Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UK General Election : ब्रिटनमध्ये सत्ताबदल; कीर स्टार्मर यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा

आतापर्यंत लिबरल डेमोक्रॅट्सने 67 जागा जिंकल्या आहेत. तर स्कॉटिश नॅशनल पार्टीने सात जागा जिंकल्या आहेत आणि रिफॉर्म यूकेने चार जागा जिंकल्या आहेत. तर ग्रीन पार्टीला आतापर्यंत फक्त एक जागा जिंकता आली आहे. त्यात ब्रिटनचे माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांना त्यांच्या पश्चिम नॉरफोकच्या जागेवर पराभवाचा सामना करावा लागला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 05, 2024 | 12:43 PM
Keir starmer

Keir starmer

Follow Us
Close
Follow Us:

लंडन : ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या असून, या निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यानुसार, ब्रिटनचे पंतप्रधान राहिलेले ऋषी सुनक यांचा पराभव होत असल्याचे दिसत आहे. तर कीर स्टार्मर यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. ‘एक्झिट पोल’नुसार, प्रमुख विरोधी पक्ष लेबर पार्टीने दणदणीत विजय मिळवला आहे. 14 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर देशात लेबर पार्टीचे सरकार स्थापन होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

आतापर्यंत लिबरल डेमोक्रॅट्सने 67 जागा जिंकल्या आहेत. तर स्कॉटिश नॅशनल पार्टीने सात जागा जिंकल्या आहेत आणि रिफॉर्म यूकेने चार जागा जिंकल्या आहेत. तर ग्रीन पार्टीला आतापर्यंत फक्त एक जागा जिंकता आली आहे. त्यात ब्रिटनचे माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांना त्यांच्या पश्चिम नॉरफोकच्या जागेवर पराभवाचा सामना करावा लागला आहे. ट्रस सप्टेंबर 2022 मध्ये पंतप्रधान झाल्या होत्या. मात्र, अवघ्या सहा आठवड्यांत त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

दरम्यान, ऋषी सुनक यांनी पराभव मान्य केला असून, ‘मी माफी मागतो आणि या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो. लेबर पार्टीने ही निवडणूक जिंकली आहे आणि मी कीर स्टार्मर यांना त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी फोन केला. आज शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने सत्ता हस्तांतरण होईल’.

लेबर पार्टी देशसेवेसाठी कायम तत्पर

कीर स्टार्मर यांनी या विजयानंतर मीडियाला संबोधित करताना सांगितले की, ‘आम्ही ते करून दाखवलं. याचसाठी प्रचार केला होता, लढलो होतो. तुम्ही यासाठी मतदान केले आणि आता त्याचे निकाल सर्वांसमोर आहेत. आतापासूनच बदलाचे वारे वाहू लागले आहेत. खरे सांगायचे तर हा बदललेला लेबर पार्टी आहे, जो देशसेवेसाठी तत्पर आहे’.

Web Title: Keir starmer and his labour party win in uk general election nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2024 | 12:43 PM

Topics:  

  • Rishi Sunak

संबंधित बातम्या

माजी ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक बनले गोल्डमन सॅक्सचे मुख्य सल्लागार, पगार करणार दान
1

माजी ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक बनले गोल्डमन सॅक्सचे मुख्य सल्लागार, पगार करणार दान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.