Charlie Kirk Murder : टायलर रॉबिन्सने का केली कर्कची हत्या? मित्रासोबतच्या चॅटमधून झाला खुलासा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Chairle Kirk Murder Case update Marathi : वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून चार्ली कर्क यांच्या हत्येची जगभर चर्चा सुरु आहे. १० सप्टेंबर रोजी युटा व्हॅली विद्यापीठात सुरु असलेल्या कार्यक्रमादरम्यान भर दिवसा त्यांची हत्या झाली होती. यानंतर दोन दिवसाच्या तपासानंतर कर्कच्या हत्येप्रकरणी आरोपीला अटक झाला. वय २२, टायलर रॉबिन्सन अशी आरोपीची ओळख पटवण्यात आली होती.
पण टायलरने कर्क यांची हत्या का केली याबाबत कोणताही खुलासा अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही, सध्या त्याची चौकशी सुरु आहे. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयच्या फाइल्समधून टायलरने कर्कच्या हत्येपूर्वी याची नाहिती ट्रान्सजेंडर मित्राला दिली होती. दोघांमध्ये झालेल्या संवादावरुन टायलरल कर्क यांच्याबद्दल तिरस्कार होता, असे आढळून आले आहे.
काश पटेल यांचे FBIचे संचालक पद धोक्यात? चार्ली कर्कच्या हत्येप्रकरणी होत आहे जोरदार टीका
टायलरने आपल्या मित्राला लिहिले होते की, मला कर्क यांचा खूप तिरस्कार आहे, आणि तो तिरस्कार बोलून मिटणार नाही. मला त्यांना संपवण्याची संधी मिळाली आहे आणि मी ते करणार आहे. टायलरचा हा मेसेज पाहून त्याच्या मित्राने हा कसला विनोद आहे का, असा प्रश्न केला.
यावर टायलरने उत्तर दिले की, मी ठीक आहे, माझ्या कामात व्यस्त आहे. यामुळे मला घरी यायला वेळ लागले. माझ्या हातात रायफल आहे. खरं तरं मले सत्य कोणाला सांगायचे नव्हते, पण तुला सांगितले. यामध्ये तुला अडकवल्याबद्दल मला माफ कर, असा मेसेज टायलरने केला होता.
टायलर आणि त्याच्या मित्रामधील संवादावरुन स्पष्ट होते की, टायलरच्या मनात चार्ली कर्क यांच्याबद्दल खूप द्वेष होता, या द्वेषातूनच त्याने कर्क यांची हत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
चार्ली कर्क हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी मानले जातात. त्यांना रिपब्लिकन पक्षाचे समर्थक आणि कंझर्वेटिव्ह कार्यकर्ता म्हणून ओळखले जाते.
कधी करण्यात आली चार्ली कर्क यांची हत्या?
बुधवारी (१० सप्टेंबर) युटा व्हॅली विद्यापीठात सुरु असलेल्या कार्यक्रमात त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
कोण केली चार्ली कर्क यांची हत्या?
चार्ली कर्क यांच्या हत्येवर तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार्ली कर्क यांची हत्या २२ वर्षाच्या टायलर रॉबिन्सन याने केली आहे.
काय आहे कर्क यांच्या हत्येचे कारण?
मिळालेल्या माहितीनुसार, टायलरने रॉबिन्सने चार्ली कर्क यांच्याबद्दल असलेल्या द्वेषातून त्यांची हत्या केली असल्याचे सांगितले जात आहे.
Charlie Kirk : चार्ली कर्क हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; खूनापूर्वी मिळाला होता सतर्कतेचा इशारा