इस्रायलचा बेरूतच्या दक्षिणेकडील भागात बॉम्ब वर्षाव; हिजबुल्लाचे अनेक ठिकाणे नष्ट
बेरूत: सध्या इस्त्रायल हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष तीव्र वाढत चालला आहे. इस्त्रायल सतत हिजबुल्लाहवर हल्ले करत आहेत. दरम्यान आणखी एक हल्ला इस्त्रायलने बेरूतच्या दक्षिणेकडील भागांवर केला आहे. हे हल्ले बुधवारी पहाटे बेरूतमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर करण्यात आले. मीडिया रिपोर्टनुसार, इस्रायलने सहा दिवसांत प्रथमच राजधानीच्या उपनगरावर हल्ला केले आहेत. मात्र, या हल्ल्यात कोणती जीवितहानी झाली की नाही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
लेबनॉनचे पंतप्रधान यांना अमेरिकेने इस्रायली हल्ले कमी करण्यासाठी आश्वासन दिले होते
या घटनेच्या पार्श्वभूमीवर, लेबनॉनचे पंतप्रधान नजीब मिकाती यांनी अमेरिकेने इस्रायली हल्ले कमी करण्यासाठी आश्वासन दिल्याच्या एक दिवसानंतर हे हल्ले करण्यात आले आहेत. इस्रायली लष्कराने या हल्ल्याचे कारण स्पष्ट करताना म्हटले की, बेरूतच्या उपनगरातील हिजबुल्लाच्या शस्त्रास्त्रांच्या गोदामांना लक्ष्य केले असून त्यांनी या भागातील हिजबुल्लाच्या मालमत्तांचे ठिकाणे असल्याने नष्ट केले आहेत.
इस्त्रायलने आधीच इशारा दिला होता
मिळालेल्या माहितीनुसार, या भागात अनेक रहिवासी आणि व्यावसायिकांची गर्दी असल्यामुळे हल्ल्यामुळे नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. इस्रायली लष्कराने एक्सवर याबाबत एक पोस्ट करत या हल्ल्यांचा इशारा दिला होता की, हारेत-हारिक भागातील इमारतींमध्ये हल्ले होणार असून, नागरिकांनी तेथून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे.
मीडिया रिपोर्टनुसार, हिजबुल्लाने 8 ऑक्टोबरपासून पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासच्या समर्थनार्थ इस्रायलवर रॉकेट हल्ले करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात इस्रायलने लेबनॉनच्या दक्षिणेकडील भागांवर सतत हवाई हल्ले सुरूच ठेवले. या इस्रायली हल्ल्यांमध्ये 15 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर या हल्ल्यांमध्ये अनेक लोक जखमी झाले असल्याची माहिती आहे. इस्रायलने या हल्ल्यांबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या आठवड्याच्या हल्ल्यांमुळे लेबनॉन आणि इस्रायलमधील तणाव पुन्हा वाढला आहे.