Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेत झपाट्याने पसरत आहे ह्युमन मेटॅन्युमो व्हायरस, भारतालाही धोका?

एचएमपीव्ही म्हणजेच ह्युमन मेटापन्यूमोव्हायरसची (HMPV Virus) प्रकरणे अमेरिकेत वेगाने वाढत आहेत. हा विषाणू देखील कोविड प्रमाणेच श्वसनमार्गाचा संसर्ग आहे. गेल्या काही महिन्यांत या विषाणूच्या रुग्णांमध्ये ३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

  • By Aparna
Updated On: Jun 01, 2023 | 07:11 PM
अमेरिकेत झपाट्याने पसरत आहे ह्युमन मेटॅन्युमो व्हायरस, भारतालाही धोका?
Follow Us
Close
Follow Us:

एचएमपीव्ही म्हणजेच ह्युमन मेटापन्यूमोव्हायरसची (HMPV Virus) प्रकरणे अमेरिकेत वेगाने वाढत आहेत. हा विषाणू देखील कोविड प्रमाणेच श्वसनमार्गाचा संसर्ग आहे. गेल्या काही महिन्यांत या विषाणूच्या रुग्णांमध्ये ३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) च्या अहवालानुसार, या विषाणूमुळे फुफ्फुसांमध्ये संसर्ग होऊ शकतो. कोरोनाप्रमाणेच ते फुफ्फुसांनाही संक्रमित करू शकते.

सीडीसीच्या म्हणण्यानुसार, एप्रिलच्या तुलनेत मेमध्ये कमी प्रकरणे आढळली आहेत, परंतु व्हायरस अजूनही पसरत आहे. कोविडप्रमाणेच मानवी मेटॅन्युमो विषाणूमुळे फुफ्फुसात संसर्ग होऊ शकतो. हे श्वसनमार्गाद्वारे शरीरात प्रवेश करते आणि कोणत्याही वयोगटातील लोकांना बळी बनवू शकते. या विषाणूमुळे, न्यूमोनिया होऊ शकतो, जो प्राणघातक आहे.

एचएमपीव्ही विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर तीन दिवसांत त्याची लक्षणे दिसू लागतात, जरी हा विषाणू शरीरात किती काळ राहतो हे स्पष्ट नाही. हे मुख्यत्वे रुग्णाच्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असते.

ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस म्हणजे काय?

ह्युमन मेटान्युमोव्हायरस (HMPV) लहान मुलांमध्ये श्वसनमार्गाचा संसर्ग होऊ शकतो. एचएमपीव्ही पॅरामिक्सोव्हिरिडे कुटुंबातील आहे. त्याची लक्षणे इतर विषाणूंसारखीच असतात. हा विषाणू इन्फ्लूएंझाप्रमाणेच शरीरावर हल्ला करतो.

मेटापन्यूमोव्हायरसमुळे होतो
HMPV मुळे हंगामी उद्रेक होतो, सहसा हिवाळ्यात, आणि श्वसनाचे आजार होऊ शकतात, विशेषत: नवजात, लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये हा अधिक पसरतो.

लक्षण काय? 
वाहणारे नाक
श्वसनविषयी दाह, फुफ्फुसातील दाह
ताप
थकवा
स्नायू दुखणे

भारतालाही धोका होऊ शकतो का?
एपिडेमियोलॉजिस्ट यांचे मत आहे की मेटान्यूमोव्हायरस हा एक दशके जुना विषाणू आहे. याचे केसेस अनेक देशांमध्ये येत राहतात, हा विषाणू सुद्धा इन्फ्लूएंझा सारखा आहे, काही देशांमध्ये त्याचे रुग्ण वाढू शकतात, पण या विषाणूचा प्रभाव भारतातही दिसून येईलच असे नाही. अमेरिकेतही पूर्वीच्या तुलनेत केसेस कमी झाल्या आहेत. अशा परिस्थितीत काळजी करण्यासारखे काही नाही.

Web Title: Human metaneumo virus is spreading rapidly in america a threat to india too nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2023 | 06:26 PM

Topics:  

  • HMPV Virus
  • US

संबंधित बातम्या

India US Trade Dispute: ‘भारत लवकरच आमच्याकडे माफी मागेल’, अमेरिकेच्या मंत्र्यांचे वादग्रस्त विधान
1

India US Trade Dispute: ‘भारत लवकरच आमच्याकडे माफी मागेल’, अमेरिकेच्या मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या
2

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.