत पुरवण्याचे आव्हान आहे. बचाव कार्यासाठी विशेष टीम्स तैनात करण्यात आल्या असून, नौदल, अग्निशमन विभाग आणि इतर आपत्कालीन सेवांनी लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या पूरस्थितीमुळे नागरिकांना अन्न, पाणी, आणि इतर गरजेच्या वस्तूंची टंचाई भासत आहे. पुरामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक ठिकाणी अंधार पसरला आहे, त्यामुळे जनतेला अधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हे देखील वाचा : युद्धाच्या पार्शवभूमीवर कोरियन हुकूमशहाने खेळली ‘अशी’ चाल; अमेरिकेने घुडघे टेकले अन्…
स्पेनमधील पूरग्रस्त भागांतील नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पूर नियंत्रणासाठी आणि पुनर्वसनासाठी सरकारने आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणेसह विशेष पावले उचलली आहेत, पण परिस्थिती गंभीर असल्याने आणखी मदतीची आवश्यकता भासत आहे.
हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे
स्पेनच्या हवामान विभागाने देशाच्या दक्षिण-पश्चिम भागात असलेल्या किनारी भागात अतिवृष्टीबाबत रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, ह्युएलवा येथे सतत 12 तास 140 मिमी पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर इतर भागात पावसाबाबत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रासेना, आंदेवालो आणि कोंडाडो भागात पावसासाठी ऑरेंज आणि वादळासाठी पिवळा इशारा जारी करण्यात आला आहे.
स्पेनमध्ये ‘जलप्रलय’! पुरामुळे आतापर्यंत 200 हून अधिक मृत्यू, सरकारने जाहीर केली आणीबाणी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
अध्यक्ष पेड्रो सांचेझ यांनी शोक व्यक्त केला
स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेद्रो सांचेझ यांनी सोशल मीडियावर लिहिले, “या पुरात आपल्या कुटुंबाचा शोध घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या वेदना संपूर्ण स्पेनला जाणवू शकतात. आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. लोकांना बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्व आवश्यक संसाधने वापरत आहोत. त्यांची घरे आणि गाड्या पूरग्रस्त भागात तैनात करण्यात आल्या आहेत.
हे देखील वाचा : कॅनडामध्ये सुपरलॅबचा भांडाफोड! मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
आपत्कालीन प्रतिसाद युनायटेड 1000 सदस्य तैनात
स्पॅनिश सैन्याच्या आपत्कालीन प्रतिसाद युनिटचे सुमारे 1,000 सदस्य बचाव आणि साफसफाईच्या प्रयत्नांना मदत करत बाधित भागात तैनात करण्यात आले आहेत. मात्र, अनेक भागात वीज तुटवडा आणि फोन नेटवर्कमध्ये व्यत्यय आहे.
या मुसळधार पावसासाठी हवामान तज्ज्ञांनी ‘दाना’ला जबाबदार धरले आहे. त्यांचा असा विश्वास आहे की जेव्हा थंड हवेची यंत्रणा भूमध्य समुद्राच्या उबदार पाण्याशी आदळते तेव्हा असे घडते. तर त्याचे परिणाम अनेकदा स्थानिक असतात. तत्सम घटनांनी 1966 आणि 1957 मध्ये कहर केला, जेव्हा तुरिया नदी ओव्हरफ्लो झाली आणि व्हॅलेन्सिया शहराचा नाश झाला.