Israel attacks Yemeni ports, After Iran, now 'Operation Black Plague' launched against Houthi rebels
Israel Attack on Yemen Houthi Rebels : जेरुसेलम : इराण आणि इस्रायलमधील संघर्ष सध्या काहीसा शांत झाला आहे. परंतु इराणनंतर आता इस्रायलने येमेनच्या हुथी बंडखोरांविरोधात मोठी कारवाई सुरु केली आहे. नुकतेच इस्रायली सैन्याने येमनेच्या हुथी बंडखोरांना पुन्हा लक्ष्य केले आहे. यामुळे पुन्हा एकदा मध्य पूर्वेत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. इस्रायलने येमेनेच्या तीम प्रमुख बंडरांवर हल्ले केले आहे. या लष्करी कारवाईला इस्रायलमे ऑपरेशन ब्लॅग प्लॅग असे नाव दिले आहे.
याअंतर्गत इस्रायलने येमेनच्या पश्चिम भागातील तीन महत्त्वाच्या बंदरांवर हुदयदाह, रास इसा आणि सैफवर मोठे हवाई हल्ले केले आहे. या हल्ल्यात हुथींच्या नियंत्रणाखालील बंदरांचे मोठे नुकसान झाले असल्याचा दावा करण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हल्ल्यामुळे बंदरावरील अनेक जहाजांना प्रचंड आग लागली आहे. तसेच ५०० हून अधिक कंटेनर आणि ५० हून अधिक बोटी जळून खाक झाले आहेत.
इस्रायली सैन्याने येमेनच्या तीन बंदरांवर हल्ला करण्यापूर्वी परिसरातील नागरिकांना तात्काळ परिसर सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा इशारा दिला होता. इस्राली सैन्याने कधीही हल्ला होऊ शकतो असे म्हटले होते. सैन्याच्या इशाऱ्यानंतर काही तासांताच हवाई हल्ले सुरु झाले. यामुळे परिसरातील लोकांची जीव वाचवण्यासाठी पळापळ सुरु झाली. अद्याप कोणत्याही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही.
याच वेळी इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलेंट यांनी या हल्ल्यांना दुजोरा दिला होता. तसेच त्यांनी हुथी बंडखोरांना कडक इशाराही दिला आहे की इस्रायलविरोधी कोणतीही कारवाई केल्यास त्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागली. इराण आणि हमासप्रमाणेच हुथींना नष्ट करण्यात येईल.
याच वेळी इस्रायलच्या डिफेन्स फोर्सने एक निवेदन जारी केली आहे. यामध्ये हुथींवरील हल्ल्याचे कारण स्पष्ट करण्यात आले आहेत. IDF ने जारी केलेल्या निवेदनानुसार, हुथीं बंडखोर इस्रायलविरोधी दहशतवादी योजना आखत होते. याला प्रत्युत्तर म्हणून इस्राली सैन्याने त्यांच्यावर हल्ला केला असल्याचे म्हटले आहे. इस्रायलने म्हटले आहे की, इस्रायलविरोधी कोणत्याही कारवाईला सहन केले जाणार नाही, त्याचे हात कापले जातील. इस्रायली हवाई दलाने येमेनच्या अल हुदायदाह, रास ईसा, सलिफ आणि रास कनातिब येथील हौथी दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. तर या हल्ल्यात गॅलेक्सी लीडर नावाच्या जहाजालाही लक्ष्य करण्यात आले आहे.
PM Modi : UNSC आणि WTO मध्ये मोठ्या सुधारणा गरजेच्या; BRICS शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींचं स्पष्ट मत