Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Israel War: इस्रायल-इराण युद्धात नवे वळण; नेतन्याहूंची इशारवजा घोषणा, तेल डेपोवर हल्ला, अणुचर्चा थांबल्या

Iran Israel War :  पश्चिम आशियात संघर्ष पुन्हा एकदा भडकला असून, इस्रायलने सलग दुसऱ्या दिवशी इराणवर हवाई हल्ले केले आहेत. 14 जून 2025 रोजी, इस्रायलने इराणच्या तेल व गॅस उद्योगांवर थेट हल्ला केला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 15, 2025 | 10:45 AM
Iran-Israel War Netanyahu warns oil depot hit nuclear talks paused

Iran-Israel War Netanyahu warns oil depot hit nuclear talks paused

Follow Us
Close
Follow Us:

Iran Israel War :  पश्चिम आशियात संघर्ष पुन्हा एकदा भडकला असून, इस्रायलने सलग दुसऱ्या दिवशी इराणवर हवाई हल्ले केले आहेत. 14 जून 2025 रोजी, इस्रायलने इराणच्या तेल व गॅस उद्योगांवर थेट हल्ला केला. या कारवाईमुळे इराणमधील अस्थिरता वाढली असून, देशभरात तणावाचं वातावरण पसरलं आहे.

युद्धाची तीव्रता वाढत असताना, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, “हे युद्ध इथे थांबणार नाही, तर आता खरी सुरुवात होईल.” त्यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत इराणच्या अयातुल्ला राजवटीला थेट आव्हान दिलं आणि ‘प्रत्येक लपण्याच्या ठिकाणावर हल्ला करू,’ अशी इशारवजा घोषणा केली.

The End of Ayatollah is nearer than many people believe. “we will strike every site and every target of the Ayatollahs’ regime” pic.twitter.com/FsJ0XEokIM — Kashmiri Hindu (@BattaKashmiri) June 14, 2025

credit : social media

तेहरानमध्ये थरकाप: वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची हत्या, 60 मृत

१३ जून रोजी झालेल्या इस्रायली हल्ल्यांत इराणच्या उच्च लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तसेच, गॅस क्षेत्रात आग लागल्याची माहिती इराणी सरकारी माध्यमांनी दिली आहे. हे इस्रायलचे इराणच्या उर्जाक्षेत्रावर केलेले पहिले थेट हल्ले असल्याचं मानलं जात आहे. तेहरानमधील एका निवासी इमारतीवर हल्ला होऊन २९ मुलांसह सुमारे ६० नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती इराणी अधिकाऱ्यांनी दिली. या प्रचंड जीवितहानीमुळे इराणमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इस्रायलकडे ‘Iron Dome’ ही ताकत असतानाही इराणने कसा केला संरक्षण मुख्यालयावर थेट क्षेपणास्त्र हल्ला?

नेतन्याहूंचा दावा – अणुकार्यक्रम अनेक वर्षे मागे ढकलला

नेतन्याहू म्हणाले की, या हल्ल्यांमुळे इराणचा अणुकार्यक्रम अनेक वर्षे मागे गेला आहे. त्यांनी संयम बाळगण्याचे आंतरराष्ट्रीय आवाहन नाकारून स्पष्ट केलं की, “इस्रायल आता थांबणार नाही”. त्यांच्या मते, हे हल्ले इराणच्या अयातुल्ला राजवटीविरोधातील निर्णायक पाऊल आहे.

