US Iran शांतता चर्चा फिस्कटली; त्यापूर्वीच भारताचे LPG टँकर Hormuz मधून सुखरुप बाहेर, जग पाहतचं राहिलं (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल २०२६ रोजी भारताचे जग विक्रम हे LPG टँकर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुखरुप बाहेर पडले आङे. युद्धविराम लागू झाल्यानंतर आणि शांतता चर्चांदरम्यान भारताचे पहिले जहाज अत्यंत संवेदनशील आणि धोरणात्मक समुद्री मार्गावरुन सुखरुप प्रवास कणार पहिले जहाज ठरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (११ एप्रिल) च्या पहाटेच्या सुमारास जग विक्रम स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait of Hormuz) खाडीतून बाहेर पडले आणि दुपारपर्यंत ओमानच्या उपसागरात पोहोचले आहे. आता जहाज भारताच्या दिशेने रवाना झाले असून या जहाजेवर सुनारे २०,००० टन LPG साठा आहे. यामुळे भारताच्या उर्जा संकटला काहीसा दिलासा मिळाला आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून पर्शियन आखातातून भारताचे आतापर्यंत ९ जहाज सुरक्षितपणे नौदलाच्या निगराणीखाली बाहेर पडले आहे. पण धोका अद्याप टळळेला नाही. भारताची आणखी १५ जहाजे होर्मुझच्या धोकादायक मार्गावर अडकली आहेत.
होर्मुची सामुद्रधुनी भारतासाठी जीवनवाहिनी मानली जाते. या मार्गावरुन भारत आपल्या गरजेच्या ८८ टक्के कच्चे तेल आणि ६० टक्के LPG आयात करतो. अमेरिका इराणमधील तणावामुळे आणि इराणने या मार्गावर सागरी माइन्स गाडल्यामुळे भारताच्या गॅस आणि तेल पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला होता. यामुळे अनेक उद्योग ठप्प झाले होते. परंतु जग विक्रमच्या सुरक्षित परण्याने भारताच्या उर्जा पुरवठा साखळीला दिलासा मिळाला आहे. सध्या अंशत: पुरवठा सुरु करण्यात आला असून येत्या काही दिवसांत परिस्थिती पूर्ववत होण्याची चिन्हे आहेत.
दुसरीकडे अमेरिका इराण चर्चा असफल ठरली आहे. इराणने अमेरिकेच्या अत्यंत कठोर आणि जाचक अटी मान्य करण्यास नकार दिला आहे. यामुळे पुन्हा मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडण्याची भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे. याचा जगावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Ans: भारताचे नववे जहाज जग विक्रम एलपीजी टँकर होर्मुझ खाडीतून सुरक्षित बाहेर पडले आहे.
Ans: जह विक्रम जहाजावर सुमारे २०,००० टन एलपीजी आहे. यामुळे भारताच्या उर्जा सुरक्षेला दिलासा मिळाला असून पुरवठा पुन्हा पूर्ववत होण्यासाठी आणि होर्मुझमधील वाढता धोका पाहता जहाज सुखरुप बाहेर पडणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Ans: होर्मुझच्या सामुद्रधुनीत सध्या भारतीय ध्वज असलेली १५ जहाजे अडकली आहे.






