Oppenheimer WWIII warning : आज इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या अण्वस्त्रांच्या छायेतल्या संघर्षाचा उगम अनेक दशकांपूर्वी घडलेल्या एका ऐतिहासिक घटनेत आहे. त्या घटनेचा सूत्रधार होता रॉबर्ट ओपेनहायमर, अणुबॉम्बचा जनक. विज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणलेल्या या व्यक्तीनेच जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले, असा विश्वास आज अनेक राजकीय आणि लष्करी विश्लेषक व्यक्त करत आहेत.
१९४५ चा १६ जुलै. अमेरिकेच्या न्यू मेक्सिको प्रांतात पहिल्या अणुबॉम्बची चाचणी केली जात होती. त्यावेळी ओपेनहायमर एका सुरक्षित बंकरमध्ये उपस्थित होता. बॉम्ब फुटण्याच्या काही क्षणांपूर्वी त्याच्या मनात भीती, तणाव आणि गोंधळाचे भाव होते. मात्र स्फोटाच्या आवाजानंतर, त्याच्या चेहऱ्यावर वेगळीच शांतता उमटली. याच क्षणी त्याच्या मनात भगवद्गीतेतील प्रसिद्ध श्लोक उमटला “मी आता काळ आहे, जगाचा संहार करणारा”.
या स्फोटाने फक्त अणूयुगाची सुरुवात केली नाही, तर मानवतेच्या विनाशाची शक्यता उघड केली. ओपेनहायमरचे मित्र इसिडोर रबी यांनी त्याच्याबद्दल सांगितले की, स्फोटानंतर तो बदललेला दिसत होता चालण्याच्या पद्धतीत अहंकार होता, पण डोळ्यांत पश्चात्ताप स्पष्ट होता. चाचणीनंतर काही दिवसांतच ओपेनहायमर मनातून खचलेला होता. तो जपानी नागरिकांच्या दुर्दैवावर शोक करताना दिसला. त्याच्या सहकाऱ्यांनी मात्र युद्धातील यशाकडे पाहिले आणि बॉम्ब कसा अधिक प्रभावीपणे वापरता येईल यावर चर्चा सुरू ठेवली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इराणमध्ये 50 इस्रायली लढाऊ विमानांनी कहरच केला; IDFचा मोठा दावा, ‘Centrifuge production site’ नष्ट
हिरोशिमा आणि नागासाकीवर बॉम्ब टाकल्यानंतर, ओपेनहायमरची भूमिका अधिक स्पष्ट झाली. एकीकडे त्याने स्वतःला “शास्त्रज्ञ” म्हणून अण्वस्त्र निर्मितीसाठी जबाबदार ठरवले, तर दुसरीकडे त्याने ‘स्वतःचे हात रक्ताने माखले आहेत’ अशी कबुलीही दिली. ऑक्टोबर १९४५ मध्ये अमेरिकन अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत तो म्हणाला, “माझ्या हातावर रक्त आहे”. त्यानंतर ओपेनहायमरने अण्वस्त्रांच्या प्रसाराविरोधात आवाज उठवला. शस्त्र उद्योगाला त्याने “सैतानाचे काम” असे संबोधले. एकेकाळी वैज्ञानिक उद्दिष्टांनी झपाटलेला माणूस, युद्धाच्या वास्तवामुळे मानवीतेच्या गहिऱ्या विवंचनेत अडकला.
१९०४ मध्ये न्यू यॉर्कमध्ये जन्मलेला ओपेनहायमर एका संपन्न जर्मन-यहूदी कुटुंबातून आला होता. लहानपणापासून बुद्धिमान, कल्पक आणि साहित्य-संगीतप्रेमी असलेल्या या व्यक्तीने आपल्या बुद्धिमत्तेने अमेरिकेला अणुयुद्धात अग्रभागी नेले. पण त्याची ही कामगिरीच पुढे त्याच्या आत्म्याची जखम ठरली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIDEO VIRAL : इंडोनेशियात पुन्हा एकदा भयंकर ज्वालामुखीचा उद्रेक; ‘Mount Lewotobi Laki-Laki’मुळे 11 किमीपर्यंत हवेत राखेचे लोट
१९६७ मध्ये, केवळ ६२व्या वर्षी घशाच्या कर्करोगाने त्याचे निधन झाले. पण त्याने सुरू केलेले अणुयुग आजही संपलेले नाही. इस्रायल आणि इराण यांच्यातील आजचा संघर्ष, अण्वस्त्रांच्या आशंकेने पुन्हा एकदा जगाला हादरवत आहे. ओपेनहायमरने निर्माण केलेली विनाशाची बीजे आजही फुलत आहेत आणि संपूर्ण जग तिसऱ्या महायुद्धाच्या दाराशी उभे आहे. या पार्श्वभूमीवर, एक प्रश्न पुन्हा पुन्हा उभा राहतो. मानवतेच्या भल्यासाठी विज्ञान वापरले जात आहे की विनाशासाठी?