Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

War Alert: इकडे तेल अवीवमध्ये PM मोदी, तर ‘तिकडे’ लँड झाले अनेक अमेरिकन F-22 फायटर जेट; ‘इस्लामिक नाटो’चे अस्तित्व संपवणारा प्लॅन

US F-22 Fighter in Israel:अमेरिकेने इस्रायलमध्ये एफ-२२ रॅप्टर जेट्स आणि यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड विमानवाहू युद्धनौका तैनात केली आहे, ज्यामुळे मोदी इस्रायलमध्ये असताना इराणवर हल्ला होण्याची शक्यता वाढली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 25, 2026 | 12:16 PM
pm modi israel visit f22 raptor deployment hexagon alliance iran war threat

pm modi israel visit f22 raptor deployment hexagon alliance iran war threat

Follow Us
Follow Us:
  • युद्धजन्य परिस्थिती
  • नेतान्याहूंची मोठी खेळी
  • इराणवर हल्ल्याचे सावट

PM Modi Israel visit February 2026 updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi) आज दोन दिवसांच्या ऐतिहासिक दौऱ्यावर इस्रायलमध्ये (Israel) दाखल होत आहेत. मात्र, मोदींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य पूर्वेतील रणांगण अक्षरशः तापले आहे. भारताचे पंतप्रधान इस्रायलच्या भूमीवर पाऊल ठेवण्यापूर्वीच अमेरिकेने ( America) आपल्या सर्वात घातक ‘F-22 रॅप्टर’ लढाऊ विमानांची तुकडी इस्रायलमध्ये उतरवली आहे. या लष्करी हालचाली केवळ संरक्षणासाठी नसून, इराणवर होणाऱ्या संभाव्य महायुद्धाची ही नांदी असल्याचे मानले जात आहे.

F-22 रॅप्टर आणि जगातील सर्वात मोठी युद्धनौका तैनात

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी आणि इराणला जरब बसवण्यासाठी अमेरिकेने आपली अण्वस्त्रसज्ज विमानवाहू युद्धनौका ‘यूएसएस गेराल्ड आर. फोर्ड’ इस्रायलच्या समुद्रकिनाऱ्याजवळ उभी केली आहे. ही जगातील सर्वात शक्तिशाली युद्धनौका मानली जाते. सोबतच, इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात स्टेल्थ फायटर जेट्स (F-22) या भागात तैनात करण्यात आले आहेत. तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत मोदी इस्रायलमध्ये आहेत, तोपर्यंत अमेरिका शांत राहील, मात्र मोदी मायदेशी परतताच इराणच्या विरोधात मोठी लष्करी कारवाई सुरू होऊ शकते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Turkey F-16 Crash: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! उड्डाणानंतर काही मिनिटांतच तुर्कीचे F-16 फायटर जेट कोसळले; पहा भयानक VIDEO

काय आहे ‘षटकोनी अलायन्स’ (Hexagon Alliance)?

पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मांडलेला ‘षटकोनी अलायन्स’चा प्रस्ताव. नऊ वर्षांनंतर मोदी दुसऱ्यांदा इस्रायलमध्ये आले आहेत आणि नेतान्याहू यांनी या भेटीचे औचित्य साधून एक नवीन जागतिक युती जाहीर केली आहे. या युतीमध्ये भारत, इस्रायल, ग्रीस आणि सायप्रस यांचा समावेश असून, ही आघाडी मध्य पूर्वेतील वाढत्या कट्टरपंथी शक्तींना आणि दहशतवादाला पायबंद घालण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

Honoured by the gesture. Looking forward to addressing the Knesset later today. @KnessetENG https://t.co/0PaG9Nutmy — Narendra Modi (@narendramodi) February 25, 2026

credit – social media and Twitter

‘इस्लामिक नाटो’ला भारताचा आणि इस्रायलचा इशारा!

सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्की यांनी एकत्र येऊन ‘इस्लामिक नाटो’ नावाचा सुरक्षा करार केला आहे. या कराराला शह देण्यासाठी नेतान्याहू यांनी भारताला सोबत घेऊन ‘षटकोनी अलायन्स’ची घोषणा केली आहे. ही केवळ राजकीय युती नसून यामध्ये गुप्तचर माहितीची देवाणघेवाण, प्रगत संरक्षण तंत्रज्ञान आणि सागरी सुरक्षा यावर भर दिला जाणार आहे. या अलायन्समुळे पाकिस्तान आणि तुर्कीच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

मोदींचा दौरा आणि संरक्षणाचे नवे करार

पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यात भारत आणि इस्रायलमध्ये कोट्यवधी डॉलर्सच्या संरक्षण करारांवर स्वाक्षरी होणार आहे. यामध्ये क्षेपणास्त्र प्रणाली, ड्रोन तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षेचा समावेश असेल. मोदी तेल अवीवमध्ये पोहोचताच त्यांचे भव्य स्वागत झाले असून, नेतान्याहू स्वतः प्रोटोकॉल तोडून त्यांना भेटण्यासाठी आले आहेत. भारताची भूमिका या युद्धजन्य परिस्थितीत अत्यंत महत्त्वाची आहे, कारण भारत एका बाजूला शांततेचे आवाहन करत आहे, तर दुसरीकडे आपल्या धोरणात्मक हितासाठी इस्रायलसोबत भक्कमपणे उभा आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-US Trade: व्यापार करार की केवळ कागदी घोडे? भारत-अमेरिका महत्त्वाची बैठक रद्द; ट्रम्पच्या ‘अशा’ विधानाने उडाला गोंधळ

इराणवर हल्ल्याची टांगती तलवार

इराणने आपला अणुकार्यक्रम थांबवण्यास नकार दिल्यामुळे अमेरिका आता ‘करो या मरो’च्या भूमिकेत आहे. पंतप्रधान मोदी भारतात परतल्यानंतर काही तासांतच इस्रायल आणि अमेरिका इराणच्या महत्त्वाच्या तळांना लक्ष्य करू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जर हे घडले, तर तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात इथूनच होऊ शकते, अशी भीती आंतरराष्ट्रीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने इस्रायलमध्ये F-22 विमाने का तैनात केली आहेत?

    Ans: इराणकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षा कवच मजबूत करण्यासाठी अमेरिकेने ही विमाने तैनात केली आहेत.

  • Que: 'षटकोनी अलायन्स' (Hexagon Alliance) म्हणजे काय?

    Ans: ही इस्रायलने प्रस्तावित केलेली एक नवीन संरक्षण युती आहे, ज्यामध्ये भारत, इस्रायल, ग्रीस आणि सायप्रस सामील आहेत. याचा मुख्य उद्देश कट्टरपंथी शक्तींविरुद्ध लढा देणे आहे.

  • Que: मोदींच्या दौऱ्यानंतर इराणवर हल्ला का होऊ शकतो?

    Ans: राजनैतिक प्रोटोकॉलनुसार, महत्त्वाचे पाहुणे देशात असताना मोठे लष्करी हल्ले टाळले जातात. मोदी भारतात परतल्यानंतर अमेरिका आणि इस्रायल कारवाई करण्यास मोकळे असतील.

Web Title: Pm modi israel visit f22 raptor deployment hexagon alliance iran war threat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 12:16 PM

Topics:  

  • Iran Vs America
  • Israel
  • PM Narendra Modi
  • World War 3

संबंधित बातम्या

अखेर इज्राइल मधल्या निवडणुका जाहीर, २७ ऑक्टोबरला नेतन्याहू यांचे भविष्य ठरणार, काय आहेत महत्वाचे मुद्दे?
1

अखेर इज्राइल मधल्या निवडणुका जाहीर, २७ ऑक्टोबरला नेतन्याहू यांचे भविष्य ठरणार, काय आहेत महत्वाचे मुद्दे?

Gaza News : गाझावासीयांसाठी FIFA World Cup चे स्क्रीनिंग करणाऱ्या सोशल वर्करचा मृत्यू; इस्रायलने हत्या केली?
2

Gaza News : गाझावासीयांसाठी FIFA World Cup चे स्क्रीनिंग करणाऱ्या सोशल वर्करचा मृत्यू; इस्रायलने हत्या केली?

India-Qatar ties : कतारचे ‘राष्ट्रपिता’ शेख हमद अल थानी यांचे निधन; भारताने का जाहीर केला राष्ट्रीय शोक? जाणून घ्या नियम
3

India-Qatar ties : कतारचे ‘राष्ट्रपिता’ शेख हमद अल थानी यांचे निधन; भारताने का जाहीर केला राष्ट्रीय शोक? जाणून घ्या नियम

Israel Election 2026 : इस्रायलमध्ये निवडणुकांचा बिगुल वाजला; नेतन्याहू पुन्हा सत्तेत येणार?
4

Israel Election 2026 : इस्रायलमध्ये निवडणुकांचा बिगुल वाजला; नेतन्याहू पुन्हा सत्तेत येणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.