
Mexico Mass Shooting
मेक्सिकोत भीषण रेल्वे दुर्घटना! रुळावरुन प्रवासी ट्रेन घसरल्याने १३ जणांचा मृत्यू, भयावह VIDEO
मीडिया रिपोर्टनुसार, स्थानिक वेळेनुसार, फुटबॉल सामाना झाल्यानंतर काही अज्ञात हल्लेखोरांनी मैदानावर अचानक गोळीबार सुरु केला. या गोळीबारात किमाना ११ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १२ जण जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आली असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. स्थानिक सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबारात महिला आणि एक लहान मुलगाही जखमी झाला आहे. या घटनेनंतर परिसरात प्रचंड भिती पसरली आहे. तसेच नागरिकांनी संतापही व्यक्त केला आहे.
सलामांका शहराचे महापौर सीझर प्रीटो यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. तसेच त्यांनी सोशल मीडियावरुन एक निवेदन जारी केले आहे. या निवदेनता त्यांनी म्हटले आहे की, हा हल्ला संपूर्ण शहरासाठी दु:खद आहे. या घटनेमुळे लोकांमध्ये भिती पसरली आहे. तसेच सीझर प्रीटो यांनी मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षा क्लाडिया शिनबाम यांच्याकडे या घटनेकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. तसेच त्यांनी मेक्सिकोत वाढत्या हिंसाचाराला रोखण्यासाठी मदतीची मागणीही केली आहे. त्यांनी काही हल्लेखोरांच्या टोळ्या सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, पण यामध्ये त्यांना यशस्वी होऊ दिले जाणार नाही असे सीझर प्रीटो यांनी म्हटले आहे.
गुआनाजुआतो मेक्सिकोमधील सर्वात हिंसक राज्यापैकी एक मानले जाते. याठिकाणी सांता रोजा डी लामा आणि जलिस्को न्यू जनरेशन कार्टेल या टोळींमध्ये गेल्या अनेक काळापासून वर्चस्वासाठी संघर्ष सुरु आहे. या टोळींमुळे राज्यात गोळीबाराच्या आणि अपहरणाच्या घटना प्रचंड वाढल्या आहे. सध्या नुकत्याच घडलेल्या ताज्या घटनांमागे देखील या संघटनांचा हात असल्याचे दावा केला जात आहे.
मेक्सिको सिटीच्या संसदेत उडाला गोंधळ ; महिला खासदारांनी एकमेकींच्या झिंझ्या धरल्या अन्…, VIDEO VIRAL
Ans: मेक्सिकोच्या गुआनाजुआतो राज्यात सलामांका शहरात गोळीबाराची घटना घडली आहे.
Ans: मेक्सिकोतील गोळीबारात ११ जण ठार झाले आहेत, तर १२ जण जखमी आहेत.