Charlie Kirk : चार्ली कर्क हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; खूनापूर्वी मिळाला होता सतर्कतेचा इशारा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
एका उच्च सुरक्षा अधिकाऱ्याने दावा केला आहे की, चार्ली कर्क यांना हत्येपूर्वी चेतावणी देण्यात आली होती. जर आवश्यक सुरक्षा करण्यात आल्या नाहीत तर त्यांची १०० टक्के हत्या होईल असे कर्क यांना सांगण्यात आले होते. पंरुत कर्क यांनी याकडे दुर्लक्ष केले आणि यामुळे त्यांची हत्या झाली असल्याचे अधिकाऱ्याने म्हटले आहे.
अवघं २२ वर्षे वय, अन्…, चार्ली कर्कच्या खुनातील संशयित आरोपी टायलरला अटक; अनेक नवे खुलासे!
द मिरर या वृत्तसंस्थेने दावा केला आहे की, द बॉडीगार्ड ग्रुप ऑफ बेव्हरली हिल्सचे मालक क्रि, हर्झोग यांनी कर्क यांना यापूर्वीच सुरक्षा वाढवण्याचा सल्ला दिला होता. मार्च २०२५ मध्ये हर्झोग यांनी कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी भेटीदरम्यान कर्क यांना खबरदारी घेण्यास सांगितले होते. त्यांना कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळण्याचा आणि गेल्यास सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचा इशारा दिला होता. असे न केल्यास त्यांची हत्या होईल हे निश्चितच होते.
परंतु चार्ली कर्क यांनी हर्झोगनच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले आणि दुर्दैवाने त्यांनी त्यांचे प्राण गमावले असे हर्झोगन यांनी म्हटले आहे. त्यांनी माझ्याशी संपर्क साधला असता तर ही वेळ आलीच नसती असे हर्झोगन यांनी म्हटले. त्यांनी सांगितले होते की,कर्क यांच्या सुरक्षा सेवेत वाढ करण्याची गरज आहे. त्यांच्या मृत्यूला गंभीर धोका असल्याची माहिती आधीच मिळाली होती.
दरम्यान शुक्रवारी (१२ सप्टेंबर) चार्ली कर्कची हत्या करणाऱ्या आरोपीला ३३ तासांच्या आत अटक करण्यात आली आहे. वॉशिंग्टन काऊंटीमधून त्याला अटक करण्यात आली असून टायलर रॉबिन्सन अशी या आरोपीची ओळख पटवण्यात आली आहे. सध्या हत्येचे कारण अस्पष्ट असून मारेकरी फासिस्टवादी विचारांचा होता असे सांगितले जात आहे.
दरम्यान चार्ली कर्क यांच्या पाश्चात्य त्यांची पत्नी आणि दोन मुली आहेत. त्यांच्या पत्नी एरिका कर्क यांनी मह्टले की जगाने त्यांच्यासोबत वाईट वर्तन केले. पण देव माझ्या पाठीशी आहे. माझा त्याच्यावर विश्वास आहे असे म्हटले. तसेच त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे न्यायाची मागणी केली.
चार्ली कर्क हे डोनाल्ड ट्रम्प यांचे सर्वात आवडते आणि जवळचे सहकारी होते. त्यांच्या हत्येमुळे ट्रम्प यांना मोठा धक्का बसला होता. त्यांनी कर्क यांची हत्या करणाऱ्याला सोडले जाणार नाही असे म्हटले आहे.
कोण आहेत चार्ली कर्क?
चार्ली कर्क हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी मानले जातात. त्यांना रिपब्लिकन पक्षाचे
समर्थक आणि कंझर्वेटिव्ह कार्यकर्ता म्हणून ओळखले जाते.
कधी करण्यात आली चार्ली कर्क यांची हत्या?
बुधवारी (१० सप्टेंबर) युटा व्हॅली विद्यापीठात सुरु असलेल्या कार्यक्रमात त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली
Charlie Kirk : ‘गुन्हेगारांना सोडणार नाही…’ ; चार्ली कर्कच्या हत्येवर संतापले डोनाल्ड ट्रम्प






