'हा' देश बनवत आहे जगातील सर्वात घातक 6th जनरेशन 'F-47' लढाऊ विमान; 5 महिन्यांपासून गुप्त चाचण्या सुरू( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
F‑47 stealth fighter : जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञानाने सज्ज, अमेरिकेचे सहाव्या पिढीतील स्टील्थ लढाऊ विमान F-47 आता आंतरराष्ट्रीय संरक्षण क्षेत्रात खळबळ उडवत आहे. हे लढाऊ विमान इतकं अत्याधुनिक आहे की त्याच्यासमोर कोणतीही शत्रूची फौज टिकू शकत नाही. मागील पाच महिन्यांपासून याच्या गुप्त चाचण्या सुरू असून, 2030 पर्यंत हे विमान अमेरिकन हवाई दलाच्या ताफ्यात अधिकृतपणे समाविष्ट केले जाईल.
मार्च 2025 मध्ये अमेरिकेच्या हवाई दलाने बोईंग कंपनीसोबत करार करून हे शक्तिशाली एफ-47 लढाऊ विमान तयार करण्याचे ठरवले आहे. विशेष बाब म्हणजे हे विमान F-22 सारख्या जुन्या लढाऊ विमानांची जागा घेणार आहे. या करारामुळे बोईंगला संरक्षण क्षेत्रात नव्याने स्थान मिळाले आहे, जे आतापर्यंत लॉकहीड मार्टिन कंपनीने घेतले होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : नवा जागतिक संघर्ष उभा राहणार? अंटार्क्टिकामध्ये सौदीपेक्षा दुप्पट तेलसाठा, रशियाच्या दाव्याने जगभरात खळबळ
एफ-47 चे डिझाइन हे पारंपरिक अपग्रेड स्वरूपात नसून पूर्णपणे नवीन आणि आधुनिक आहे. त्यामध्ये दोन अत्यंत प्रगत तंत्रज्ञानांचा समावेश आहे— MQ-28 ‘Ghost Bat’ ड्रोनचे AI आधारित नियंत्रण आणि B-21 रेडरचे स्टील्थ टेक्नॉलॉजी. त्यामुळे हे विमान शत्रूच्या रडारला सहजपणे चकवू शकते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याचे वर्णन “सुपर-कॉम्प्युटरसारखे लढाऊ विमान” असे करताना सांगितले की एफ-47 जगातील एकमेव असे विमान आहे जे फक्त वेगवान आणि प्राणघातकच नाही, तर त्याचे तांत्रिक बुद्धिमत्ता हे त्याचे खरे वैशिष्ट्य आहे.
या विमात इतकी सामर्थ्यशाली प्रणाली बसवण्यात आली आहे की ते एकट्यानेच संपूर्ण स्क्वॉड्रनसारखे काम करू शकते. यामुळे अनेक लक्ष्यांवर एकाच वेळी अचूक हल्ला शक्य होतो. आधुनिक नेटवर्क क्षमतांमुळे ते इतर ड्रोन आणि यंत्रणांशी पूर्णतः समन्वय ठेवू शकते.
एफ-47 ची किंमत सुमारे २० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे १६७ कोटी रुपये आहे. ही किंमत जरी जास्त वाटत असली, तरी ते मिळवणाऱ्या देशासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हे विमान युद्धाची रणनीती पूर्णपणे बदलू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : आता ‘या’ दोन महासत्ता ठरणार मोठ्या महाविनाशामागचे कारण? आता NATO प्रमुखांचेही याबाबत गंभीर भाकीत
एफ-47 ही केवळ एक लढाऊ यंत्रणा नसून, ती अमेरिकेची भविष्यातील युद्धसज्जता दर्शवते. जेव्हा जगभरातील तणाव वाढतो आहे, तेव्हा अशा प्रकारचे प्रगत विमान शांती राखण्याच्या धोरणातही अत्यंत उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे एफ-47 हे केवळ अमेरिकेसाठीच नाही तर जागतिक लष्करी तंत्रज्ञानासाठीही एक क्रांतिकारी टप्पा ठरणार आहे.