बांगलादेशात पुन्हा अशांतता?; शेख हसीना यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आज उतरणार रस्त्यावर
बांगलादेश ढाका : बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली. लष्कराच्या विमानातून त्यांनी देश सोडला. देश सोडल्यानंतर जवळपास एक आवड्यानंतर शेख हसीना यांनी तेथली परिस्थितीवर भाष्य केलं आहे. आपण लवकरच बांगलादेशला परतणार असल्याचं शेख हसीना यांनी आपल्या देशवासीयांना सांगितलं आहे.
शेख हसीना म्हणाल्या, “अनेक नेते मारले गेले, कार्यकर्त्यांचा छळ झाला आणि त्यांच्या घरांची तोडफोड आणि जाळपोळ झाली. हे सर्व ऐकून माझ्या हृदयाला खूप वेदना होत आहेत. सर्वशक्तिमान अल्लाहच्या कृपेने मी लवकरच परत येईन. अवामी लीग मी वाढवली आहे. माझा आवाज बांगलादेशच्या भविष्यासाठी, ज्या राष्ट्रासाठी माझे वडील आणि कुटुंबीयांनी बलिदान दिले त्या राष्ट्रासाठी मी कायम प्रार्थना करत राहिल.”
आरक्षण आंदोलन आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत हसीना म्हणाल्या, “मी बांगलादेशच्या तरुण विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की, मी कधीही तुम्हाला रझाकार म्हटले नाही. उलट तुम्हाला चिथावणी देण्यासाठी माझ्या शब्दांचा चूकीचा अर्थ सांगितला गेला. त्या दिवशीचा माझा तो व्हिडीओ तुम्ही पुन्हा एकदा नक्की पाहावा अशी मी विनंती करते.
दरम्यान, शेख हसीना यांचा मुलगा साजिब वाजेद जॉय यांनी शनिवारी 10 ऑगस्टच्या रात्री त्यांच्या व्हेरिफाईड फेसबुक पोस्ट केली आहे. “आज आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयावर हल्ला करण्याची आणि बांगलादेशच्या सरन्यायाधीशांचे घर जाळण्याची धमकी दिली. न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. तसेच त्याच्या नामांकित व्यक्तींच्या नियुक्त्यांची यादीही त्यांनी सादर केली आहे.
आंदोलकांच्या मागण्यांपुढे अंतरिम सरकारने शरणागती पत्करल्याचा दावा करत त्यांनी लिहिले की, “आंदोलकांनी नामनिर्देशित केलेल्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय कोणत्याही प्रक्रियेशिवाय, निवडून आलेल्या संसदेशिवाय कसे बदलू शकते?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.