Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Marathi news Live Blog- चालू वर्षाच्या सुरुवातीलाच दिवंगत नेते अजित पवार यांनी जिल्हा नियोजन आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 11, 2026 | 06:58 PM
Maharashtra breaking News Marathi

Maharashtra breaking News Marathi

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra to World Breaking News:

 सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्या पुण्यात महत्त्वाची बैठक

पुणे: राज्याच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्या पुणे जिल्हा नियोजन समितीची (DPC) महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांची ही पहिलीच नियोजन बैठक असून, यामध्ये आगामी २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या जिल्ह्याच्या प्रारूप विकास आराखड्याला मंजुरी दिली जाणार आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर होत असलेल्या या पहिल्याच बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चालू वर्षाच्या सुरुवातीलाच दिवंगत नेते अजित पवार यांनी जिल्हा नियोजन आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा परिषद आणि विविध शासकीय विभागांनी विकास कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करून हा आराखडा तयार केला आहे.

 

 

 

The liveblog has ended.
  • 11 Feb 2026 06:58 PM (IST)

    11 Feb 2026 06:58 PM (IST)

    Thailand Firing: थायलंडमध्ये क्रूर नरसंहार! शाळेत घुसून अंधाधुंद गोळीबार; २२ निष्पाप बालकांसह ३४ जणांचा मृत्यू

    Thailand Firing News: थायलंडच्या हात याई जिल्ह्यात एक भयानक घटना घडली आहे, जिथे बंदूकधारींनी एका शाळेत घुसून अंदाधुंद गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात २२ निष्पाप मुलांसह एकूण ३४ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पोलिसांच्या अहवालानुसार, शाळा बंद होण्याच्या बेतात असताना हल्लेखोर शाळेत घुसले. बंदूकधार्‍यांनी केवळ खून केले नाहीत तर शाळेच्या इमारतीत अनेक शिक्षक आणि विद्यार्थ्यांना ओलीस ठेवले.

  • 11 Feb 2026 06:46 PM (IST)

    11 Feb 2026 06:46 PM (IST)

    Bangladesh election : बांगलादेशच्या राजकारणातून महिला शक्ती गायब; कोण होणार देशाचा नवा ‘नायक’?

    बांगलादेशी राजकारणात तीन दशके वर्चस्व गाजवणाऱ्या शेख हसीना आणि खालिदा झिया या दोन महिला नेत्यांशिवाय ही पहिली निवडणूक आहे. शेख हसीना यांच्या अवामी लीगला सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. हसीनांच्या प्रतिस्पर्धी खालिदा झिया यांचे डिसेंबरमध्ये निधन झाले.

  • 11 Feb 2026 06:40 PM (IST)

    11 Feb 2026 06:40 PM (IST)

    ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात घमासान! साहेबांनी TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

    ENG vs WI, T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज १५ वा सामना इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळला जात आहे. मुंबई येथील वानखेडे स्टेडियम खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात इंग्लंड संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर वेस्ट इंडिज संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरणार आहे.

  • 11 Feb 2026 06:30 PM (IST)

    11 Feb 2026 06:30 PM (IST)

    India Foundry Industry Growth: भारतीय फाउंड्री उद्योगाची झेप! इलेक्ट्रॉनिक्स, नूतनीकरणीय ऊर्जेमुळे कास्टिंग मागणीत वाढ

    India Foundry Industry Growth:  जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कास्टिंग उत्पादक असलेला भारताचा फाउंड्री उद्योग वेगाने विस्तारत असून 2024 मधील USD 23.6 अब्जांवरून 2029 पर्यंत USD 42.5 अब्जांपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा उद्योग सुमारे 9.4% चक्रवाढ वार्षिक वाढ दराने (CAGR) वाढेल, असे ‘भारत फाउंड्री 360° इनसाइट 2025–2047’ या अहवालात नमूद आहे. हा अहवाल 12 ते 14 फेब्रुवारीदरम्यान मुंबईतील नेस्को प्रदर्शन केंद्रात होणाऱ्या 74व्या इंडियन फाउंड्री काँग्रेस (IFC) आणि इंडियन फाउंड्री एक्झिबिशन (IFEX) 2026 च्या पार्श्वभूमीवर इंडियन फाउंड्री काँग्रेस ऑफ इंडिया (IFCI) यांनी सादर केला.

  • 11 Feb 2026 06:16 PM (IST)

    11 Feb 2026 06:16 PM (IST)

    Rahul Gandhi Loksabha Live : “ही ट्रेड डील नाही तर…; अमेरिकेच्या करारावर राहुल गांधींचा संसदेमध्ये जोरदार प्रहार

    Rahul Gandhi Loksabha Live : नवी दिल्ली : आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दहावा दिवस आहे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत आक्रमक भाषण केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार प्रहार केला आहे. अर्थसंकल्पावर देखील राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, अर्थसंकल्पात सध्याच्या आव्हानांचा उल्लेख नाही आणि एआय आणि डेटाशी संबंधित मुद्द्यांकडे विशेष दुर्लक्ष केले गेले आहे. (Delhi News)

  • 11 Feb 2026 06:05 PM (IST)

    11 Feb 2026 06:05 PM (IST)

    काँग्रेस खासदारांची ओम बिर्लांना शिवीगाळ; किरेन रिजीजू म्हणाले, “ते चांगल्या मनाचे नाहीतर…”

    Congress VS Om Birla Politics: सध्या राजधानी दिल्लीत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सभागृहात गेले काही दिवस गोंधळ पाहायला मिळाला. जनरल नरवणे यांच्या पुस्तकावरून खडाजंगी झाली. विरोधी पक्षाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मांडण्याची तयारी सुरू केली यह. त्यातच आता संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू यांनी कॉँग्रेस खासदारांवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे.

  • 11 Feb 2026 05:56 PM (IST)

    11 Feb 2026 05:56 PM (IST)

    Airtel युजर्ससाठी आनंदाची बातमी!

    ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे आणि सर्वात मोठे नुकसान लोक चुकून ओटीपी (OTP) शेअर करतात. फसवणूक करणारे कधीकधी बँक अधिकारी, कधीकधी डिलिव्हरी किंवा ग्राहक सेवा अधिकारी म्हणून स्वतःला सादर करतात आणि लोकांना फसवतात. या धोक्यापासून बचाव करण्यासाठी, एअरटेलने (Airtel) आपल्या ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी एक नवीन एआय-संचालित फसवणूक अलर्ट सिस्टम सुरू केली आहे, जी कॉल दरम्यान तुम्हाला वेळेत अलर्ट करू शकते.

  • 11 Feb 2026 05:25 PM (IST)

    11 Feb 2026 05:25 PM (IST)

    अनधिकृत बांधकामांवर कारवाईला गेलेल्या महापालिका पथकावर हल्ला!

    नालासोपारा पूर्वेकडेल जाबरपाडा येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी गेलेल्या वसई-विरार महापालिकेच्या पथकावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. यावेळी सहायक आयुक्तांसह कर्मचाऱ्यांना धक्काबुकी आणि शिवीगाळी करत कारवाईत अडथळा आणण्यात आला. याप्रकरणी पेल्हार पोलिस ठाण्यात पुरुष आणि महिला अशा ३० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी स्थानिक नगरसेवकांचे समर्थक असल्याचे सांगितले जात आहे. वसई-विरार महापालिका क्षेत्रातील पेल्हार आणि जाबरपाडा हा परिसर म्हणजे सध्या भूमाफिया आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांचा बालेकिल्ला बनला आहे. महापालिकेच्या सहायक आयुक्त अश्विनी मोरे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमणविरोधी पथकाने येथील २२ अनधिकृत व्यावसायिक गाळे आणि चाळी जमीनदोस्त करण्यासाठी मोहीम हाती घेतली होती.

  • 11 Feb 2026 05:09 PM (IST)

    11 Feb 2026 05:09 PM (IST)

    भारतीय संघावर गंभीर आरोप भोवला!

    क्रिकेट जगतात भारतीय फलंदाजांचे वर्चस्व फार पूर्वीपासून ओळखले गेले आहे. टीम इंडिया (Team India) नेहमीच मजबूत फलंदाजी ओळखली जाते आणि आजही भारतात सातत्याने धावा काढण्यास सक्षम असलेले अनेक खेळाडू आहेत. दरम्यान, श्रीलंकेचा फलंदाज भानुका राजपक्षे (Bhanuka Rajapaksa) यांचे एक विधान चर्चेचा विषय बनला आहे, ज्यामध्ये त्यांनी भारतीय खेळाडूंच्या बॅटबद्दल एक महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. त्यांचे विधान सोशल मीडियावर लवकरच व्हायरल झाले आणि त्यानंतर त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागले.

    सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

  • 11 Feb 2026 04:50 PM (IST)

    11 Feb 2026 04:50 PM (IST)

    पालघरमध्ये इपीएस-९५ पेन्शनधारकांनी नव्या लढ्याचा केला शंखनाद

    पालघरमध्ये इपीएस-९५ पेन्शनधारकांनी नव्या लढ्याचा शंखनाद केला आहे. वाढीव पेन्शनसह विविध मागण्यांसाठी वाडा येथे खासदारांच्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.गेल्या अनेक वर्षांपासून किमान पेन्शन वाढीसाठी पाठपुरावा करूनही प्रत्येक अर्थसंकल्पात निराशा पदरी पडत असल्याने इपीएस-९५ पेन्शनधारक हताश झाले आहेत. भोपाळ येथे झालेल्या बैठकीनंतर आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार वाडा येथील खासदार हेमंत सावरा यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर घंटानाद करून पुरवणी अर्थसंकल्पात मागण्यांचा विचार करावा, असे निवेदन देण्यात आले.कोशियारी समितीच्या शिफारशीप्रमाणे किमान ९ हजार रुपये पेन्शन लागू करावी, ज्येष्ठांची रेल्वे सवलत पूर्ववत करावी आणि ठेवींवर किमान १० टक्के व्याज द्यावे.अशी मागणी करण्यात आली नको या वयात टेन्शन, आता तरी वाढवा पेन्शन अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. जिल्ह्यातील मोठ्या संख्येने निवृत्तांनी आंदोलनात सहभाग घेतला.

  • 11 Feb 2026 04:40 PM (IST)

    11 Feb 2026 04:40 PM (IST)

    पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

    पनवेलमध्ये राज्यातील पहिल्या खाजगी पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडले. महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून उभे राहिलेले हे विद्यापीठ कौशल्याधारित आणि व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर देणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण २०२०नुसार विद्यार्थ्यांना उद्योजकतेकडे वळवण्याचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ड्रोन, AI आणि सायबर सुरक्षा यांसारख्या आधुनिक अभ्यासक्रमांमुळे शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

  • 11 Feb 2026 04:35 PM (IST)

    11 Feb 2026 04:35 PM (IST)

    शहराच्या विकासासाठी नवीन महापौर उपमहापौर चांगलं कार्य करतील

    लातूर महानगरपालिकेत काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या स्पष्ट बहुमतानंतर नव्या पदाधिकाऱ्यांनी आज अधिकृतपणे आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. महापौर म्हणून जयश्री सोनकांबळे तर उपमहापौर म्हणून ॲड. स्नेहल उटगे यांनी पदभार स्वीकारला. त्यावेळी काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख यांचे उपस्थिती होती. लातूर शहराच्या विकासासाठी नवीन महापौर उपमहापौर चांगलं कार्य करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान लातूर जिल्हा परिषदेत कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. मात्र काँग्रेस हा २३ जागा घेऊन सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे लातूर जिल्ह्याच्या मतदारांनी भाजपला नाकारला असल्याची टीका याप्रसंगी आमदार अमित देशमुख यांनी केली.

