पाकिस्तानकडून अद्यापही कुरापती सुरुच; सांबा जिल्ह्यात दिसले संशयित ड्रोन, सुरक्षा यंत्रणांना समजताच...
नवी दिल्ली: पहलगामच्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारताने पाकिस्तानविरोधात कडक कारवाई केली आहे. भारताने सिंधू जल करार स्थगित केला आहे. तसेच पाकिस्तानशी असलेले राजनियक संबंध कमी केले आहेत. याशिवाय भारताने पाकिस्तानमधून होणाऱ्या वस्तूंची आयात-निर्यात देखील बंद केली आहे. भारताच्या या कारवाईने पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तानचे नेते आणि लष्करी अधिकाऱ्यांकडून सातत्याने धमक्या येत आहेत. पाकिस्तानने भारत-पाक सीमेवर सलग 10व्यांदा गोळीबार केला आहे.
या वाढत्या तणावादरम्यान भारताने आपली हवाई संरक्षण क्षणता आणकी मजबूत केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याला रशियन बनावटीच्या Igla-S क्षेपणास्त्रांची एक मोठी खेप मिळाली आहे. हे क्षेपणास्त्र सीमेवर शत्रूच्या भूभागाजवळील चौकीवर तैनात केले जात आहे. या क्षेपणास्त्राने अगदी कमी अंतरावरुन आणि अगदी दूरवरुन देखील शत्रूवर मारा करता येऊ शकतो. Igla-S हे क्षेपणास्त्र शत्रूच्या लढाऊ विमानांना, ड्रोन्सला, तसेच हेलिकॉप्टर्सला अगदी दूरवरुन देखील लक्ष करु शकते.
भारताने खरेदी केलेले हे क्षेपणास्त्र कमी पल्ल्याच्या हवाई क्षेपणास्त्राच्या प्रणालीचा भाग आहे. या क्षेपणास्त्राची किंमत 260 कोटी रुपये इतकी आहे. भारताच्या आपत्कालीन धोरणांतर्गत या क्षेपणास्त्रांची खरेदी करण्यात आली आहे. या धोरणांतर्गत भारतीय सैन्याने 48 लॉंचर्स आणि 90 क्षेपणास्त्रे खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच ही खरेदी पूर्ण होईल आणि शत्रूच्या भूभागाजवळ तैनात करण्यात येतील.
Igla-S क्षेपणास्त्रे हे इन्फ्रारेड तंत्रज्ञानावर आधिरत आहे. या क्षेपणास्त्राची एक जुनी आवृत्ती देखील भारतीय लष्कराकडे आहे. परंतु या नवीन अत्याधुनिक आवृत्तीमुळे भारताची हवाई ताकद वाढली आहे. यामुळे भारत हवाई धोक्यांना सहजपण तोंड देऊ शकतो. Igla-S क्षेपणास्त्र 1990 पासून भारताकडे आहे. याशिवाय, आपल्या सैन्याकडे इंटिग्रेटेड ड्रोन डिटेक्शन ॲंड इंटरडिक्शन सिस्टीम आहे. ही सिस्टीम 8 किमी अंतरावरुन ड्रोन डिटेक्ट करुन लेसरद्वारे पूर्णत: नष्ट करु शकते. ही सिस्टीम सीमेवर तैनात करण्यात आली आहे.
भारताने मोठ्या प्रमाणात भारताने पाकिस्तानला योग्य ते उत्तर देण्यासाठी मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रे विकसित केली आहेत.तसेच भारताने पाकिस्तानचे ड्रोन निष्क्रिय करण्यासाठी लेसर प्रणाली विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. भारताच्या DRDO ने एक नवीन अत्याधुनिक लेसर प्रणाली विकसित करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात केली आहे.
हे नवीन अत्याधुनिक क्षेपणास्त्रामध्ये शत्रूचे ड्रोन, क्रूझ क्षेपणास्त्रे आणि विमाने नष्ट करण्याची क्षमतेचे असेल. अलीकडेच भारतानीय सैन्याने जम्मू च्या भागात एक पाकिस्तानी ड्रोन पाडले आहे. भारतीय लष्कराच्या या तयारीवरुन स्पष्ट संकेत मिळत आहेत की, भारत दहशतनादी हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आणि संभाव्य हल्ल्यांना तोंड देण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे.