Breaking News : जगभरात उपासमारीचे संकट गडद होणार; संयुक्त राष्ट्रांचा इशारा, आफ्रिकेतील काही भागात तीव्र दुष्काळाचा धोका

संयुक्त राष्ट्रांच्या FAO आणि WFP या संस्थांनी जगातील १६ संवेदनशील भागांमध्ये आगामी सहा महिन्यांत उपासमारीचे संकट वाढण्याचा इशारा दिला आहे. सुदान, दक्षिण सुदान, सोमालिया, नायजेरिया आणि येमेनमध्ये सर्वाधिक धोका असून आफ्रिकेतील दुष्काळ आणि मानवतावादी मदतीच्या निधीतील घट यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.


फोटो सौजन्य AI
Drought Relief Journey in Africa फोटो सौजन्य AI
Published on: 
Updated on: 
  • सुदान , सोमालिया आणि येमेनमध्ये सर्वाधिक धोका

  • एल निनोमुळे शेतीला फटका; आफ्रिकेत अन्नटंचाई वाढण्याची भीती

  • मदतीसाठी निधीत मोठी घट; लाखो नागरिकांचे भविष्य धोक्यात

Breaking News : जगभरातील अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनण्याची शक्यता आहे . संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने ( FAO ) आणि जागतिक अन्न कार्यक्रमाने आगामी सहा महिन्यांसाठी धोक्याचा इशारा दिला आहे .

डिसेंबर २०२६ ते मे २०२७ या काळात जगातील १६ संवेदनशील भागांमध्ये उपासमारीची परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते . आफ्रिकेतील काही देशांमध्ये दुष्काळ आणि भीषण अन्नटंचाईचा धोका निर्माण झाला आहे . मागील अहवालात १३ भागांचा समावेश होता . आता ही संख्या वाढून १६ झाली आहे .

सुदान , सोमालिया आणि येमेनमध्ये सर्वाधिक धोका

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार सुदान , दक्षिण सुदान , सोमालिया , नायजेरियाचे काही भाग आणि येमेन या पाच ठिकाणी उपासमारीचा धोका सर्वाधिक आहे . या देशांमधील युद्ध , सशस्त्र संघर्ष , नागरिकांचे विस्थापन आणि आर्थिक संकटामुळे अन्नपुरवठा विस्कळीत झाला आहे .

सुदानमधील उत्तर दारफूर आणि दक्षिण कोर्दोफानमधील १३ भागांमध्ये जानेवारी २०२७ पर्यंत दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे . दक्षिण सुदानमधील काही भागातही दुष्काळाचा धोका कायम आहे .



फोटो सौजन्य AI
World News : OPEC संघटनेला अमेरिकेचा मोठा धक्का; व्हेनेझुएला आणि इराकला बाहेर पडण्यासाठी ट्रम्प प्रशासनाचा दबाव

एल निनोमुळे शेतीला फटका; आफ्रिकेत अन्नटंचाई वाढण्याची भीती

हवामानातील बदल आणि एल निनोच्या प्रभावामुळे आफ्रिकेतील शेतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे . दक्षिण आफ्रिकेतील काही देशांमध्ये कमी पाऊस आणि वाढत्या तापमानामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे .

झिम्बोंबे मधील ३० लाख , मलावितील २६ लाख आणि मोझाम्बिक मधील १८ लाख लोकांना आगामी काळात तीव्र अन्नटंचाईचा सामना करावा लागू शकतो . मध्य अमेरिकेतील ड्राय कॉरिडॉरमध्येही दुष्काळामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे .



फोटो सौजन्य AI
Israel News : नेतन्याहू यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळण्याची शक्यता; भ्रष्टाचार प्रकरणातील गंभीर आरोप मागे घेण्याची न्यायाधीशांची शिफारस

मदतीसाठी निधीत मोठी घट; लाखो नागरिकांचे भविष्य धोक्यात

उपासमारीच्या संकटाला तोंड देण्यासाठी आवश्यक असलेल्या मानवतावादी मदतीच्या निधीतही मोठी घट आहे . सर्वाधिक धोक्यात असलेल्या पाच भागांमधील अन्नसुरक्षा आणि पोषणासाठी मिळणार निधी २०२२ मधील ५.१ अब्ज डॉलरवरून २०२५ मध्ये २ अब्ज डॉलरवर आला आहे . म्हणजेच मदतीच्या निधीत ६२ टक्क्यांची घट झाली आहे .

यामुळे अन्नधान्य , शेतीसाठी लागणारे साहित्य आणि गरजू कुटुंबाना मदत पोहोचवण्याच्या प्रयत्नांवर परिणाम होत आहे . FAO आणि WFP यांनी आंतराष्ट्रीय समुदायाला तातडीने मदत वाढवण्याचे आणि प्रभावित नागरिकांपर्यंत अडथळ्याशिवाय मदत पोहोचवण्याचे आवाहन केले आहे .