  • 11 Feb 2026 04:30 PM (IST)

    11 Feb 2026 04:30 PM (IST)

    धुळ्यात शेतीपंप चोरट्यांचा सुळसुळाट

    धुळे शहरालगत असलेल्या वरखेडी रोड परिसरातील शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. एकीकडे कडाक्याच्या थंडीत रात्रंदिवस कष्ट करून वन्य प्राण्यांपासून पीक वाचवण्याचे प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे अज्ञात चोरांनी धुमाकूळ घातला आहे. परिसरातील तब्बल १० ते १२ शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटारींच्या केबल वायर कापून नेण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामुळे सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला असून, केवळ वायरच नाही तर वन्य प्राण्यांकडून पिकांचे होणारे नुकसान ही शेतकऱ्यांची मोठी डोकेदुखी ठरत आहे. प्रशासनाकडे वारंवार दाद मागूनही केवळ 'ऑनलाइन तक्रारी'चे सल्ले मिळत असल्याने संताप व्यक्त होत आहे. राजेंद्र माळी यांच्यासह परिसरातील डझनभर शेतकऱ्यांच्या विहिरींवरील आणि कूपनलिकेवरील महागड्या तांब्याच्या केबल वायर चोरांनी लंपास केल्या आहेत.

  • 11 Feb 2026 04:20 PM (IST)

    11 Feb 2026 04:20 PM (IST)

    अपघातांच्या मालिकेनंतर ग्रामस्थ आक्रमक नागपूर-तुळजापूर महामार्गावर रस्ता रोको

    नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे ग्रामस्थांचा संताप वाढला आहे. गेल्या पंधरा दिवसांत दोन महिलांच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ प्रशासनाविरुद्ध आक्रमक झाले आहेत. दाभड, बामणी आणि शेलगाव येथील नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. तिन्ही गावांकडे जाण्यासाठी सुरक्षित वळण किंवा अंडरपास नसल्याने अपघात होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

  • 11 Feb 2026 04:15 PM (IST)

    11 Feb 2026 04:15 PM (IST)

    कल्याणमधील इंजिनिअरिंगच्या ३ हजार विद्यार्थ्यांना फटका

    इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी एनईपीनुसार परिक्षा दिली. मात्र परिक्षा देताच दोन दिवसांनी त्यांच्या पासिंगचा निकष बदलला गेला. त्याचा फटका कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरातील जवळपास ३ हजार विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यांना दुसऱ्या वर्षा करीता प्रवेश मिळालेला नाही. या विद्यार्थ्यांनी बुधवारी सिनेट सदस्य अल्पेश भोईर यांच्याकडे धाव घेतली. दुसऱ्या वर्षाकरीता प्रोव्हीजनल प्रवेश मिळावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या संदर्भात सिनेट सदस्य अल्पेश भोईर उद्या मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुंची भेट घेणार आहेत.

  • 11 Feb 2026 04:05 PM (IST)

    11 Feb 2026 04:05 PM (IST)

    एपीएमसी शेतकरी शेडच्या जागेवर संचालकांची स्थगिती

    कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शेतकरी शेडसाठी राखीव असलेल्या जागेवर व्यापारी गाळे बांधले जात आहे. या प्रकरणी बाजार समितीचे माजी संचालक मयूर पाटील यांनी विरोध करीत पणन खात्याकडे तक्रार केली होती. त्याचबरोबर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी पणन संचालकांनी व्यापारी गाळे बांधकामास स्थगिती दिली आहे.

  • 11 Feb 2026 04:00 PM (IST)

    11 Feb 2026 04:00 PM (IST)

    HSC Exam 2026: ‘उपरवाला सब देख रहा है…’, बारावीच्या परीक्षेत कॉपी बहाद्दरांना CCTV ने पकडलं

    Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय, जैतापूर (ता. कन्नड) येथे इयत्ता १२ वीच्या इंग्रजी पेपर परीक्षेदरम्यान आढळून आलेल्या गैरप्रकाराच्या प्रकरणात दक्षता समितीच्या आदेशानुसार व्यापक व कठोर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्ह्यातील आजपर्यंतच्या सर्वांत मोठ्या परीक्षा-संबंधित कारवायांपैकी एक मानली जात आहे. मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या परीक्षेदरम्यान काही विद्यार्थ्यांकडून सामूहिक काॅपी होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, परीक्षा केंद्रावर उपलब्ध CCTV फुटेजच्या माध्यमातून संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीत विद्यार्थ्यांकडून एकमेकांच्या उत्तरपत्रिकांकडे पाहून गैरप्रकार केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात परीक्षा केंद्र संचालकासह एकूण १९ जणांविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

    वाचा सविस्तर 

  • 11 Feb 2026 03:45 PM (IST)

    11 Feb 2026 03:45 PM (IST)

    Food Recipe: १० रुपयांमध्ये बनवा खमंग कुरकुरीत शेंगदाणा खोबऱ्याची चटणी

    भारतीय स्वयंपाक घरात अनेक वेगवेगळे पदार्थ कायमच उपलब्ध असतात. त्यात सगळ्यांचं आवडणारा पदार्थ म्हणजे चटणी. हिरवी मिरचीची चटणी, शेंगदाणा चटणी, वेगवेगळ्या भाज्यांच्या सालीची चटणी इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारातील चटणी घरात कायमच बनवल्या जातात. जेवणाच्या ताटात जर चटणी असेल तर चार घास जास्त जातात. गरमागरम भाकरी, चपाती किंवा भातासोबत सुद्धा चटणी खाल्ली जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये शेंगदाणा खोबऱ्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही चटणी महिनाभर व्यवस्थित टिकून राहते. शेंगदाणे आणि सुकं खोबर प्रत्येक घरात उपलब्ध असत. कारण शेंगदाण्याचा वापर भाजीमध्ये टाकण्यासाठी केला जातो तर सुक्या खोबऱ्याचा वापर करून वाटप तयार केले जाते. पदार्थाची चव वाढवण्यासाठी जेवणाच्या ताटात प्रत्येकाला कायमच चटणी किंवा लोणचं यांसारखे पदार्थ हवे असतात. चला तर जाणून घेऊया शेंगदाणा खोबऱ्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.

