Former PM of Nepal KP Sharma Oli made a public appearance today
Nepal News in Marathi : काठमांडू : नेपाळमध्ये ८ सप्टेंबर रोजी सरकारच्या सोशल मीडियावरील बंदीविरोधात तीव्र आंदोलन (Nepal Protest) सुरु झाला होते. चार दिवस या आंदोलनांनी प्रचंड हिंसाचार घडवून आणला. यावेळी नेपाळचे माजी पंतप्रधान ओली शर्मा यांच्या सरकारला पाडण्यात आले होते. केपी ओली राजीनाम्यानंतर देश सोडून जवळच शिवपूरमध्ये वास्तव घेतला होता. पण आज बरेच दिवसानंतर नेपाळमध्ये एका सार्वजिनक कार्यक्रमात ओली शर्मा यांना पाहिले गेले. यामुळे अनेकजण हैराण झाले आहेत.
शनिवारी (२७ सप्टेंबर) ओली शर्मा यांनी भक्तपूरमधील गुंडू येथे राष्ट्रीय युवा संघाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता.
या वेळी भाषादरम्यान त्यांनी अनेक मोठे खुलासे केले आहेत.
नेपाळ टाईम्सने दिलेल्या वृत्तानिसार, केपी ओली यांनी कार्यक्रमादरम्यान सरकारला त्यांचे विधान सार्वजनिक करण्याची मागणी केली. तसेच त्यांनी सराकरमधील इतर नेत्यांची विधाने आणि पोसि अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचना आणि कार्यही सार्वजनिकत कराण्यास सांगितले. त्यांनी म्हटले की, आम्ही कोणत्या कटात सहभागी नव्हतो, सर्वकाही निष्पक्षपणे केले होते.
याशिवाय त्यांनी दावा केला की, त्यांच्या सरकारने कोणताही भ्रष्टाचार केलेल नाही. त्यांनी सांगितले की, सध्याचे अंतरिम सरकार त्यांचे पासपोर्ट रद्द करणार आहे. त्यांनी म्हटले की, लोक काय विचारत करत आहेत? आम्ही आमचा देश या सरकारच्या हाती देऊन परदेशात पळून जाऊ? नाही आम्हाला आमचा देश पुन्हा उभारायचा आहे. याला पुन्हा एका लोकशाही संवैधानिक बनवायचे आहे, असे ओली यांनी आपल्या भाषणात म्हटले.
ओली यांनी गेल्या वर्षीच्या राजकीय अस्थिरतेचा उल्लेख करत सांगितले की, त्यांनी माओवादी संघर्षावेळी देशात राजकीय स्थिरता प्रस्थापित केसली होती. पण आता पुन्हा देशात अशांतता पसरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
याशिवाय ओली यांनी म्हटले की, जनरेशन-झेडचे कार्यकर्ते घरी असताना इतर संधी साधू लोकांनी देशात लुटमार केली, तसेच तोडफोड केली आहे. सिंह दरबार आणि संसदेसारख्या ऐतिहासिक संस्थांची तोडफोड या संधी साधू लोकांनी केली असल्याचे ओली यांनी म्हटले.
Former Nepal PM KP Sharma Oli made a public appearance today for the first time after the violent anti-corruption protests in the country and his subsequent resignation. pic.twitter.com/U4Cu8AHrHh — ANI (@ANI) September 27, 2025
माजी पंतप्रधान ओली नेपाळमध्ये कुठे दिसले?
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली शर्मा भक्तपूरमधील गुंडू येथे राष्ट्रीय युवा संघाच्या कार्यक्रमात दिसून आले.
ओली शर्मा यांनी सरकारकडे कोणती मागणी केली?
नेपाळचे पंतप्रधान ओली शर्मा यांनी सरकारकडे हिंसाचारादरम्यान त्यांनी आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांनी केलेली विधाने सार्वजनिक करण्याची मागणी केली. तसेच पोलिसांना दिलेल्या सुचना देखील सार्वजनिक करण्याची मागणी केली.