Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel-Lebanon Tension :इस्रायलचा लेबनॉनला इशारा; ‘हिजबुल्लाचा धोका संपेपर्यंत सुरक्षा क्षेत्रात सैन्य तैनात ठेवणार

Israel-Lebanon Tension : ट्रम्प यांच्या गाझा शांती कराराला नकार दिल्यानंतर इस्रायल कडून आता लेबनॉन मधील सैन्य माघार घेण्यावर नकार आला आहे . जे कारण त्यांनी हमास बद्दल दिलं होतं तेच कारण लेबनॉनच्या हिजबुल्ला बद्दल दिलं आहे . यावर पुन्हा जागतिक पातळीवर वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 13, 2026 | 08:30 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेच्या भूमिकेमुळे समीकरण गुंतागुंतीचे
  • काट्झचे निर्देश
Israel-Lebanon Tension  : हिजबुल्लाचे पूर्ण नि:शस्त्रीकरण आणि लेबनॉनमधील त्याचा धोका संपेपर्यंत दक्षिण लेबनॉनमधील सुरक्षा क्षेत्रातून इस्रायली सैन्य माघार घेणार नसल्याचे संरक्षणमंत्री इस्रायल काट्झ यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे इस्रायल-लेबनॉनमधील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इस्रायल आणि हिजबुल्लामधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण लेबनॉनमधील परिस्थिती पुन्हा गंभीर बनण्याची चिन्हे आहेत. इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल काट्झ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, हिजबुल्लाची शस्त्रे काढून घेतली जात नाहीत आणि संपूर्ण लेबनॉनमधील या संघटनेचा धोका दूर होत नाही, तोपर्यंत इस्रायली सैन्य दक्षिण लेबनॉनमधील सुरक्षा क्षेत्रातून माघार घेणार नाही.

OpenAI News : OpenAI मधील ‘एथिक्स’ प्रमुखांची वर्षभरातच एक्झिट; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांमुळे चर्चेला उधाण

काट्झ यांच्या या वक्तव्यामुळे इस्रायलची लेबनॉनमधील लष्करी उपस्थिती किती काळ कायम राहणार, यावर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. इस्रायलचे म्हणणे आहे की, उत्तरेकडील इस्रायली नागरिकांच्या सुरक्षेसाठी हिजबुल्लाची लष्करी क्षमता संपवणे आवश्यक आहे. हिजबुल्लाकडे शस्त्रे आणि लष्करी पायाभूत सुविधा अस्तित्वात असताना इस्रायलच्या सीमेजवळ पुन्हा हल्ल्यांचा धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा इस्रायल करत आहे.

अमेरिकेच्या भूमिकेमुळे समीकरण गुंतागुंतीचे

लेबनॉनमधून इस्रायली सैन्याची टप्प्याटप्प्याने माघार आणि हिजबुल्लाच्या नि:शस्त्रीकरणाला जोडणाऱ्या अमेरिकेच्या मध्यस्थीच्या प्रयत्नांमध्ये सध्या महत्त्वाची चर्चा सुरू आहे. या प्रक्रियेनुसार हिजबुल्लाचे नि:शस्त्रीकरण आणि दक्षिण भागात लेबनॉनच्या सैन्याचे नियंत्रण मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मात्र हिजबुल्लाने इस्रायलच्या सैन्याची माघार होण्यापूर्वी आपल्या शस्त्रांबाबत चर्चा करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या भूमिकांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. इस्रायल माघारीपूर्वी हिजबुल्लाचे नि:शस्त्रीकरण आवश्यक मानत आहे, तर हिजबुल्ला आधी इस्रायली सैन्याने लेबनॉनची भूमी सोडावी, अशी भूमिका घेत आहे.

Nepal Communal Violence : नेपाळच्या मधेशमध्ये धार्मिक तणावाचा स्फोट; भारताच्या सीमेसमोर नवे सुरक्षा आव्हान ?

काट्झचे निर्देश

या पार्श्वभूमीवर काट्झ यांनी इस्रायली सैन्याला दीर्घकाळ सुरक्षा क्षेत्रात उपस्थित राहण्याची तयारी करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हा संघर्ष केवळ सीमावर्ती लष्करी कारवाईपुरता मर्यादित न राहता दीर्घकालीन सुरक्षा आणि राजकीय संघर्षात बदलण्याची शक्यता आहे.

लेबनॉनकडून मात्र इस्रायली सैन्याची उपस्थिती आणि दक्षिण भागातील कारवायांना विरोध केला जात आहे. इस्रायलने माघार घ्यावी आणि लेबनॉनच्या सार्वभौमत्वाचा आदर करावा, अशी मागणी लेबनॉनकडून होत आहे.

दरम्यान, इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी सुरू असलेल्या राजनैतिक प्रयत्नांसमोर काट्झ यांच्या भूमिकेमुळे नवे आव्हान उभे राहिले आहे. हिजबुल्लाचे नि:शस्त्रीकरण, लेबनॉनच्या सैन्याचे नियंत्रण आणि इस्रायली सैन्याची माघार या तीन मुद्द्यांवर तोडगा निघाल्याशिवाय दक्षिण लेबनॉनमधील तणाव कमी होणे कठीण असल्याचे चित्र आहे.

Web Title: Israel lebanon tension israel warns lebanon troops to remain deployed in the security zone until the hezbollah threat is eliminated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • Israel and Lebanon War
  • Israel attacks Lebanon
  • Middle East War Impact

संबंधित बातम्या

Saudi-Pakistan-Turkey Pact : सौदीला अण्वस्त्रांपासून रोखण्यासाठी अमेरिकेचा ‘इस्लामिक NATO’ डाव?
1

Saudi-Pakistan-Turkey Pact : सौदीला अण्वस्त्रांपासून रोखण्यासाठी अमेरिकेचा ‘इस्लामिक NATO’ डाव?

Yemen Attack : हुथींच्या हल्ल्यात सरकारी दलांचे ४ जवान ठार; २० जखमी
2

Yemen Attack : हुथींच्या हल्ल्यात सरकारी दलांचे ४ जवान ठार; २० जखमी

Foreign Investment : शेखांच्या हाती सूत्रे जाताच ‘या’ भारतीय बँकेचं नशीब बदललं! नफ्यात 18 % दणदणीत वाढ; अहवालात मोठा खुलासा
3

Foreign Investment : शेखांच्या हाती सूत्रे जाताच ‘या’ भारतीय बँकेचं नशीब बदललं! नफ्यात 18 % दणदणीत वाढ; अहवालात मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.