फोटो सौजन्य सोशल मीडिया
इस्रायलच्या वसाहतींचा विस्तार , पॅलेस्टिनींची घरे पाडणे , शेतीवर अतिक्रमण करणे तसेच त्यांना त्यांच्या दैनंदिन हालचालींमध्ये व्यत्यय आणून त्यांना त्रास देणे या सगळ्यामुळे तेथील नागरिकांचे जीवन अजूनच कठीण बनले आहे . यासगळ्यानंतर मात्र २७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत आपल्याला कोणतेही प्रतिनिधित्व किंवा प्रभावी राजकीय स्थान नसल्याची खंत या नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे .
वेस्ट बँकमधील जाबल अल बाबा या बेदुईन समुदायातील नागरिकांच्या मते , इस्रायली प्रशासन त्यांच्या दैनंदिन जीवनातील जवळपास प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवायला लागले आहे . घर बांधणे , पाण्याची उपलब्धता , रस्त्यांचा वापर, शेती वरील आक्रमण तसेच एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणे येणे यावरसुद्धा त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे .
या भागातील लोकांचे म्हणणे आहे कि इस्रायलच्या या अशा अमानवी धोरणांमुळे आमचे जीवन आणि भविष्य यावर नकारात्मक परिणाम होणार आहे .मात्र सरकार निवडण्याच्या प्रक्रियेत मात्र त्यांना सहभागी होता येत नाही . दुसरीकडे वेस्ट बँकमधील इस्रायली वसाहतींमध्ये राहणाऱ्या ज्यू नागरिकांना इस्रायलच्या राष्ट्रीय निवडणुकीत मतदानाचा अधिकार आहे . यासगळ्यामुळे या दोन्ही समुदायामधील राजकीय अधिकारांचा फरक अधिक ठळकपणे समोर येत आहे .
वेस्ट बँकमध्ये इस्रायली वसाहतींचा विस्तार हा पॅलेस्टिनी नागरिकांसाठी मोठा चिंतेचा विषय बनला आहे . खासकरून जेरुसलेम जवळील E १ प्रकल्पामुळे अनेक बेदूईन समुदायांना विस्थापनाचा धोका निर्माण झाला आहे . या प्रकल्पामुळे वेस्ट बँकेचा भौगोलिक संपर्क ही विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे .
पॅलेस्टिनी नागरिकांना घर बांधण्यासाठी परवानगी मिळवणे अत्यंत कठीण असल्याचा आरोप केला जातो . परवानगी नसल्याचा कारणावरून अनेक घरांवर कारवाई केली जाते . मात्र त्याच परिसरात इस्रायली वसाहतींच्या बांधकामाला प्रोत्साहन दिले जात असल्याचा विरोधाभासही नागरिकांकडून मांडला जात आहे .
२७ ऑक्टोबरच्या निवडणुकीत इस्रायलमध्ये कोणाचे सरकार येणार , याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे . मात्र पॅलेस्टिनी नागरिकांना निवडणुकीच्या निकालातून आपल्या परिस्थितीत फारसा बदल होईल ,अशी अपेक्षा नाही . इस्रायलमधील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या धोरणांमध्ये वसाहतींच्या मुद्द्यावर फारसा मूलभूत फरक नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे . त्यामुळे इस्रायली आगामी निवडणुकीत पॅलेस्टिनींसाठी आशेचा किरण ठरणार कि त्यांची राजकीय उपेक्षा कायम राहणार .
Ans: इस्रायलच्या वसाहतींचा विस्तार , घरांची पाडकामे आणि हालचालींवरील निर्बंधामुळे पॅलेस्टिनी नागरिक त्रस्त आहेत . त्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या निर्णयांमध्ये त्यांचा आवाज नाही .
Ans: वेस्ट बँकमधील पॅलेस्टानी नागरिकांना इस्रायलच्या राष्ट्रीय निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाही . त्यामुळे इस्रायलचे सरकार निवडण्याचा प्रक्रियेत त्यांना सहभागी होता येत नाही .






