पकडा आणि सरळ गोळी मारा... शेख हसीनांचा सर्वात धोकादायक ऑडिओ बांगलादेशात व्हायरल ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Sheikh Hasina leaked audio : पंतप्रधान शेख हसीना यांचा एक धक्कादायक ऑडिओ समोर आला असून, त्यात त्या थेट म्हणताना ऐकू येतात “पकडा आणि गोळी घाला!” विरोधक आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांमध्ये या लीकमुळे संतापाची लाट उसळली आहे. या ऑडिओमुळे हसीना यांच्याविरोधात सुरू असलेल्या मानवतेविरुद्ध गुन्ह्यांच्या खटल्याला नवे वळण मिळू शकते.
ही घटना गेल्या वर्षीच्या सरकारविरोधी निदर्शनांशी संबंधित आहे. या निदर्शनांत सुमारे १५०० लोकांचा मृत्यू झाला होता. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतेक जण सुरक्षा दलांच्या गोळीबारात मारले गेले होते. ही चळवळ सुरू झाली होती १९७१च्या युद्धातील लढवय्यांच्या कुटुंबीयांना नागरी सेवेत आरक्षण मिळावा या मागणीसाठी, पण नंतर ती प्रचंड जनआंदोलनात परिवर्तित झाली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Armenia Parliament: आर्मेनियाच्या संसदेत गोंधळ! विरोधी पक्षाच्या खासदारावर हल्ला, हाणामारीचा थरारक VIDEO VIRAL
ऑडिओमध्ये शेख हसीना एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याला स्पष्ट शब्दांत आदेश देताना ऐकू येतात. “जिथे सापडतील तिथे गोळ्या घाला. कोणतीही माफी नाही. देशासाठी ही कडक कारवाई आवश्यक आहे.” हा ऑडिओ मार्च महिन्यात लीक झाला होता आणि आता BBCने त्याची अधिकृत पुष्टी करत तो प्रसारित केला आहे. या ऑडिओचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे, कारण बांगलादेशच्या विशेष न्यायाधिकरणात हसीना यांच्याविरुद्ध मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचा खटला आधीच सुरू आहे. सरकारी वकील मंडळी या ऑडिओला मुख्य पुरावा म्हणून न्यायालयात सादर करण्याच्या तयारीत आहेत.
Leaked audio of ousted Sheikh Hasina from last year. Outsiders don’t know her true face. Only we do. 15 years of autocratic Awami League regime. They still control Police and Media here. A large number of Police within Police force and most BSL are k*llers of students pic.twitter.com/D5Meo2hfzM
— 🪽 (@apatheticoo) July 9, 2025
credit : social media
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताविरुद्ध मोठे षड्यंत्र! पाकिस्तानचे ‘या’ देशाला भेटणे धोकादायक; CDS अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले कारण
दरम्यान, अवामी लीग पक्षाने सर्व आरोप फेटाळले असून, हा ऑडिओ खोटा असल्याचे म्हटले आहे. भारतात आश्रय घेतलेल्या शेख हसीना यांनीही आपल्या वकिलांमार्फत सांगितले की, “मी काहीही बेकायदेशीर केलेले नाही. हा राजकीय सूड आहे.” या प्रकारामुळे बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरता पुन्हा उफाळून आली आहे. १५ वर्ष सत्तेवर राहिलेल्या शेख हसीना यांना शेवटी देश सोडून पळ काढावा लागला होता. १९७१ नंतरचा हा सर्वात मोठा आणि रक्तरंजित संघर्ष मानला जात आहे. विशेष म्हणजे, बांगलादेशमधील जनतेमध्ये पुन्हा एकदा लोकशाही आणि मानवी हक्कांविषयीची आंदोलनाची लाट उठताना दिसत आहे. हा ऑडिओ केवळ एका माजी पंतप्रधानाच्या आदेशाचा नाही, तर एका संपूर्ण यंत्रणेच्या निर्दयतेचा दस्तऐवज बनत आहे.