    वाचा सविस्तर 

  • 11 Feb 2026 03:25 PM (IST)

    11 Feb 2026 03:25 PM (IST)

    Chandrapur News: महापौरपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी कोण घेणार?

    चंद्रपूर: गत कित्येक वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष पराभवाच्या खाईत लोटला असतानाच नगर परिषद व महानगर पालिकेच्या निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळाले. बऱ्याच वर्षानंतर जिल्हा काँग्रेसमय झाला. दरम्यान चंद्रपूर महानगर पालिकेत काँग्रेस पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून भाजपला धोबीपछाड दिली. मात्र महापौरपदाच्या निवडणुकीत जबाबदार काँग्रेसी नेत्यांच्या अहंकारी व हेव्यादाव्याच्या प्रवृत्तीमुळे पक्षाला सत्तेपासून मुकावे लागले आहे. या पराभवाची नैतिक जबाबदारी जबाबदार नेते स्वीकारणार काय, असा खडा सवाल पक्षाचे माजी महासचिव बापू धोटे यांनी उपस्थित केला आहे.

    वाचा सविस्तर 

  • 11 Feb 2026 03:25 PM (IST)

    11 Feb 2026 03:25 PM (IST)

    पोलिसांकडून पीडित कुटुंबालाच मारहाण

    मागील दोन महिन्यांपासून फुस लावून पळविण्यात आलेली मुलगी पोलिसांनी सापडून द्यावी. या मागणीसाठी एक कुटुंब बीड पोलिसांचे उंबरठे झिजवत आहे. मात्र पोलिसांनी पीडित कुटुंबालाच मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्यात डिसेंबर 2025 रोजी एका तरुणाने अल्पवयीन मुलगी फुस लावून पळविल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. याचाच पाठपुरावा पीडित कुटुंबाकडून केला जातो आहे.

  • 11 Feb 2026 03:15 PM (IST)

    11 Feb 2026 03:15 PM (IST)

    Angarakh Yog: अंगारक योगामुळे सावध राहा!

    मंगळ-राहूमुळे अंगारक योग तयार होणार आहे त्यामुळे त्याचा प्रभाव राहणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, काळांचा संबंध ग्रहांच्या हालचालींशी जोडतात. यावेळी, मंगळाच्या संक्रमणाचा आणि राहूशी त्याच्या युतीवर लक्ष केंद्रित केले आहे, ज्यामुळे एक शक्तिशाली ग्रह संयोजन तयार होते. फेब्रुवारीच्या अखेरीस तयार होणारा हा योग एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत प्रभावी राहील. या काळात राग, घाई, चुकीचे निर्णय आणि अनपेक्षित घटना लोकांचा ताण वाढवू शकतात. विशेषतः हा काळ काही राशींच्या लोकांसाठी कठीण राहू शकतो. अंगारक योगामुळे कोणत्या राशीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागेल ते जाणून घ्या.

    वाचा सविस्तर 

  • 11 Feb 2026 03:10 PM (IST)

    11 Feb 2026 03:10 PM (IST)

    अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग बोर्डाच्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा संप

    अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग बोर्डाच्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने जिल्हाभरातून आलेल्या दिव्यांग बांधवांचे प्रचंड हाल होत आहेत. काही संघटनांकडून जाणीवपूर्वक खोटे आरोप करून दबाव टाकला जात असल्याचा आरोप वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केला आहे.अतिरिक्त कामाचा ताण असतानाही दर बुधवारी हजारो दिव्यांगांची प्रामाणिकपणे तपासणी केली जाते मात्र काही संघटनांचे पदाधिकारी जाणून-बुजून त्रास देत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे काही दिव्यांग संघटनांनी मात्र रुग्णालयातील कामकाजाचे समर्थन करत कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या संपामुळे दिव्यांग रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे तर प्रशासनाने लवकरात लवकर यात तोडगा काढावा अशी मागणी काही संघटनांच्या पदाधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे

  • 11 Feb 2026 03:06 PM (IST)

    11 Feb 2026 03:06 PM (IST)

    बँकिंग क्षेत्रात करिअर घडवायचं आहे? ‘या’ संकेतस्थळावर जाऊन करा अर्ज

    बँकिंग क्षेत्रात करियर बनवायचं आहे का? तर बँक ऑफ बड़ौदा तुमच्यासाठी एक उत्तम संधी घेऊन आली आहे. भारतातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेली बँक ऑफ बड़ौदा ने मैनेजर आणि सीनियर मैनेजर पदांसाठी एकूण १६६ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन सुरु झाली असून इच्छुक उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी २०२६ आहे, त्यामुळे उमेदवारांनी वेळेत अर्ज करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण शेवटच्या क्षणाला अर्ज केल्यास तांत्रिक अडचणी किंवा फॉर्म भरण्यात चूक होण्याची शक्यता असते.

    वाचा सविस्तर 

  • 11 Feb 2026 03:03 PM (IST)

    11 Feb 2026 03:03 PM (IST)

    रणवीर सिंगनंतर सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीला मिळाली धमकी

    १९९० च्या दशकात बॉलीवूडवर अंडरवर्ल्डचा मोठा प्रभाव दिसून आला होता. विशेषतः दाऊद इब्राहिम आणि त्याच्या डी-कंपनीच्या काळात चित्रपटसृष्टीत खंडणी, धमक्या आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांच्या घटना वारंवार समोर येत होत्या. चित्रपट उद्योग हा नेहमीच अशा गुन्हेगारी कारवायांसाठी चर्चेत राहिला आहे. आता पुन्हा एकदा इंडस्ट्रीत अशाच प्रकारचे वातावरण निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या काही काळापासून काही कलाकारांना लक्ष्य केले जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. रोहित शेट्टी यांच्या घराजवळ झालेल्या गोळीबारानंतर आणि रणवीर सिंगला मिळालेल्या धमक्यांनंतर, आता सलमान खानच्या एका जवळच्या सहकाऱ्यालाही धमकी दिल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे.

