Indian Origin Kash Patel to be ousted as FBI Director Over Missteps in investigation of Kark murder
Charlie Kirk Murder Case News in Marathi : वॉशिंग्टन : सध्या चार्ली कर्क यांच्या मृत्यूचे प्रकरण जगभर चर्चेचा विषय ठरत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी मानले जाणारे कर्क यांची ९ सप्टेंबर रोजी गोळी घालून हत्य करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण अमेरिका हादरला होता. सध्या त्यांच्या हत्येचा तपास सुरु आहे. याची जबाबदारी FBI चे भारतीय वंशाचे संचालक काश पटेल यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
मात्र काश पटेल यांचे FBI चे पद जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सांगितले जात आहे की, त्यांचे पद काढून घेण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चार्ली कर्कच्या हत्येप्रकरणी काश पटेल यांना अमेरिकन संसदेत हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
Charlie Kirk : चार्ली कर्क हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; खूनापूर्वी मिळाला होता सतर्कतेचा इशारा
फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, काश पटेल यांच्याकडून FBI चे संचालक पद काढून घेण्यासाठी त्यांना अमेरिकन संसदेत हजर राहायला सांगितले आहे. त्यांच्या जागी अँड्र्यू बेली FBI चे संचालक होण्याची अटकळ व्यक्त केली जात आहे. पण अचानकपणे असा दावा का केला जात आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चार्ली कर्कच्या मृत्यूनंतर FBI ने तातडीने तपास सुरु केला होता. FBI ला चार्ली कर्कच्या आरोपीला पकडण्यात काही तासांच लागले होते. २ संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांची चौकशीही सुरु करण्यात आली होती. त्यानंतर काश पटेल यांनी सोशल मीडियावर यांची माहिती दिली.
यावर त्यांचे डोनाल्ड ट्रम्प यांनी कौतुकही केले होते. ट्रम्प यांनी FBI चा अभिमान असल्याचे आणि काश यांनी उत्तम काम केले असल्याचे म्हटले. परंतु नंतर दोन्ही आरोपी निर्दोष असल्याचे आढळून आले. यामुळे काश पटेल यांच्यावर तीव्र टीका केली जाऊ लागली.
मिळालेल्या माहितीनुसार, चार्ली कर्क यांच्या खून्याला त्यांच्या मृत्यूनंतर २ दिवसांनी पकडण्यात आले होते. फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, व्हाटइट हाउसच्या काही अधिकाऱ्यांनी काश पटेल यांच्या कामावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
यामध्ये ॲटर्नी जनरल पाम बोंडी यांनी तीव्र टीका केली आहे. शिवाय त्यांनी एपस्टिनवरील काश यांच्या कामावरही टीका केली आहे. एपस्टिन प्रकरणावरुन देखील काश पटेल चौकशीत आहेत. यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांचे पद जाण्याची अटकळ बांधली जात आहे.
कोण आहेत चार्ली कर्क?
चार्ली कर्क हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी मानले जातात. त्यांना रिपब्लिकन पक्षाचे
समर्थक आणि कंझर्वेटिव्ह कार्यकर्ता म्हणून ओळखले जाते.
चार्ली कर्कच्या हत्येच्या तपासाची जबाबदारी कोणावर आहे?
चार्ली कर्क याच्या हत्येच्या तपासाची जबाबदारी भारतीय FBI चे संचालक काश पटेल यांच्याकडे आहे.
काश पटेल यांच्यावर का होत आहे टीका?
काश पटेल यांनी कर्कच्या हत्येप्रकरण दोन संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांनी सोशल मीडियावरुन याची माहिती दिली होती. पण नंतर दोन्ही व्यक्ती निर्दोष असल्याचे आढळून आले. यामुळे सध्या काश पटेल यांच्या कामकाजावरुन त्यांच्यावर टीका केली जात आहे.
अवघं २२ वर्षे वय, अन्…, चार्ली कर्कच्या खुनातील संशयित आरोपी टायलरला अटक; अनेक नवे खुलासे!