Japan's 1st Women Prime Minister:
Japan’s 1st Women Prime Minister: जपानच्या राजकारणात ऐतिहासिक क्षण आला आहे. संसदेच्या कनिष्ठ सभागृहात बहुमत मिळवत लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या (एलडीपी) नेत्या साने ताकाइची या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनणार आहेत. आज त्यांचा शपथविधी समारंभ पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. ६४ वर्षांच्या साने ताकाइची या जपानच्या “आयर्न लेडी” म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या माजी ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्या मोठ्या प्रशंसकदेखील आहेत.
पंतप्रधानपदासाठीचा हा त्यांचा तिसरा प्रयत्न होता. गेल्या पाच वर्षांपासून सत्तेत असताना पक्षातील विविध अडचणींना तोंड देत सत्तेचा ताबा राखणाऱ्या ताकाइची आता सलग चौथ्या कार्यकाळासाठी पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. जपानमधील जनता या खास प्रसंगी आनंद व्यक्त करत आहे.
फ्रान्सचे माजी अध्यक्ष सार्कोझी यांना 5 वर्षांचा तुरुंगावास, VIP कारावासत एकांतात भोगणार शिक्षा
पंतप्रधान मोदींनी साने ताकाची यांचे अभिनंदन
जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधानपदासाठी निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साने ताकाइची यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी सोशल मीाडियावर पोस्ट करत म्हणाले की, “साने ताकाइ यांची जपानच्या पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी मी तुमच्यासोबत जवळून काम करण्यास उत्सुक आहे. इंडो-पॅसिफिक आणि त्यापलीकडे शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी आमचे वाढत जाणारे संबंध महत्त्वाचे आहेत.” असही त्यांनी म्हटलं आहे.
जपानच्या नवनिर्वाचित पंतप्रधान साने ताकाची माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या “मुक्त आणि खुल्या इंडो-पॅसिफिक” धोरणाचे समर्थन करतात. त्या युनायटेड स्टेट्स आणि क्वाड्रीलॅटरल सिक्युरिटी डायलॉग (क्वाड) सोबत सखोल सहकार्य वाढवण्यास कटिबद्ध आहेत.
क्वाड ही ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि युनायटेड स्टेट्समधील राजनैतिक भागीदारी आहे, जी इंडो-पॅसिफिक क्षेत्रात स्थिरता, शांतता, समृद्धी, समावेश आणि लवचिकता सुनिश्चित करण्यासाठी काम करते. साने प्रादेशिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी भागीदारांमधील घट्ट संबंधांना महत्त्व देतात, तसेच चीन आणि उत्तर कोरियाविरुद्ध कट्टर भूमिका घेण्यास तयार आहेत. साने ताकाची संरक्षण खर्च वाढवण्याचे वचनही देतात. सध्या जपानचे संरक्षण बजेट त्याच्या एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) सुमारे १.८ टक्के एवढा आहे.
तकाइची यांच्या समोर जपानमधील घटती लोकसंख्या थांबवणे आणि जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था पुन्हा तयार करणे, अशी आव्हाने असणार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाची अल्पसंख्याक सत्ता असल्यामुळे, नवीन युतीला कायदे मंजूर करण्यासाठी इतर पक्षांचा पाठिंबा मिळवणे आवश्यक आहे. ताकाची यांनी आधीच आक्रमक आर्थिक धोरणांचे समर्थन केले असून सरकारी खर्च वाढवण्याचे निर्णय घेतले आहेत, जे त्यांच्या मार्गदर्शक, माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या “अबेनोमिक्स” धोरणाशी सुसंगत आहेत.
ताकाइची हेवी-मेटल ड्रमर आणि बाईकर देखील आहेत. १९९३ मध्ये पहिल्यांदा त्यांच्या मूळ गावी नारा येथून निवडून आल्यापासून, ताकाइची यांनी आर्थिक सुरक्षा, अंतर्गत व्यवहार आणि लिंग समानता यासह अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. त्यांनी मार्गारेट थॅचर यांना राजकीय आदर्श म्हणून उद्धृत केले आहे. ताकाइची यांना परराष्ट्र व्यवहारांवर कट्टरपंथी मानले जाते.
क्योडो वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, जपानच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या पहिल्या फेरीत साने ताकाची यांनी स्पष्ट बहुमत मिळवले, ज्यामुळे दुसऱ्या फेरीच्या मतदानाची आवश्यकता भासली नाही. ६४ वर्षीय ताकाइची यांनी ४६५ पैकी २३७ मते मिळवली, तर कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते योशिहिको नोडा यांना १४९ मते मिळाली. ही माहिती जपानच्या अधिकृत वृत्तसंस्थेद्वारेही पुष्टी करण्यात आली आहे.