    वाचा सविस्तर 

  • 11 Feb 2026 02:55 PM (IST)

    11 Feb 2026 02:55 PM (IST)

    माथेरानमध्ये वन कायदा धाब्यावर; वन्यप्राण्यांचे रस्ते बंद करण्यांना अभय कोणाचं ?

    कर्जत/ संतोष पेरणे : माथेरान शहर हे वन जमिनीवर वसले असून या ठिकाणी असलेली वन संपदा वन्य प्राण्यांचे आदिवास समजला जातो.याच माथेरानमध्ये वन नियम आणि कायदे राज्याच्या अन्य भागापेक्षा वेगळे आहेत.मात्र सर्व नियम आणि कायदे धाब्यावर बसवण्याची परंपरा मागील काही वर्षात सुरू झाली आहे.दरम्यान शहराच्या जंगल भागात सध्या वन नियम धाब्यावर बसवून दगडी कुंपण घातली जात असून त्या राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष यांनी वन्यप्राण्यांचा मार्ग बंद होत असल्याबद्दल आक्षेप घेऊन असे बांधकाम तत्काळ हटवावे आणि संबंधित लोकांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

  • 11 Feb 2026 02:50 PM (IST)

    11 Feb 2026 02:50 PM (IST)

    ग्राहकांना बसला मोठा झटका! 4000 रुपयांपर्यंत वाढल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, जाणून घ्या

    स्मार्टफोन कंपनी Realme ने एक मोठा निर्णय घेतला आहे, कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे यूजर्स नाराज झाले आहेत. कंपनीने घोषणा केली आहे की, Realme ने लाँच केलेल्या नवीन स्मार्टफोनच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. कंपनीने तीन मॉडेल्सच्या किंमती 4 हजार रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत. मेमोरी, चिपसेटची कमी आणि इकोसिस्टम या सर्व कारणांमुळे कंपनीने स्मार्टफोनच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी सॅमसंगने त्यांच्या काही मॉडेल्सच्या किंंमती वाढवण्याचा निर्णय घेतला होता.

  • 11 Feb 2026 02:45 PM (IST)

    11 Feb 2026 02:45 PM (IST)

    महात्मा गांधींवर निबंध लिहिणाऱ्या बलात्काराच्या दोषीची शिक्षा कमी

    मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने एकच खळबळ उडाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने २०१६ मध्ये ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या एका तरुणाची जन्मठेपेची शिक्षा कमी करून १२ वर्षांची केली आहे. २ फेब्रुवारीच्या आपल्या आदेशात न्यायालयाने दोषी ठरवले परंतु, त्याची शिक्षा कमी केल्याचेही जाहीर केले. न्यायाधीश सारंग कोतवाल आणि संदेश पाटील यांच्या खंडपीठाने आरोपीच्या याचिकेवर हा निर्णय दिला. पण न्यायालयाच्या या निर्णयामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

  • 11 Feb 2026 02:40 PM (IST)

    11 Feb 2026 02:40 PM (IST)

    Drishyam 3 मध्ये ‘या’ साऊथ अभिनेत्याने एन्ट्री; अक्षय खन्नाला करणार रिप्लेस?

    अजय देवगणचा ‘दृश्यम ३’ हा चित्रपट या वर्षी २ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. परंतु, अक्षय खन्नाच्या ‘एक्झिट’च्या बातमीने यापूर्वी लक्ष वेधले होते. विविध दाव्यांमध्ये, प्रकाश राज यांनी आता चित्रपटात प्रवेश केला असल्याचे समोर आले आहे. त्यांनी या थ्रिलर फ्रँचायझीचे शूटिंग सुरू केले आहे आणि त्यांनी वैयक्तिकरित्या याची पुष्टी केली आहे. परंतु, त्यांनी “धुरंधर” अभिनेत्याची जागा घेतलेली नाही असे स्पष्ट सांगितले आहे.

  • 11 Feb 2026 02:35 PM (IST)

    11 Feb 2026 02:35 PM (IST)

    आंबा-काजू हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

    सिंधुदुर्ग: मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिंधुदुर्ग व कोकणातील आंबा-काजू हंगामातील नुकसानीचा मुद्दा पालकमंत्री नितेश राणे यांनी ठामपणे मांडला. यावर्षी आंबा मोठ्या प्रमाणात गळून पडल्याने बागायतदारांवर आर्थिक संकट ओढवले असल्याची माहिती मुख्यमंत्री व मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विभागाकडून तातडीने परिस्थितीचा सविस्तर अहवाल मागवण्याचे निर्देश दिले असून लवकरच त्यांच्या नेतृत्वाखाली आंबा बागायतदारांची बैठक घेऊन मदतीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. राज्य सरकार आंवा बागायतदारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही मलय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राष्णे यांनी दिली आहे.

  • 11 Feb 2026 02:30 PM (IST)

    11 Feb 2026 02:30 PM (IST)

    भायखळा रेल्वे स्थानकाच्या शौचालयात रक्ताच्या थारोळ्यात सापडली विद्यार्थिनी; काय घडलं नेमकं?

    मुंबई: मुंबईतून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. भायखळा रेल्वे स्थानकावर असलेल्या शौचालयात गुरुवारी (5 जानेवारी) दुपारी एका विद्यार्थिनीने रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी शौचालयाचा दरवाजा तोडून तिला रुग्णलयात दाखल केलं. तिच्यावर उपचार सुरु आहे.

