भारत-चीन ‘LAC’ करार: सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू होताच भारतीय लष्कराने उचलले 'हे' मोठे पाऊल
नवी दिल्ली: भारत आणि चीनमध्ये LAC तणाव कमी करण्यासाठी एकत्रितपणे महत्त्वपूर्ण पावले उचलली गेले आहेत. पूर्व लडाखमधील लष्करी संघर्ष आता मिटला आहे. दोन्ही देशांनी पूर्व लडाखमधील तणावाचे ठिकाण असलेल्या डेपसांग मैदान आणि डेमचोकमधून आपली तात्पुरती सैनिकी तळे हटवली आहेत. त्यानंतर भारताने पूर्व लडाखच्या डेमचोक परिसरात भारताच्या लष्कराने गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. एलएसीवरील सैन्य माघारी घेण्याचा करार होताच भारताने ही गस्त सुरू केली आहे.
भारतीय लष्कराच्या माहितीनुसार, लष्कराकडून देपसांग भगत देखील लवकरच पेट्रोलिंग सुरू केले जाण्याची शक्यता आहे. डेमचोक भगत गस्त घालण्यास सुरुवात झाली आहे. सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर या ठिकाणी गस्त वाढवली जाण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC ) जून 2020 पासून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता, विशेषतः गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर हा तणाव वाढला होता.
हेही वाचा: भारत-चीनच्या ‘LAC’ कराराचे अमेरिकेने केले स्वागत; आपली भूमिकाही मांडली
भारत-चीनच्या ‘LAC’ कराराचे अमेरिकेने केले स्वागत
भारत आणि चीनमध्ये LAC तणाव कमी करण्यासाठी एकत्रितपणे महत्त्वपूर्ण पावले उचलली गेले आहेत. पूर्व लडाखमधील लष्करी संघर्ष आता मिटला आहे. दोन्ही देशांनी पूर्व लडाखमधील तणावाचे ठिकाण असलेल्या डेपसांग मैदान आणि डेमचोकमधून आपली तात्पुरती सैनिकी तळे हटवली आहेत. यावर अमेरिकेने भारत-चीन सीमेवरील तणाव कमी करण्यासंदर्भातील या प्रक्रियेचे स्वागत केले आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री मॅथ्यू मिलर यांनी याबाबत एक निवेदन जारी केले. जारी केलेल्या या निवेदनात अमेरिकेने भारत-चीनमधील घटनेवर बारकाईने लक्ष ठेवल्याचे मॅथ्यू मिलर यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेने भारताशी या विषयावर संवाद साधला होता. परंतु या ठरावामध्ये त्यांची कोणतीही भूमिका नाही. मिलर यांनी म्हटले की, अमेरिका घडामोडींकडे बारकाईने पाहत आहे. कारण दोन्ही देशांनी LAC करारावरील घर्षण बिंदूंवरून सैन्य मागे घेण्यासाठी प्रारंभिक पावले उचलली आहेत. सीमेवरील तणाव कमी करण्याच्या या सकारात्मक घडामोडींचे त्यांनी स्वागत केले आहे.
भारत आणि चीनने आपले सैन्य मागे घेण्याबाबत आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पुन्हा गस्त सुरू करण्यासाठी नवीन करार केला आहे. अहवालानुसार हा करार डेपसांग आणि डेमचोक भागात गस्त घालण्याशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संघर्षाच्या या दोन्ही ठिकाणी (डेपसांग आणि डेमचोक) गस्त सुरू झाली असून लवकरच दोन्ही देश आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात करतील, याला लष्करी भाषेत डिसेंगेजमेंट म्हणतात. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सोमवारी (21 ऑक्टोबर) याबाबत माहिती दिली. 2020 मध्ये पूर्व लडाखमध्ये निर्माण झालेला तणाव दोन्ही देशांमध्ये गस्त व्यवस्थेबाबत झालेल्या करारामुळे हळूहळू निवळत असल्याची माहिती परराष्ट्रमंत्र्यांकडून देण्यात आली.