'पहिले राजीनामा द्या, मग हेलिकॉप्टर' ; लष्करप्रमुखाच्या धमकीमुळे नेपाळच्या माजी पंतप्रधानांनी सोडली खुर्ची? नेपाळी माध्यमांचा दावा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Nepal Gen Z Protest : काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal) सध्या सर्वकाही सुरळित होताना दिसत आहे. अंतरिम सरकारची स्थापना सुरु असून ५ मार्च २०२६ पर्यंत सार्वत्रिक निवडणूका घेण्यात येणार आहेत. ४ सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर लागू झालेल्या बंदीमुळे देशातल जनरेशन झेडच्या तरुणांनी तीव्र आंदोलन छेडले होते. यामुळे माजी पंतप्रधान ओली यांना राजीनामा द्यावा लागला होता. सध्या त्यांच्या राजीनाम्याबाबत एक मोठा खुलासा समोर आला आहे. सांगितले जात आहे की, माजी पंतप्रधान ओलींनी नेपाळच्या लष्करप्रमुखांच्या सांगण्यावरुन पद सोडले होते.
नेपाळच्या मांध्यमानी दिलेल्या माहितीनुसार, जनरेशन झेडचे आंदोलन (Nepal Protest) अधिक तीव्र झाले होते. यामध्ये अनेक नेत्यांना मारहाण करण्यात आली. नेपाळचे माजी पंतप्रधान देऊबा यांना, अर्थमंत्री पौडाल यांना मारहाण करण्यात आली होती. यामुळे ओली शर्मा यांना भीती वाटू लागली होती.
लोक त्यांनाही मारतील या भीतीने त्यांना लष्करप्रमुखांना कॉल केला. त्यांना लष्करप्रमुखांकडे देश सोडण्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी केली होती. पण यासाठी ओली यांच्यासमोर लष्करप्रमुख अशोक राज सिग्देल यांनी अट ठेवली होती.
अहवालानुसार, नेपाळचे लष्करप्रमुख अशोक सिग्देल यांनी ओली शर्मा यांच्याकडे राजीनामा देण्याची मागणी केली. त्यांना सांगितले की, उड्डाण केल्यानंतर लगेचच पंतप्रधानांना राजीनामा द्यावा. तरच ओली यांना लष्कराकडून हेलिकॉप्टरची मदत पुरवली जाईल. यावर ओली यांनी होकार दिल्यानंतरच त्यांना देश सोडून जाण्यासाठी हेलिकॉप्टर मिळाले असे अहवालात सांगितले जात आहे.
यापूर्वी देखील देशातील परिस्थिती सुधारयची असेल, आंदोलन शांत करायचे असेल तर राजीनामा द्या असे लष्करप्रमुखांनी ओली शर्मा यांनी सांगतल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. देशातील परिस्थिती अत्यंत बिघडली होती. यावेळी सीग्देल यांनी ओली यांना पद सोडण्याचा सल्ला दिला होता असे म्हटले.
शिवाय नेपाळच्या माध्यमांनी असाही दावा केला आहे की, नेपाळचे माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांना घरात घुसून मारहाण करम्यात आली होती. तसेच नेपाळचे अर्थमंत्री विष्णू पौडाल यांना मारहाण कण्यात आली होती. यामुळे त्यांना मारहाण होण्याच्या भीतीनेच माजी पंतप्रधान ओली यांनी ९ सप्टेंबर रोजी राजीनामा दिला आणि घाई घाऊत देश सोडला.
नेपाळचे तिन्ही पंतप्रधान बेघर
नेपाळचे तीन माजी पंतप्रधान केपी ओली शर्मा, शेर बहादूर देउबा, आणि पुष्प कमल दहल प्रचंड सध्या बेघर झाले आहे. सध्या त्यांचे समर्थक त्यांच्यासाठी भाड्याने घरे शोधत आहे. निदर्शकांनी त्यांची घरे जाळून टाकली आहेत. तसेच नेपाळच्या हिंसाचारात एका भारतीय महिलेसह ५१ जणांचा मृत्यू, तर १५०० हून अधित लोक जखमी झाले आहेत.
नेपाळमध्ये का सुरु होते जनरेशन झेडचे आंदोलन?
नेपाळच्या माजी सरकारच्या सोशल मीडियावरील बंदी, भ्रष्टाचार, देशातील बेरोजागीर संपवण्यातील अपयश, आणि नेपोटिझ विरोधात सुरु होते आंदोलन.
नेपाळच्या पंतप्रधानांनी का दिला राजीनामा?
नेपाळच्या पंतप्रधानांनी देशातील बिघडत चाललेली परिस्थिती पाहून लष्कराकडे मदत मागितली होती. यावेळी त्यांना पद सोडण्याचा सल्ला देण्यात आला. यामुळे ओली शर्मा यांनी राजीनामा दिला असे म्हटले जात आहे.
नेपाळच्या लष्करप्रमुखांनी ओली यांच्यासमोर मदतीसाठी कोणती अट ठेवली?
नेपाळच्या माध्यमानी दिलेल्या माहितीनुसार, लष्करप्रमुख अशोक सिग्देल यांनी ओली शर्मा यांच्याकडे राजीनामा देण्याची मागणी केली होती. तरच त्यांना देश सोडण्यासाठी मदत मिळेल असे सांगण्यात आले होते.