  • 11 Feb 2026 02:25 PM (IST)

    11 Feb 2026 02:25 PM (IST)

    पुरुष आणि स्त्रियांच्या हातावरील या 3 रेषा दर्शवतात संपत्ती आणि आनंद

    हातांवरील रेषा व्यक्तीच्या जीवनाबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेक गोष्टी उघड करतात. हातांवरील रेषांसोबतच, मनगटांवरील रेषा, ज्यांना मणिबंध रेषा म्हणून ओळखले जाते, त्या देखील महत्त्वाच्या आहेत. हस्तरेखाशास्त्रानुसार, मनगटावरील रेषा विशेष महत्त्वाच्या आहेत. त्या व्यक्तीला जीवनात कोणते यश आणि उपलब्धी मिळतील हे देखील दर्शवतात. हस्तरेषाशास्त्रातील मणिबंध रेषांचे महत्त्व जाणून घेऊया.

  • 11 Feb 2026 02:20 PM (IST)

    11 Feb 2026 02:20 PM (IST)

    ST प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ; सवलतधारकांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्डची योजना

    मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या (ST News) प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवली आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन, पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एस.टी. महामंडळाने ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली. यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे.

  • 11 Feb 2026 02:15 PM (IST)

    11 Feb 2026 02:15 PM (IST)

    ट्रम्प यांचा दुटप्पी चेहरा! अमेरिकेने Pok आणि अक्साई चीन भारताचा भाग दाखवणारा नकाशा गुपचूप हटवला

    USTR Removed Post Showing Indian Territory : वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिकेतील व्यापार (India US Trade) करारानंतर युएस ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह (USTR) ने भारताचा नकाशा दर्शवणारी पोस्ट सोशल मीडियाप्लॅटफॉर्म एक्सवरुन @USTradeRep डिलिट केली आहे. या नकाशात पीओके आणि अक्साई चीन भारताचा दाखवण्यात आला होता. पण ही पोस्ट हटवली असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • 11 Feb 2026 02:05 PM (IST)

    11 Feb 2026 02:05 PM (IST)

    Latur Zilla Parishad: झेडपीमध्ये काँग्रेसची ऐतिहासिक मुसंडी

    Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने दणदणीत यश संपादन करत जिल्ह्यात पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. विकासाची परंपरा आणि लोकनेते विलासराव देशमुख यांच्या विचारांवर मतदारांनी शिक्कामोर्तब करत काँग्रेसच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. जिल्हाभरातील अनेक गट आणि गणांमध्ये काँग्रेसने आघाडी घेत बहुमताच्या जवळ जाणारी भक्कम कामगिरी केली आहे. निवडणूक निकाल स्पष्ट होताच जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विजयी उमेदवार आणि कार्यकत्यांनी जल्लोष साजरा करत ढोल ताशांच्या गजरात आणि गुलाल उधळत चाभळगावच्या दिशेने कूच केली.

  • 11 Feb 2026 02:00 PM (IST)

    11 Feb 2026 02:00 PM (IST)

    या Valentine’s day ला झी मराठीवर प्रेम,भावना आणि मनोरंजनाची मेजवानी

    झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघातली ही तुटेना’ मध्ये यंदाचा व्हॅलेंटाईन डे खास रंगतदार ठरणार आहे. मालिकेत आजी अधिरावर जबाबदारी सोपवते की जसा ती स्वतः व्हॅलेंटाईन डे साजरा करत आहे, तसंच काहीतरी खास समर आणि स्वानंदीसाठीही आयोजित केलं पाहिजे. आजीची इच्छा पूर्ण करण्यासाठी अधिरा एक खास सरप्राईज प्लॅन आखते आणि समर, स्वानंदी व रोहनला तातडीने एका ठिकाणी पोहोचण्यास सांगते. तिथे पोहोचल्यानंतर त्यांना कळते की ही एक खास व्हॅलेंटाईन पार्टी आहे. या पार्टीत समर आणि स्वानंदीचे गोड, रोमँटिक आणि भावनिक क्षण प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत.

  • 11 Feb 2026 01:55 PM (IST)

    11 Feb 2026 01:55 PM (IST)

    लातूर महापालिकेत काँग्रेसचा झेंडा; महापौर जयश्री सोनकांबळेंचा पदभार स्वीकार

    लातूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी बिनविरोध निवड झाल्यानंतर काल सकाळी काँग्रेसच्या नवनिर्वाचित महापौर जयश्रीताई सोनकांबळे आणि नूतन उपमहापौर अॅड. स्नेहल उटगे यांनी आपापल्या पदांचा अधिकृत पदभार स्वीकारला. माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी आ. देशमुख यांनी महापालिकेत तक्रारींसाठी स्वतंत्र खिडकी योजना सुरू करणार असल्याचे सांगितले. यावेळी मनपा आयुक्त मानसी मीना याही उपस्थित होत्या. महापालिका प्रवेशद्वारावर आकर्षक रंगीबेरंगी रांगोळी, आसमंतात सनईचे सूर आणि कार्यकत्यांचा लोटलेला अमाप उत्साह यांच्या साक्षीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा अधिक रंगतदार झाला. आ. अमित देशमुख आणि आयुक्त मानसी मीना यांनी महापौर-उपमहापौरांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

  • 11 Feb 2026 01:40 PM (IST)

    11 Feb 2026 01:40 PM (IST)

    ST प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ; सवलतधारकांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्डची योजना

    महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या (ST News) प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवली आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन, पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एस.टी. महामंडळाने ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली. यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे.

  • 11 Feb 2026 01:35 PM (IST)

    11 Feb 2026 01:35 PM (IST)

    ठरलं तर मग’ मालिकेत रंगणार Valentine’s day स्पेशल

    स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ मध्ये लवकरच प्रेक्षकांना एक वेगळं आणि विचार करायला लावणारं वळण पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्राची लाडकी जोडी अर्जुन–सायली आता एकमेकांच्या भूमिकांमध्ये दिसणार आहे.ऑफिसच्या कामाप्रमाणेच घरात दिवसभर राबणाऱ्या गृहिणीच्या कष्टांची दखल घेतली जावी, या हेतूने अर्जुन आणि सायली एकमेकांची कामं करण्याचा निर्णय घेतात. सायलीच्या दैनंदिन जबाबदाऱ्या स्वीकारत अर्जुन आता स्वयंपाकघरापासून घरातील सर्व कामांची धुरा सांभाळताना दिसणार आहे. तर सायली अर्जुनच्या भूमिकेत शिरून ऑफिस आणि कोर्टातील कामांची जबाबदारी पार पाडणार आहे.

