फोटो सौजन्य: सोशल मीडिया
वॉशिंग्टन – भारत आणि चीनमध्ये LAC तणाव कमी करण्यासाठी एकत्रितपणे महत्त्वपूर्ण पावले उचलली गेले आहेत. पूर्व लडाखमधील लष्करी संघर्ष आता मिटला आहे. दोन्ही देशांनी पूर्व लडाखमधील तणावाचे ठिकाण असलेल्या डेपसांग मैदान आणि डेमचोकमधून आपली तात्पुरती सैनिकी तळे हटवली आहेत. यावर अमेरिकेने भारत-चीन सीमेवरील तणाव कमी करण्यासंदर्भातील या प्रक्रियेचे स्वागत केले आहे. अमेरिकेने याबाबत आपली भूमिका मांडली आहे.
अमेरिकेने भारत-चीन LAC कराराचे स्वागत केले
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री मॅथ्यू मिलर यांनी याबाबत एक निवेदन जारी केले. जारी केलेल्या या निवेदनात अमेरिकेने भारत-चीनमधील घटनेवर बारकाईने लक्ष ठेवल्याचे मॅथ्यू मिलर यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेने भारताशी या विषयावर संवाद साधला होता. परंतु या ठरावामध्ये त्यांची कोणतीही भूमिका नाही. मिलर यांनी म्हटले की, अमेरिका घडामोडींकडे बारकाईने पाहत आहे. कारण दोन्ही देशांनी LAC करारावरील घर्षण बिंदूंवरून सैन्य मागे घेण्यासाठी प्रारंभिक पावले उचलली आहेत. सीमेवरील तणाव कमी करण्याच्या या सकारात्मक घडामोडींचे त्यांनी स्वागत केले आहे.
हे देखील वाचा- चीनचे ‘ड्रीम मिशन’ लॉंच; 3 अंतराळवीरांना पाठवले अवकाश स्थानावर
भारत-चीन लष्करी तणावाच्या ठिकाणांवरून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू
सीमा तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेने कोणती भूमिका घेतली का, या प्रश्नावर मिलर यांनी स्पष्ट केले की, अमेरिका कोणत्याही स्वरूपात ठरावात प्रत्यक्ष सहभागी झालेली नाही. मात्र, भारताशी झालेल्या संवादातून अमेरिकेला या प्रक्रियेची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मिळालेल्या माहितीनुसार भारत-चीन लष्करी तणावाच्या ठिकाणांवरून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC ) जून 2020 पासून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता, विशेषतः गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर हा तणाव वाढला होता.
16 व्या ब्रिक्स शिखर परिषपूर्वी LAC कराराची घोषणा
यासंदर्भात, 16 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या आधी एलएसी पेट्रोलिंग कराराची घोषणा करण्यात आली. ही परिषद 22 ते 24 ऑक्टोबरदरम्यान रशियातील कझान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या उपस्थितीत झाली. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानेही पुष्टी केली की सीमेवरील प्रश्नांवरून सुरू असलेल्या या करारानुसार दोन्ही देशांचे सीमा सैन्य संबंधित कार्यात गुंतले असून काम सुरळीतपणे सुरू आहे.
हे देखील वाचा- Israel-Hezbollah War: हिजबुल्लाने निवडला नवा प्रमुख; कोण आहे नईम कासिम? जाणून घ्या