Israel Lebnon War : इस्रायल माघार घेणार? लेबनॉनचा युद्धबंदीचा प्रस्ताव, जनतेला एकजुटीचे आवाहन (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
राष्ट्रपती आउन यांनी म्हटले की, सध्याच्या काळात केवळ गोळीबार थांबवण्याचे उद्दिष्ट नाही तर भविष्यात कोणत्याही मोठ्या युद्धाचा भडका उडणार नाही यासाठी आराखडा आखला जात आहे. सध्या आपण एक आशा टप्प्यावर आहोत जिथे सर्वात जास्त लेबनॉन(Lebanon)चे सार्वभौमत्व आणि सुरक्षा सुनिश्चित करणे महत्वचा आहे. यामुळे कायमस्वरुपी करारची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. या कायस्वरुपी युद्धबंदीमुळे लेबनॉनच्या विस्थापित झालेल्या नागरिकांना त्यांच्या घरी परतता येईल. देशांच्या सीमांचे संरक्षण होईल.
याच पार्श्वभूमीवर त्यांनी जनतेला आणि देशातील सर्व पक्षांना एक येण्याचे आवाहन केले आहे. संविधान आणि सरकारच्या नेतृत्त्वाखाली एकजूट राहणे सध्याच्या परिस्थिती महत्त्वाचे असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटले. बाह्य हस्तक्षेप आणि अंतर्गत मतभेदांमुळे धोका निर्माण होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान या शांतता प्रक्रियेसाठी हिजबुल्लाहने सहमती दिली आहे. हिजबुल्लाहने युद्धातून माघार घेण्यास तयारी दर्शवली आहे. परंतु इस्रायलला लेबनॉनमधून सैन्य उपस्थिती पूर्णपणे हटवावी अशी अट टाकली आहे. तोपर्यंत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही असे हिजबुल्लाहने म्हटले आहे. तर दुसरीकडे इस्रायलने अद्याप सैन्य कारवाया थांबवलेल्या नाहीत. यामुळे तणाव कायम आहे.
अमेरिका आणि इतर देशांच्या मध्यस्थीने शांतता चर्चा सुरु आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले असून ही चर्चा यशस्वी झाल्यास मध्यपूर्वेतील मोठा संघर्षाचा अंत होईल. दुसरीकडे इराण अमेरिका युद्ध(US Iran War) ही संपुष्टात येण्याची आशा व्यक्त केली जात आहे. प्रादेशिक आणि जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
Pakistan News : ट्रम्प यांची चमचागिरी फळली! पाकिस्तानला IMF कडून १.२ अब्ज डॉलर्सचा निधी मंजूर






