लंडन : कोणतंही नैसर्गिक संकट (Natural Calamities) येणार असेल तेव्हा त्याबाबतची पूर्णकल्पना पशू-पक्षांना मिळत असल्याचे सांगितले जाते. त्यात आता जर्मनीतील ‘मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट ऑफ अॅनिमल बिहेव्हिअर’च्या बायोलॉजिस्ट मार्टिन विकेल्स्की यांनी बकऱ्यांना 4-5 तास आधी संकटाचे संकेत मिळतात, असा दावा केला. तसेच त्यांच्या वागण्यात बदल होतो, असंही यामध्ये म्हटलं आहे.
पशू-पक्षांना येणाऱ्या संकटाची माहिती, चाहुल लागते असे म्हटले जाते. त्यात आता पशू-पक्षांना संकटाची भविष्यवाणी होते, असे सांगण्यात आले आहे. बकऱ्यांना संकटाचे संकेत मिळत आहेत. हे जाणून घेण्यासाठी बकऱ्यांवर रिअल टाइम सेन्सर लावण्यात आले. जशा त्या नर्व्हस होतात आणि त्यांचं वागणं बदलतं तसं शास्त्रज्ञ अलर्ट जारी करतात. बकऱ्यांना विस्फोटचा अंदाज 5-6 तासांआधीच होतो.
विस्फोटापूर्वी होतो बदल
तुर्कस्तानातील भूकंपाआधीही आकाशात पक्ष्यांचा थवा पाहायला मिळाला होता. त्यावेळी याला संकटाचे संकेत म्हटलं होतं. गेल्या दहा वर्षांत बकऱ्यांच्या व्यवहाराबाबत अभ्यास करणारे विकेल्स्की ज्वालामुखी विस्फोटाआधी बकऱ्यांची वागणूक पाहतात. ज्वालामुखी विस्फोट कधी आणि कुठे होईल आपल्याला माहिती नाही. पण बकऱ्या याची योग्य माहिती देऊ शकतात.
ज्वालामुखीचा विस्फोट होतो तेव्हा…
जेव्हा ज्वालामुखीचा विस्फोट होतो तेव्हा बकऱ्या डोंगर सोडून आपल्याजवळ येतात. त्या डोंगरावर चरायला जात नाहीत. त्यानंतर ज्वालामुखीचा विस्फोट होतो, असे सांगण्यात येत आहे.