  • 11 Feb 2026 01:30 PM (IST)

    11 Feb 2026 01:30 PM (IST)

    नम्रता गायकवाड–तुषार कावळेच्या डेटिंग चर्चेला उधाण

    फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होताच वातावरण आणखी बदलून जाते. प्रेमाचे वारे हळुवारपणे मनाला स्पर्श करू लागतात आणि या भावनांना शब्द देण्यासाठी येतो तो खास दिवस १४ फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे. एरवी मनातच दडवून ठेवलेल्या भावना, न बोललेले शब्द आणि व्यक्त न झालेलं प्रेम या दिवशी धाडस करून समोर येतं. आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर प्रेमाची कबुली देणं, नात्याला नवी सुरुवात देणं किंवा जुन्या नात्यांमध्ये पुन्हा एकदा प्रेमाची ऊब निर्माण करणाऱ्यांसाठी हा दिवस खास ठरतो.

  • 11 Feb 2026 01:25 PM (IST)

    11 Feb 2026 01:25 PM (IST)

    पाकिस्ताननंतर आता बांगलादेशने घेतला यू-टर्न

    २०२६ च्या टी-२० विश्वचषकातून बांगलादेशच्या माघारीचा मुद्दा आता केवळ खेळांपुरता मर्यादित नाही, तर राजकीय वक्तृत्वाचे रूप धारण केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशाचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी एक विधान जारी केले आहे. ज्यामुळे संपूर्ण वादाला एक नवीन दिशा मिळाली आहे. मंगळवार, १० फेब्रुवारी रोजी त्यांनी सांगितले की, विश्वचषकातून माघार घेण्याचा निर्णय सरकारने घेतला नाही, तर खेळाडू आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) यांनी घेतला आहे. त्यांच्या मते, हे पाऊल देशाचा सन्मान आणि क्रिकेटचे भविष्य लक्षात घेऊन उचलले गेले आहे. सरकारने फक्त या निर्णयाचे समर्थन केले.या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

  • 11 Feb 2026 01:20 PM (IST)

    11 Feb 2026 01:20 PM (IST)

    भारताचे ‘चाबहार’ स्वप्न; पण अमेरिका-इराण संघर्षात अडकला प्रकल्प

    अमेरिकेसोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान ‘चाबहार’ बंदर प्रकल्पाला भारत-इराण सहकार्याचे एक शक्तिशाली प्रतीक म्हणून वर्णन केले आहे. भारताच्या सहकार्याने विकसित होत असलेला हा प्रकल्प प्रादेशिक संपर्क आणि परस्पर विकासासाठी महत्त्वाचा असल्याचे इराण मानतो. सध्या, इराण आणि अमेरिका यांच्यात तीव्र तणाव आहे आणि परिणामी, चाबहार बंदर प्रकल्पाचे भविष्य धोक्यात आहे, ज्यामध्ये भारताचाही मोठा वाटा आहे. इराणच्या राष्ट्रीय दिनानिमित्त इराणी दूतावासात आयोजित स्वागत समारंभात, भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फथाली यांनी दोन्ही देशांमधील हजारो वर्षांचा इतिहास, संस्कृती आणि सभ्यतेचा उल्लेख केला आणि हे नाते केवळ ७५ वर्षांच्या राजनैतिक संबंधांपेक्षा खूप जुने आणि मजबूत असल्याचे अधोरेखित केले.

  • 11 Feb 2026 01:15 PM (IST)

    11 Feb 2026 01:15 PM (IST)

    अजितदादांच्या आठवणींत कॅबिनेट ई-मेल नोटीसला कायदेशीर मान्यता

    दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या पहिल्यात कॅबिनेट मंत्रिमंडळ्याच्या बैठकीत अजित पवारांनी पाठपुरावा केलेल्या ३ महत्त्वाच्या निर्णयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केले आहे. मुंबईत अजित पवार यांच्या पश्चात मंगळवारी पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यापूर्वी दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला.

  • 11 Feb 2026 01:08 PM (IST)

    11 Feb 2026 01:08 PM (IST)

    शेतकऱ्यांसाठी संधी तुती लागवडीसाठी ४ लाख १८ हजारांचे अनुदान

    हिंगोली जिल्ह्यात रेशीम शेती ही शाश्वत व फायद्याची शेती असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या शेतीकडे आकर्षित करण्याच्या दि. ०४ फेब्रुवारी ते दि. ०४ मार्च २०२६ या कालावधीत महारेशीम अभियान-२०२६ राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते रेशीम रथास हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, जिल्हा रेशीम कार्यालयातील वरिष्ठ तांत्रिक सहायक अशोक वडवळे, क्षेत्र सहाय्यक मनोज रंभापुरे, रजनिश कुटे, नितीन लोलगे, धनंजय ठमके, रमेश भवर, तान्हाजी परघने आदी उपस्थित होते.

  • 11 Feb 2026 01:00 PM (IST)

    11 Feb 2026 01:00 PM (IST)

    नगरसेवकांनो, जनतेशी नाळ जोडा…; खासदार अशोक चव्हाणांचा नवीन नगरसेवकांना मोलाचा सल्ला

    नदिडच्या जनतेने दिलेल्या विश्वासातून प्रथमच भारतीय जनता पक्षाचा महापौर निवडून येणे ही ऐतिहासिक घटना असून, या विश्वासाला साजेसे काम करून लोकांची प्रशंसा मिळवा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केले. नांदेड महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांच्या पदग्रहण समारंभात ते बोलत होते.

