हिमनद्या वितळल्याने पॅसिफिक महासागराच्या पातळीत वाढ
जिनिव्हा: ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान सातत्याने वाढत चालले आहे . यामुळे पृथ्वीवर उष्णता वाढत आहे. अनेक समस्या उत्पन्न होऊ लागल्या आहेत. त्यामुळे हिमनद्या वितळत आहेत आणि महासागरांच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ होत आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान संघटनेने मंगळवारी एक आहवाल जारी केला. या अहवालानुलार प्रशांत महासागराच्या पाण्याची पातळी जागतिक सरासरीपेक्षा जास्त वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सखल भाग असलेल्या बेटांच्या देशांचा मोठा भाग पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे.
उत्तर आणि पूर्वेकडील महासागरात जास्त समुद्र पातळीत जास्त वाढ
जागतिक हवामान संघटनेच्या अहवालानुसार, ऑस्ट्रेलियाच्या उत्तर आणि पूर्वेकडील पॅसिफिक महासागर क्षेत्रातील दोन मापन क्षेत्रांमध्ये सरासरी वार्षिक वाढ लक्षणीयरीत्या जास्त प्रमाणात आहे. गेल्या तीन दशकांत ही जागतिक वाढ प्रतिवर्षी ३.४ मिलिमीटर होती. जागतिक हवामान संघटनेचे संचालक सेलेस्टे साऊलो यांनी प्रादेशिक हवामान अहवाल 2023 लाँच करताना एक निवेदन जारी केले. या निवेदनात म्हटले आहे की, “मानवी क्रियाकलापांमुळे महासागरांची आम्हाला टिकवून ठेवण्याची आणि संरक्षण करण्याची क्षमता कमकुवत झाली आहे. तसेच या बदलांमुळे जागतिक तापनात अधिकाधिक वाढ झाली आहे. जे पृथ्वी सजीवांसाठी असुरक्षित मानले जात आहे.
हवामान बदलामुळे पुराच्या घटना वाढ होण्याची शक्यता
शास्त्रज्ञांच्या मते, महासागरांची पातळी 1980 पासून वाढण्यास सुरूवात झाली. यामुळे कुक आयलंड आणि फ्रेंच पॉलिनेशियासारख्या बेटांवर पूराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. उष्णकटिबंधीय चक्रीवादळांमुळे यांसारख्या घटना कधीकधी घडतात. समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात वाढ होत असल्याने हवामान बदलामुळे या घटनांची तीव्रताही वाढू शक्यता शास्त्राज्ञांनी वर्तवली आहे.
मागील वर्षी 2023 मध्ये WMO ने एक अहवाल जारी केला होता. या अहवालानुसार 2023 मध्ये पॅसिफिक प्रदेशात वादळ आणि पूराच्या 34 हून अधिक घटना घडल्या होत्या. परिणामी यामध्ये 200 हून अधिक लोकांचा मृत्यू यादरम्यान झाला. जागतिक हवामान संघटनेचे संचालकांनी म्हटले की, पॅसिफिक महासागरातील बेटांवर वाढत्या पाण्याच्या पातळीचा परिणाम अत्यंत तीव्र असेल, कारण त्यांची सरासरी उंची समुद्रसपाटीपासून फक्त एक किंवा दोन मीटर आहे.