• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Israels 50 Jet Strike Stuns Iran Cyber Attack Confirmed

इराणमध्ये 50 इस्रायली लढाऊ विमानांनी कहरच केला; IDFचा मोठा दावा, ‘Centrifuge production site’ नष्ट

Israel Iran Conflict News Live : मध्यपूर्वेत आणखी एक धक्कादायक युद्धसत्र सुरू झाले असून इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावाने टोक गाठले आहे. वाचा नेमकी काय स्थिति झाली आहे ते.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 18, 2025 | 02:44 PM
Israel’s 50-jet strike stuns Iran cyber attack confirmed

इराणमध्ये ५० इस्रायली लढाऊ विमानांनी कहरच केला; IDFचा मोठा दावा, 'Centrifuge production site' नष्ट ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Israel Iran Conflict News Live : मध्यपूर्वेत आणखी एक धक्कादायक युद्धसत्र सुरू झाले असून इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावाने टोक गाठले आहे. इस्रायलने इराणमध्ये थेट हवाई आणि सायबर हल्ला करून एकप्रकारे युद्धसदृश स्थिती निर्माण केली आहे. इस्रायली संरक्षण दल (IDF) ने दावा केला आहे की, इराणच्या राजधानी तेहरानजवळील एका सेंट्रिफ्यूज उत्पादन केंद्रावर मोठा हवाई हल्ला करण्यात आला, आणि यामध्ये ५० पेक्षा अधिक लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला.

तेहरानमध्ये गोंधळाचे वातावरण; नागरिकांमध्ये भीती

या हल्ल्यांनंतर इराणमध्ये भयंकर घबराट निर्माण झाली आहे. राजधानी तेहरानमध्ये नागरिक शहर सोडून जाण्याचा प्रयत्न करत असून रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. स्थानिक माध्यमांच्या अहवालानुसार, लोकांनी मोठ्या प्रमाणावर आपत्कालीन सामान घेऊन शहराबाहेर काढता पाय घेतला आहे.

इस्रायली मंत्र्यांची तीव्र प्रतिक्रिया – “इराणी राजवटीचा अंत सुरू”

इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गालंट आणि मंत्री इस्रायल काट्झ यांनी या हल्ल्याची पुष्टी करत इराणविरोधात तीव्र भाषेत प्रतिक्रिया दिली आहे. काट्झ म्हणाले, “इराणी राजवटीचा अंत आता सुरू झाला आहे. तेहरानमध्ये वादळ उठले आहे आणि नागरिक मोठ्या संख्येने पळून जात आहेत. हुकूमशाहीची पडझड आता अटळ आहे.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Iran War : हायपरसोनिक युद्धात नवा अध्याय; इराणने आपल्या शस्त्रागारातून बाहेर काढले ‘हे’ सर्वात धोकादायक क्षेपणास्त्र

⭕️ The IDF struck a centrifuge production site and multiple weapon manufacturing facilities in the Tehran area, key elements of Iran’s nuclear weapons and missile programs. Over 50 IAF fighter jets targeted: – A facility for producing centrifuges used to enrich uranium beyond… pic.twitter.com/YXMiKAJWVz — Israel Defense Forces (@IDF) June 18, 2025

credit : social media

सायबर युद्धाचाही नवा अध्याय – इराण बँकेवर हल्ला

हवाई हल्ल्याबरोबरच, इस्रायलने इराणमध्ये सायबर हल्लाही चढवला आहे. इस्रायल समर्थित हॅकिंग गटाने इराणमधील एका प्रमुख बँकेवर सायबर हल्ला केला असून, आर्थिक व्यवहारात गडबड निर्माण केली गेली आहे. तांत्रिक माहिती उघड करण्यात आली नसली, तरी या हल्ल्यामुळे इराणची डिजिटल प्रणाली कोलमडल्याचे संकेत मिळत आहेत.

IDFचा दावा – “सेंट्रिफ्यूज उत्पादन केंद्र पूर्णतः नष्ट”

IDF च्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “तेहरान परिसरातील संवेदनशील सेंट्रिफ्यूज उत्पादन केंद्रावर अत्यंत अचूक हल्ला केला गेला असून, या मोहिमेत ५० हून अधिक लढाऊ विमानांनी विविध लक्ष्यांवर हल्ले चढवले.” हे उत्पादन केंद्र इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग मानले जात होते.

इराणकडून इस्रायली एजंट अटकेत; पुढचा हल्ला संभवतो

या हल्ल्यांनंतर इराणने इस्रायलच्या मोसाद गुप्तचर संस्थेच्या ५ एजंटना अटक केल्याची माहिती दिली आहे. स्थानिक वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, या एजंटांवर इराणची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर खराब करण्याचा आणि सायबर माध्यमांतून देशद्रोही माहिती प्रसारित करण्याचा आरोप आहे.

यासोबतच, इराणने इस्रायलला पुन्हा एकदा कठोर इशारा दिला आहे. तेहरान सरकारने अधिकृत निवेदनात सांगितले की, “इस्रायलने युद्धाच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. या हल्ल्याची कठोर किंमत मोजावी लागेल. आमचे प्रत्युत्तर भीषण असेल.” तसेच इराणने तेल अवीवमधील नागरिकांना शहर सोडण्याचा सल्लाही दिला आहे, जो संभाव्य प्रतिहल्ल्याची शक्यता अधिक स्पष्ट करतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Israel War : इस्रायलसाठी अमेरिका घेणार युद्धात उडी; इराणचे अणुतळ उद्ध्वस्त करण्याची कुटील योजना

 मध्यपूर्वेत नव्या युद्धाची चाहूल

या घटनांनी मध्यपूर्वेतील तणावाला नवे टोक गाठवले आहे. एकीकडे इस्रायलच्या आक्रमक धोरणामुळे इराणमध्ये अस्थिरता वाढली असून, दुसरीकडे इराणचे पलटवाराचे संकेत चिंता निर्माण करत आहेत. सेंट्रिफ्यूज उत्पादन केंद्राचा नाश, सायबर हल्ला आणि पाच एजंटांची अटक या सर्व घटनांनी येत्या काळात दोन्ही देशांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जगभरातील महासत्तांचे लक्ष आता या संघर्षाकडे वळले असून, याचे संभाव्य जागतिक परिणाम गहिरे असू शकतात.

Web Title: Israels 50 jet strike stuns iran cyber attack confirmed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 02:42 PM

Topics:  

  • international news
  • Iran Israel Conflict
  • Iran-Israel War

संबंधित बातम्या

US-Venezuela Tension: अमेरिकेची लढाऊ विमानं व युद्धनौका तैनात; व्हेनेझुएलासाठी पुढचे २४ तास तणावाचे
1

US-Venezuela Tension: अमेरिकेची लढाऊ विमानं व युद्धनौका तैनात; व्हेनेझुएलासाठी पुढचे २४ तास तणावाचे

World’s Most Unhappy Country : रडगाणं…दुःख अन् वेदना; जगातील ‘हे’ देश आहेत सर्वात जास्त दुःखी
2

World’s Most Unhappy Country : रडगाणं…दुःख अन् वेदना; जगातील ‘हे’ देश आहेत सर्वात जास्त दुःखी

Shutdown in France: अमेरिकेनंतर आता फ्रान्समध्येही शटडाऊन; नेमकी काय आहेत कारणे?
3

Shutdown in France: अमेरिकेनंतर आता फ्रान्समध्येही शटडाऊन; नेमकी काय आहेत कारणे?

Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता
4

Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता

ताज्या बातम्या

पुढे वाचा
संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.