लिमा – पेरू (Peru) देशात विचित्र हत्येने खळबळ माजली आहे. डेटिंग अॅपवरील (Dating App) बॉयफ्रेंडला (Boy Friend) भेटण्यासाठी एका ५१ वर्षीय महिलेने तब्बल ५ हजार किलोमीटरचा प्रवास (5 Thousand km Journey) केला. पण महिलेने केलेला हा प्रवास तिच्या आयुष्यातील अखेरचा ठरला. कारण नराधम बॉयफ्रेंडने त्या महिलेची निर्घृणपणे हत्या (Woman Murder) करुन तिच्या शरीराचे तुकडे केले. महिलेच्या अवयवांची विक्री करण्यासाठी त्याने हत्या केली असल्याचे उघढ झाले आहे. ब्लांका असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.
हुआचो समुद्र किनाऱ्यावर ९ नोव्हेंबरला एका महिलेचा विचित्र अवस्थेत मृतदेह स्थानिक मच्छीमारांना सापडला. तपासात डेटिंग अॅपवरून प्रेमाच जाळे पसरवून प्रियकर किंवा प्रेयसीच्या भावनांचा खेळ करत लाखो रुपयांचा गंडा घातल्याच्या घटना उघडकीस आला आहे. जुलैच्या महिन्याच्या अखेरीस पेरूमध्ये लिमा या ठिकाणी बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी जाणार आहे, असे ब्लांकाने तिच्या कुटुंबीयांना सांगितले होते.
Jamás creí estar en esta situación, hoy pido apoyo y difusión para localizar a una de las personas más amadas e importantes de mi vida. Mi tía Blanca Olivia Arellano Gutiérrez desapareció el día Lunes 07 de Noviembre en Peru, ella de origen Mexicano, tememos por su vida+ pic.twitter.com/4aHRuv0zAW
— Karla Arellano (@itskararellano) November 12, 2022
काही महिन्यांपूर्वी ब्लांकाची जुआनसोबत ऑनलाईन डेटिंग अॅपवरून मैत्री झाली होती. त्यामुळे ब्लांका तिच्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी त्याच्या राहत्या ठिकाणी हुआचोमध्ये कोस्टल शहरात गेली होती. ७ नोव्हेंबरला ब्लांकाने तिची भाची कार्लाला संपर्क केला आणि त्यांच्यातील प्रेमसंबंध चांगले झाले आहेत, असे तिने कार्लाला सांगितले. परंतु, त्यानंतर ब्लांकासोबत तिच्या कुटुंबीयांचा संपर्क होऊ शकला नाही. दोन आठवडे झाल्यानंतरही ब्लांकासोबत कुटुंबीयांचे काहीच बोलणे झाले नाही. अखेर कार्लाने ब्लांकाला शोधण्यासाठी ट्विटरच्या माध्यमातून आवाहन केले. मी अशा परिस्थितीत असेन, असे मला कधीच वाटले नाही. माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या आणि प्रेमळ व्यक्तीला शोधण्यासाठी मला मदतीचे आवाहन करावे लागत आहे, असे ट्विट कार्लाने सोशल मीडियावर केले. त्यानंतर कार्लाच्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली.