Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Big News ! तेहरानमध्ये मारला गेला हमास प्रमुख इस्माईल हानिया; अंगरक्षकही ठार

'इराण रिव्होल्युशनरी गार्ड्स'ने याबाबत माहिती देताना म्हटले की, 'हा हल्ला बुधवारी सकाळी झाला असून, या घटनेची चौकशी करण्यात येत आहे. इस्माईल हनिया याच्या हत्येनंतर शोक व्यक्त करण्यात आला आहे'. दरम्यान, याबाबत इस्रायलकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली गेली नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 31, 2024 | 12:25 PM
Big News ! तेहरानमध्ये मारला गेला हमास प्रमुख इस्माईल हानिया; अंगरक्षकाचाही मृत्यू

Big News ! तेहरानमध्ये मारला गेला हमास प्रमुख इस्माईल हानिया; अंगरक्षकाचाही मृत्यू

Follow Us
Follow Us:

तेहरान : गेल्या काही महिन्यांपासून इस्त्रायल-हमासमध्ये युद्ध सुरू आहे. यामध्ये दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले केले जात आहेत. त्यातच आता हमास प्रमुख इस्माईल हानिया याची हत्या करण्यात आली माहिती समोर आली आहे. इराणस्थित काही ठिकाणांकडून हल्ले करण्यात आले. याच हल्ल्यात हानिया याला मारण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, हा हल्ला इस्त्रालय देशाने केल्याचा आरोप आता केले जात आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्माईल हानियाची इराणमध्ये हत्या करण्यात आली आहे. इराणच्या लष्कराने म्हणजेच ‘इराण रिव्होल्युशनरी गार्ड्स’नेही याला दुजोरा दिला आहे. इस्माईल हानियाच्या तेहरानमधील घरावर हल्ला करण्यात आला, ज्यात इस्माईल हानियाचा त्याच्या एका अंगरक्षकासह मृत्यू झाला. हमासनेही इस्माईल हनियाच्या हत्येची कबुली दिली असून, यासाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे.

हेदेखील वाचा

पुणेकरांनो सावधान ! झिकाच्या रुग्णसंख्येत होतीये मोठी वाढ; रुग्णसंख्या पोहोचली…

‘इराण रिव्होल्युशनरी गार्ड्स’च्या याबाबत माहिती देताना म्हटले की, ‘हा हल्ला बुधवारी सकाळी झाला असून, या घटनेची चौकशी करण्यात येत आहे. या निवेदनात इस्माईल हनिया याच्या हत्येनंतर शोक व्यक्त करण्यात आला असून, पॅलेस्टाईनच्या जनतेला पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे. हमासनेही इस्माईल हनियाच्या मृत्यूला दुजोरा देणारे निवेदन जारी केले आहे. या हत्येचा आरोप इस्रायलवरही केला आहे.

हेदेखील वाचा

‘लाडक्या बहिणीं’ना आता तीन गॅस सिलेंडर मोफत; योजनेचा शासन निर्णयही जारी

इस्त्रायलकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही

दरम्यान, या हल्ल्यानंतर इस्त्रायलवर आरोप केले जात आहेत. मात्र, याबाबत इस्रायलकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली गेली नाही. याआधी मंगळवारी इस्माईल हनिया यांनी इराणच्या नव्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती आणि इराणच्या सर्वोच्च नेत्याचीही भेट घेतली होती.

Web Title: Ismail haniyeh hamas chief ismail haniyeh killed in attack the bodyguard also died nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2024 | 12:06 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.