Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेत मतदानापूर्वीच उत्तर कोरियाने डागली अनेक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या काही तास आधी प्योंगयांगने आपल्या शस्त्रप्रणालीचे प्रदर्शन केले आहे. उत्तर कोरियाने किती क्षेपणास्त्रे डागली हे दक्षिण कोरियाच्या लष्कराने याची अधिकृतपणे माहिती दिली नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 05, 2024 | 03:58 PM
अमेरिकेच्या निवडणुकीदरम्यानच उत्तर कोरियाने डागली अनेक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे

अमेरिकेच्या निवडणुकीदरम्यानच उत्तर कोरियाने डागली अनेक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे

Follow Us
Close
Follow Us:

सेऊल : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास उरले आहेत. दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेत मतदानापूर्वीच उत्तर कोरियाने वेगळी भूमिका घेतली आहे. उत्तर कोरियाने मंगळवारी पूर्व समुद्राच्या दिशेने अनेक कमी पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला अशी माहिती दक्षिण कोरियाच्या लष्कराने ही दिली. अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीपूर्वीच उत्तर कोरियाने ही शक्तिप्रदर्शनाची कारवाई केली आहे.

कोणतीही अदिकृत माहिती नाही

उत्तर कोरियाने किती क्षेपणास्त्रे डागली याबाबत दक्षिण कोरियाच्या लष्कराने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. जपानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, क्षेपणास्त्रे आधीच समुद्रात पडली होती आणि त्यामुळे कोणतेही नुकसान झाल्याचे तात्काळ वृत्त नाही. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी युनायटेड स्टेट्स गाठण्यासाठी डिझाइन केलेल्या देशाच्या नवीनतम आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीचे निरीक्षण केल्यानंतर हा विकास झाला आहे.

हेदेखील वाचा : काही तासांत अमेरिकेत घेतला जाणार सर्वात मोठा निर्णय; भारतासह उर्वरित जगावर काय परिणाम होणार?

अमेरिकेने दक्षिण कोरिया आणि जपानसह  बी-1 बी बॉम्बर विमाने उडवली

या हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून, अमेरिकेने रविवारी दक्षिण कोरिया आणि जपानसोबतच्या त्रिपक्षीय सरावात लांब पल्ल्याच्या बी-1 बी बॉम्बरचा वापर केला. दरम्यान, प्रत्युत्तरादाखल अमेरिकेने दक्षिण कोरिया आणि जपानसह रविवारी बी-1बी बॉम्बर विमाने उडवली. अमेरिकेच्या या निर्णयाला उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उन यांची बहीण किम यो जोंग यांनी विरोध केला होता. लष्करी पातळीवर धमक्या देऊन तणाव वाढवत असल्याचा आरोपही त्यांनी विरोधकांवर केला.

उत्तर कोरिया वॉशिंग्टनचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे

दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी अंदाज व्यक्त केला आहे की अमेरिकन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरिया अशा सामर्थ्यदर्शनांद्वारे वॉशिंग्टनचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करेल. उत्तर कोरियाचे वाढते अण्वस्त्र कार्यक्रम हे अमेरिकेकडून निर्बंध कमी करण्याच्या दबावाच्या उद्देशाने केले जात असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर कोरिया सध्याच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या कॅमेला हॅरिसपेक्षा रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची आशा बाळगत आहे. ट्रम्प यांनी किम यांच्याशी 2018-19 दरम्यान अण्वस्त्र मुद्द्यावर चर्चेसाठी उच्च-स्तरीय चर्चा केली होती.

दरम्यान, उत्तर कोरिया रशियाला शस्त्रे आणि सैनिक पुरवून युक्रेनमधील संघर्षातही सहभागी असल्याची गुप्तचर माहिती प्राप्त झाली आहे. अमेरिकेच्या एका अहवालानुसार, रशियामध्ये सुमारे 10,000 उत्तर कोरियन सैनिक युक्रेन सीमेवर तैनात असून, ते लवकरच संघर्षात सहभागी होऊ शकतात. तसेच दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी रशियाने उत्तर कोरियाच्या सैनिकांना माघारी पाठवावे, अन्यथा यामुळे जागतिक शांतता धोक्यात येऊ शकते, अशी मागणी केली.

हे देखील वाचा : ‘इथे’ लाखो करोडोच्या गाड्या रोडवर असेच सोडून जातात लोक; लॅम्बोर्गिनी, रोल्स रॉइसचाही समावेश

Web Title: North korea launches multiple short range missiles ahead of us polls

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2024 | 12:42 PM

Topics:  

  • North Korea
  • US election 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.