  • 11 Feb 2026 12:50 PM (IST)

    11 Feb 2026 12:50 PM (IST)

    ‘वंदे मातरम्’बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

    केंद्रीय  गृहमंत्रालयाकडून एक महत्त्वाचा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार आता ‘वंदे मातरम’साठी उभे राहणे अनिवार्य असेल, चित्रपटगृहांमध्ये वंदे मातरमसाठी उभे राहणे आवश्यक राहणार नाही, परंतु सरकारी कार्यक्रमांमध्ये किंवा शाळांमध्ये पूर्ण सहा श्लोकांचे राष्ट्रगीत वाजवले जाईल, या ठिकाणी उभे राहणे बंधनकारक असेल. यासंदर्भात सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश, मंत्रालये आणि संवैधानिक संस्थांना एक सुचना जारी करण्यात आली आहे.

  • 11 Feb 2026 12:40 PM (IST)

    11 Feb 2026 12:40 PM (IST)

    रुग्णांच्या जीवाशी खेळ! शासकीय आयुर्वेदिक दवाखान्यात कालबाह्य औषधे

    विंचूर येथील शासकीय आयुर्वेदिक दवाखान्यात रुग्णांना सर्रासपणे मुदत संपलेली औषधे दिली जात असल्याचा अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आरोग्य विभाग थेट नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.

  • 11 Feb 2026 12:30 PM (IST)

    11 Feb 2026 12:30 PM (IST)

    कंपनीने आगामी ईव्हेंटची तारीख केली जाहीर, पॉवरफुल Galaxy S26 ची प्री-ऑर्डर सुरू

    गॅलेक्सी S26 सीरीजमध्ये अपडेटेड स्पेसिफिकेशन्स दिले जाऊ शकतात, यामध्ये लेटेस्ट स्नॅपड्रॅगन चिप, फास्ट वायरलेस चार्जिंग असू शकते. गॅलेक्सी S26 अल्ट्रामध्ये प्रायव्हसी डिस्प्ले असू शकतो . येत्या 2 आठवड्यांत ही सिरीज ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. कंपनीचा आगामी ईव्हेंट सैन फ्रांसिस्को, कॅलिफोर्नियामध्ये सकाळी 10 वाजता (पैसिफिक टाइम जोन) आणि भारतीय वेळेनुसार, रात्री 11.30 वाजता सुरु होणार आहे. हा ईव्हेंट युट्यूबवर लाईव ब्रॉडकास्ट केला जाणार आहे.

  • 11 Feb 2026 12:30 PM (IST)

    11 Feb 2026 12:30 PM (IST)

    स्वच्छ, सुंदर, सुरक्षित नांदेडसाठी प्रयत्न करणार; नवनियुक्त महापौरांचे नांदेडकरांना आश्वासन

    कर्ज विरहित मनपा करण्याचा संकल्प केला असून आगामी काळात स्वच्छ सुंदर सुरक्षित नांदेड करण्याचा मानस आहे, आमचे नेते खासदार अशोक चव्हाण यांनी १०० दिवसांच्या कार्यक्रम तयार करून त्यानुसार काम करण्याच्या सुचना दिल्या आहेत, लवकरच या कामाला सुरूवात केली जाणार आहे, अशी माहिती नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचीत महापौर कविता मुळे, उपमहापौर दिपकसिंह रावत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली महापौरपदी निवड झाल्यानंतर मुळे यांन पत्रकारांशी संवाद साधला.

  • 11 Feb 2026 12:20 PM (IST)

    11 Feb 2026 12:20 PM (IST)

    अंबानी दाम्पत्याच्या अडचणीत वाढ; ED ने अनिल आणि टीना अंबानींना बजावले समन्स

    एसबीआय बँकेच्या घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ED ने उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांची पत्नी टीना अंबानी यांना नवीन समन्स बजावले आहे. आतापर्यंत १२,००० कोटींपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

  • 11 Feb 2026 12:13 PM (IST)

    11 Feb 2026 12:13 PM (IST)

    Nagpur Crime: अल्पवयीन मुलीला घरी बोलावलं आणि...; ३ जणांनी केला सामूहिक बलात्कार, नागपूर हादरलं!

     

    माणुसकीला काळिमा फासणारी घटना. अल्पवयीन मुलीला घरी बोलावून ३ जणांनी केला सामूहिक बलात्कार. पोलिसांनी ३ जणांना अटक केली असून पोलीस त्यांचा तपास करत आहे.

Web Title: Maharashtra breaking news todays live updates in marathi 11th february breaking news maharashtra politics national international war politics sports crime updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 08:47 AM

Topics:  

  • international news
  • Maharashtra Breaking News update
  • Maharashtra Politics
  • national news

संबंधित बातम्या

Anjali Damania on Kharat: भोंदू खरातचे राजकीय सिंडिकेट? चाकणकर, शिंदे, तटकरे अन् पाटील; अंजली दमानियांची धक्कादायक यादी!
1

Anjali Damania on Kharat: भोंदू खरातचे राजकीय सिंडिकेट? चाकणकर, शिंदे, तटकरे अन् पाटील; अंजली दमानियांची धक्कादायक यादी!

Global Politics : 2 अब्ज डॉलर्ससाठी पाकिस्तान आपली ‘अण्वस्त्रे’ गहाण ठेवणार? UAEने दिला ‘या’ कारणासाठी अल्टिमेटम
2

Global Politics : 2 अब्ज डॉलर्ससाठी पाकिस्तान आपली ‘अण्वस्त्रे’ गहाण ठेवणार? UAEने दिला ‘या’ कारणासाठी अल्टिमेटम

Ashok Kharat Case: ओश्नोजल’मधून गर्भपाताच्या गोळ्या! अशोक खरातच्या क्रूरतेचा नवा पुरावा समोर
3

Ashok Kharat Case: ओश्नोजल’मधून गर्भपाताच्या गोळ्या! अशोक खरातच्या क्रूरतेचा नवा पुरावा समोर

Satara Politics: सातारकरांचा वारसा ‘इतिहासजमा’; कस्तुरबा रुग्णालय इमारत पाडल्याने संताप
4

Satara Politics: सातारकरांचा वारसा ‘इतिहासजमा’; कस्तुरबा रुग्णालय इमारत पाडल्याने संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.