Giza Pyramids were built by skilled workers not slaves says new research
Giza Pyramids not built by slaves : इजिप्तमधील गिझा येथील ग्रेट पिरॅमिड हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. सुमारे ४,००० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या अद्भुत रचनेच्या मागे कोण होते, हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेक दशकांपासून होती. अनेकांच्या मते, या पिरॅमिडचं बांधकाम लाखो गुलामांनी केलं होतं, पण आता शास्त्रज्ञांनी केलेल्या नव्या संशोधनामुळे हे गृहितक धुळीस मिळालं आहे.
गिझाचा ग्रेट पिरॅमिड हे इजिप्तच्या जुन्या साम्राज्याचं एक अद्वितीय उदाहरण मानलं जातं. सुमारे २.३ दशलक्ष दगडी ब्लॉक्स वापरून हे पिरॅमिड उभारण्यात आलं, ज्यांचं एकत्रित वजन सुमारे ६ दशलक्ष टनांहून अधिक आहे. इतक्या अचूकतेने आणि मोठ्या प्रमाणावर उभारलेली ही रचना आजही शास्त्रज्ञांना आश्चर्यचकित करते.
पूर्वी असं मानलं जात होतं की हे पिरॅमिड गुलामांनी उभारलं, परंतु अलीकडील संशोधनात हे पूर्णपणे चुकीचं असल्याचं स्पष्ट झालं आहे. शास्त्रज्ञांच्या पथकाने गिझा पिरॅमिडजवळ आढळलेल्या काही कबरींचा अभ्यास केल्यानंतर, हे पिरॅमिड कुशल कामगारांनी बांधल्याचं सिद्ध झालं आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘पकडा आणि सरळ गोळी मारा..’ शेख हसीनांचा लीक ऑडिओ इंटरनेटवर जोरदार VIRAL
या कबरींमध्ये त्या कामगारांचे पुतळे आणि शिलालेख सापडले आहेत, ज्यावरून ते केवळ मजूर नव्हते, तर त्यांना समाजात मान-सन्मान होता. जर हे लोक गुलाम असते, तर त्यांच्या कबरी पिरॅमिडजवळ किंवा त्यात असण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे हे स्पष्ट होतं की हे कामगार प्रशिक्षित आणि वेतन मिळवणारे होते.
या कामगारांना खास तांत्रिक कौशल्य होतं. शास्त्रज्ञांनी सांगितलं की पिरॅमिड बांधण्यासाठी जवळपास १,००० फूट अंतरावरून चुनखडीचे मोठे दगड एका विशेष रॅम्पच्या साहाय्याने आणले गेले. या रॅम्पचे अवशेषही संशोधनात सापडले आहेत, ज्यामुळे प्राचीन काळातील बांधकाम प्रक्रिया अधिक स्पष्ट झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘हा’ देश बनवत आहे जगातील सर्वात घातक 6th जनरेशन ‘F-47’ लढाऊ विमान; 5 महिन्यांपासून गुप्त चाचण्या सुरू
याशिवाय पिरॅमिडच्या आत जुन्या लेखनशैलीतील अनेक शिलालेखही आढळले, जे फक्त प्रशिक्षित इतिहासतज्ञच समजू शकले. हे शिलालेख त्या काळातील व्यवस्थेचा आणि कारागिरांच्या जीवनशैलीचा पुरावा आहेत. या नव्या संशोधनामुळे हजारो वर्षांपासून पसरलेल्या गैरसमजांना पूर्णविराम मिळाला आहे. गिझाचा पिरॅमिड हा केवळ एक स्थापत्यकलेचा चमत्कार नाही, तर तो त्या काळातील वैज्ञानिक दृष्टिकोन, व्यवस्थापन कौशल्य आणि मानवी मेहनतीचं साक्षात प्रतीक आहे.