Indian Tourist Alleges Inhuman Treatment at Georgia Border Passports Seized, No Food or Washroom
Indian travellers mistreated Georgia : टिबलिसी : एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जॉर्जियाच्या सीमेवर भारतीयां प्रवाशांना अमानुष वागूण देण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. एका महिला ट्रॅव्हलरने दावा केला आहे की, वैध ई-व्हिसा आणि सर्व कागपत्रे असूनही जॉर्जियाच्या अधिकाऱ्यांना ५६ भारतीयांना बॉर्डवर बसवून ठेवले होते. या घटनेमुळे भारतायांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
ही घटना आर्मानिया आणि जॉर्जियाच्या सदाखोल सीमेवरील भागात घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. ध्रुवी पटेल नावाच्या महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने दावा केला आहे की, भारतीय प्रवाशांना आर्मानियामध्ये प्रवेश देण्यात आला नाही.
ध्रुवी पटेलेने इन्स्टाग्रामवरी पोस्टमध्ये सांगितले आहे की, आर्मनिया आणि जॉर्जियाच्या सीमेवरील सदाखोल भागात त्यांच्यासोबत गैरवर्तन करण्यात आले. तिने सांगितले की, लोकांना पाच तासांहून अधिक काळ थंड वातावरणात बसवण्यात आले. त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती, तसेच वॉशरुमला जाण्याचीही कोणतीही सोय नव्हती. सर्वाचे पासपोर्टही दोन तासांपेक्षा अधिक काळासाठी जप्त करण्यात आले होते. त्यांच्यासोबत असे का केले जात आहे, याचे कारणही सांगण्यात आले नाही. त्यांना फुटपाथवर बसवण्यात आले होते.
Charlie Kirk Murder : टायलर रॉबिन्सने का केली कर्कची हत्या? मित्रासोबतच्या चॅटमधून झाला खुलासा
ध्रुवी पटेलने आरोप केला आहे की, जॉर्जियाच्या अधिकाऱ्यांनी तिला आणि तिच्या गटाला गुन्हेगारासारखे वागवले. तसेच एखाद्या गुन्हेगारासारखे त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यात आले, पण प्रवशांनी याचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना थांबण्यात आले. त्यांचे फोन काढून घेण्यात आले. त्यांचा व्हिसा अवैध असल्याचे सांगण्यात आले.
ध्रुवी पटेलने याला विरोध केला असून लज्जास्पद आणि अस्वीकार्य म्हटले आहे. ध्रुवी पटलेने इन्स्टाग्रामवरी आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना टॅग केले आहे. या प्रकरणात भारताने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी तिने कली आहे.
सोशल मीडियावर अनेकांनी या घटनेला तीव्र विरोध दर्शवला आहे. लोकांनी संतापजनक प्रतिक्रिया देत आपण पर्यटकांना कसा आदरो देतो आणि हे आपल्याला अशी वागणूक देतात असे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने यापूर्वी देखील जॉर्जियात अशा घटना घडल्या आहे, मग भारतीय तिथे का जात आहेत असा प्रश्न केला आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.