इराणचा प्रतिहल्ला – इस्रायलमध्येही जीवितहानी

या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल, इराणनेही शुक्रवार व शनिवारी मध्यरात्री इस्रायलवर प्रत्युत्तरात्मक कारवाई केली. यामध्ये इस्रायलमध्ये किमान तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यांदरम्यान, सायरनच्या गोंगाटात नागरिकांनी सुरक्षिततेसाठी आश्रयस्थानांकडे धाव घेतली. इस्रायलच्या हवेत ड्रोन व इंटरसेप्टर मिसाईल्सचा मारा झाल्याचं दृश्यही पाहायला मिळालं. इस्रायली लष्कराने असा दावा केला आहे की, त्यांनी १५० हून अधिक लक्ष्यांवर हल्ले केले आहेत. ही मोहीम केवळ लष्करी नव्हे, तर प्रतीकात्मक व मनोवैज्ञानिक दबावाची आहे, असा संकेतही नेतन्याहूंच्या भाषणातून मिळतो.

अणुचर्चा थांबल्या, ट्रम्पचा इराणला इशारा

या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, इराणने अमेरिकेसोबत सुरू असलेल्या अणुचर्चा थांबवल्या आहेत. या चर्चांमधून युद्ध थांबण्याची शक्यता होती, मात्र आता तीही संधी लुप्त होत चालली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलच्या कारवाईचं कौतुक करत इराणला इशारा दिला आहे. ते म्हणाले की, “जर इराणने संयम पाळला नाही, तर परिस्थिती आणखी गंभीर होईल.” त्यांनी इराणला वॉशिंग्टनमध्ये होणाऱ्या चर्चांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Viral Video : इस्रायलच्या हवाई हल्ल्याने इराणचे आकाश रिकामे; जागतिक उड्डाणे मार्ग बदलू लागली

 शांतता दूर, संघर्ष अधिक तीव्र

इस्रायल-इराण संघर्षाने नव्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले आहे. तेल व ऊर्जा उद्योगांवर हल्ले, अणुचर्चांचा खंडन, आणि नेतन्याहूंचा तीव्र इशारा  यामुळे संपूर्ण पश्चिम आशियात अस्थिरता वाढली आहे. जगभरातून युद्ध थांबवण्याचे आवाहन होत असले, तरी नेतन्याहूंची भूमिका युद्धलक्ष्यीकडे स्पष्टपणे झुकलेली आहे. यामुळे पुढील काही दिवसांमध्ये परिस्थिती अधिकच गंभीर व आंतरराष्ट्रीय पातळीवर गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे.

Web Title: Iran israel war netanyahu warns oil depot hit nuclear talks paused

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2025 | 09:31 AM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Iran-Israel War
  • third world war

संबंधित बातम्या

ElFasher : सुदान गृहयुद्धाची नवी शोकांतिका; मशिदीपासून बाजारपेठेपर्यंत RSFचा कहर, ड्रोन हल्ल्यात 15 ठार, 12 जखमी
1

ElFasher : सुदान गृहयुद्धाची नवी शोकांतिका; मशिदीपासून बाजारपेठेपर्यंत RSFचा कहर, ड्रोन हल्ल्यात 15 ठार, 12 जखमी

Trillion peso March : ‘भ्रष्टाचाराचा पूर आणि जनतेचे दु:ख…’; नेपाळनंतर आता ‘या’ देशात होणार लोकशक्तीचा महास्फोट
2

Trillion peso March : ‘भ्रष्टाचाराचा पूर आणि जनतेचे दु:ख…’; नेपाळनंतर आता ‘या’ देशात होणार लोकशक्तीचा महास्फोट

Iran Revenge : जॉर्डन-सीरियापासून इराकपर्यंत… युद्धात विश्वासघात करणाऱ्या देशांवर इराण ‘असा’ घेतोय सूड
3

Iran Revenge : जॉर्डन-सीरियापासून इराकपर्यंत… युद्धात विश्वासघात करणाऱ्या देशांवर इराण ‘असा’ घेतोय सूड

Middle East : आखाती देश आक्रमण करणार… कतारने दिला इशारा, इस्रायलला मिळणार चोख प्रत्युत्तर
4

Middle East : आखाती देश आक्रमण करणार… कतारने दिला इशारा, इस्रायलला मिळणार चोख प्रत्युत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.