अवघं २२ वर्षे वय, अन्..., चार्ली कर्कच्या खुनातील संशयित आरोपी टायलरला अटक; अनेक नवे खुलासे!
मिळालेल्या माहितीनुसार, चार्ली कर्कची हत्या करणाऱ्या आरोपीला ३३ तासांच्या आत अटक करण्यात आली आहे. वॉशिंग्टन काऊंटीमधून त्याला अटक करण्यात आली असून टायलर रॉबिन्सन अशी या आरोपीची ओळख पटवण्यात आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टायलर हत्या केल्यानंतर घटनास्थळावरुन ४०० किलोमीटर अंतरावर पळून गेला होता. सध्या त्याची चौकशी सुरु असून त्याने चार्ली कर्कची हत्या का केली याचा शोध सुरु आहे.
Charile Kirk : ‘गुन्हेगारांना सोडणार नाही…’ ; चार्ली कर्कच्या हत्येवर संतापले डोनाल्ड ट्रम्प
हत्येचे कारण अस्पष्ट
पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी (१२ सप्टेंबर) सकाळी चार्ली कर्कच्या हत्याराला अटक केल्याची घोषणा करण्यात आली. तसेच काही पुरावे देखील मिळाले असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे तपास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान रॉबिन्सन नेमका कोण आहे, आणि त्याने कर्कची का हत्या केलीहे जाणून घेऊयात.
कोण आहे टायलर रॉबिन्सन?
चार्ली कर्क यांच्या केसवनर काम करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टायलर २२ वर्षांचा असून त्याने २०११ मध्ये उटाहमधील सेंट जॉर्ज येथील पाइन व्ह्यू हायस्कूमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर त्याने युटा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये एका सेमिस्टरपर्यंत अभ्यास केला, परंतु नंतर शिक्षण सोडून दिले. सध्या त्याने शिक्षण का सोडले याबद्दल स्पष्ट माहिती मिळाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले. त्याने युटाच्या विद्यापाठीतून इलेक्ट्रिकल अप्रेंटिसशिप प्रोगामसाठी प्रवेश घेतला होता.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्याला दोन लहान भाऊ आहेत. तसेच त्याची आई एका आरोग्यसेवा कंपनीत सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करते, तर त्याचे वडील दगडी काउंटरटॉप्स कंपनीचे प्रमुख होते.
चार्ली कर्कच्या हत्येच्या आरोपाखाली टायलर रॉबिन्सनला अटक करण्यात आली आहे. त्याचे यापूर्वी कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड्स सापडले नाहीत. तपासादरम्यान अधिकाऱ्यांना त्याच्या कुटुंबातील सदस्यांकजून अलीकडे टायलर राजकारणी झाल्याचे समजले. तसेच त्याने कर्कवर झाडलेल्या बंदूकीवर फॅसिस्टवाविरोधी संदेश होता. परंतु त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा फॅसिस्टवादी संघटनेशी, लोकांशी संबंध आढळलेला नाही.
FAQs (संबंधित प्रश्न)
कोण आहेत चार्ली कर्क?
चार्ली कर्क हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी मानले जातात. त्यांना रिपब्लिकन पक्षाचे
समर्थक आणि कंझर्वेटिव्ह कार्यकर्ता म्हणून ओळखले जाते.
कधी करण्यात आली चार्ली कर्क यांची हत्या?
बुधवारी (१० सप्टेंबर) युटा व्हॅली विद्यापीठात सुरु असलेल्या कार्यक्रमात त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी चार्ली कर्क यांची गोळ्या झाडून हत्या; भर कार्यक्रमात झाला हल्ला






