इस्लामाबाद : देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) भाजप किंवा काँग्रेस कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे घटक पक्षांच्या मदतीने भाजपने सरकार स्थापन केले. त्यानुसार, नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यावरून पाकिस्तानातील मंत्री आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय फवाद चौधरी (Fawad Chaudhry) यांनी हे सरकार टिकणार नाही. पुढचे पंतप्रधान राहुल गांधी असतील असे म्हटले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पाठराखण करणाऱ्या पाकिस्तानने आता पुन्हा एकदा भारतातील राजकारणावर भाष्य केले आहे. केंद्रात नव्यानेच स्थापन झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार नाही आणि विरोधी इंडिया आघाडीतून राहुल गांधी हे देशाचे पहिले पंतप्रधान असतील, असा दावा केला आहे. चौधरी यांच्या मते, मोदी यांचे एनडीए सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार नाही आणि विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकडून राहुल गांधी हे भारताचे पहिले पंतप्रधान असतील.
भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांच्या विचारसणीत फरक आहे. यातूनच हे सरकार फार काळ टिकणार नाही, असे संकेत मिळतात. आघाडीची एकता विखंडीत होणे निश्चित आहे. भारत व पाकिस्तान या दोन्ही शेजारी देशांना सिंधु खोऱ्यात आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.