
Nepal General Election to be held in March 2026
प्रनिधीसभेच्या सभागृहाच्या निवडणुकांच्या तारखांना अंतिम मंजुरी दिली आहे. आयोगाने याबाबत निवेदन जारी करत सांगितले की, नेपाळमध्ये आगामी सार्वत्रिक निवडणूका पुढील वर्षी मार्च महिन्यात ५ तारखेला पार पडतील मतदानाची वेळही निश्चित करण्यात आली आहे. सुशीला कार्की (Sushila Karki) यांचे अंतरिम सरकार मतदान घेण्यासाठी सज्ज झाले आहे.
गेल्या महिन्यात नेपाळमध्ये माजी पंतप्रधान ओली शर्मा यांच्या सरकारविरोधात तीव्र आंदोलन झाले होते. जनरेशन झेडच्या तरुणांनी सरकारच्या भ्रष्टाचार, नेपोटिझम, बेरोजगारी हटवण्यात अपयश आणि सोशल मीडियावरील बंदीमुळे आंदोलन सुरु केले होते. यामुळे देशात मोठ्या प्रमाणाच अस्थिरता पसरली होती. अनेक ठिकाणी जाळफोळ, तोडफोड झाली होती.
माजी सरकारच्या अनेक मंत्र्यांना पदावरुन हटावे लागले होते. यानंतर सुशीला कार्की यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारची स्थापना झाली. याच अतंरिम सरकारच्या नेतृत्त्वाखाली आता नेपाळमध्ये पारदर्श पद्धतीने निवडणुका घेण्याची तयारी सुरु केली आहे. १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामचंद्र पौडाल यांनी सभा दरखास्त केली होती.
नेपाळच्या निवडणुका आयोगाने निवडणुकीचे वेळापत्रक जारी केले आहे.
प्रश्न १. नेपाळमध्ये कधी होणार सार्वत्रिक निवडणूका?
नेपाळमध्ये पुढील वर्षी ५ मार्च २०२६ रोजी सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत.
प्रश्न २. काय आहे नेपाळमधील मतदानाची वेळ?
नेपाळमध्ये ५ मार्च २०२६ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
प्रश्न ३. प्रचारासाठी पक्षांना किती वेळ देण्यात आला आहे?
नेपाळमध्ये निवडणूक प्रचारासाठी १५ फेब्रुवारी ते ०२ मार्च २०२६ पर्यंत प्रचारासाठी वेळ देण्यात आली आहे.
प्रश्न ४. नेपाळमधील पक्षांना कधीपर्यंत उमेदवारांची यादी सादर करायची आहे.
नेपाळमधील पक्षांना २ आणि ३ जानेवारी पर्यंत उमेदवारांची यादी सादर करायची आहे.
प्रश्न. ५ नेपाळमध्ये कोण आहेत सध्याच्या पंतप्रधान?
नेपाळमध्ये अंतरिम सरकार स्थापन झाले असून सुशीला कार्की या पंतप्रधान आहेत.
प्रश्न ६. नेपाळमध्ये का पसरली होती अस्थिरता?
नेपाळच्या पूर्व ओली सरकारविरोधात भ्रष्टाचार, सोशल मीडियावर बंदी, आणि नेपोटिझ अशा गोष्टींविरोधात जनरेशन झेडने तीव्र आंदोलन छेडले होते, यामुळे देशभरात अस्थिरतेचे वातावरणे होते.
एर्दोगानचा ट्रम्पना झटका! फायटर जेटसाठी स्पेनची अमेरिकेला टांग, अब्जावधींची डील आता तुर्कीसोबत