Pakistan becomes the President of the United Nations Security Council
एक मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानला एका महिन्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) अध्यक्षपदी निवड झाली आहे. यापूर्वी देखील पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांच्या तात्पुरता सदस्य म्हणून मान्यता मिळाली होती. अशातच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी पाकिस्तानची निवड झाल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. यापूर्वी पाकिस्तानने सात वेळा सुरक्षा परिषदेत अध्यक्षपदाचे स्थान भुषवले आहे. हा पाकिस्तानचा संयुक्त राष्ट्रातील आठवा कार्यकाळ आहे. तसेच पाकिस्तानच्या तात्पुरत्या सदस्यत्वाचा कार्यकाळ 2026 मध्ये संपेल.
1 जुलै 2025 पासून पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा एक महिन्यासाठी अध्यक्ष राहिल. याव्यतिरिक्त पाकिस्तानकडे संयुक्त राष्ट्र परिषदेत दोन समित्या आहे. यामध्ये पहिली समिती 1988 मध्ये स्थापन करण्यात आली आहे. तालिबान प्रतिबंध समिती असे याचे नाव आहे. तसेच 1373 मध्ये पाकिस्तानकडे अतिरेकविरोधी समितीचे उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. ही समिती दहशतवाद्यांवर निर्बंध लादण्याचे काम करते. मात्र दहशतवादावा पाठिंबा देणाऱ्या देशाची या सिमितीच्या उपाध्यपदी निवड झाली आहे. यामुळे संयुक्त राष्ट्रावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
संयुक्त राष्ट्रांमध्ये अस्थायी सदस्य असलेल्या राष्ट्रांना अशा पदांवर नियुक्त केले जाते. यावेळी पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आशिया-आफ्रिका गटाच्या दोन जांगापैकी एका जागी निवडून आला आह. यामुळे पाकिस्तानला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी स्थान मिळाले आहे. चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटने आणि अमेरिका हे देश संयुक्त राष्ट्राचे कायमस्वरुपी सदस्य आहेत. तर भारत, पाकिस्तान हे देश याचे अस्थायी सदस्य आहेत. यासाठी पाकिस्तानने कोणत्याही कुटनीतीचा अवलंब केलेला नाही.
सध्या पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितींमध्ये आपली भूमिका बजावेल परंतु ही भारतासाठी धोक्याची बाब नसल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तानला आता १ जुलै २०२५ पासून ते ३१ जूलै २०२५ पर्यंत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा एक महिन्यांसाठी अध्यक्ष राहिल. यावेळी पाकिस्तान १३७३ च्या दहशतवाद विरोधी समितीचे कामकाज राहिल. मात्र पाकिस्तान संयुक्त राष्ट्राचा कायमस्वरुपी सदस्य नसल्यामुळे त्याला कोणतेही विशेष अधिकार नाहीत. यामुळे पाकिस्तानला भारताच्या हितसंबंधांना हानी पोहोचवता येणार नाही.
पाकिस्तानने गेल्या अनेक काळापासून जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठ खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानने अनेक वेळा संयुक्त राष्ट्रांच्या भूमिकांचा गैरवापर केला आहे. यामुळे पाकिस्तानना पुन्हा भारताविरोधी प्रपोगंडा वापरु शकतो. परंतु जागतिक स्तरावर आणि संयुक्त राष्ट्रांत भारताची भूमिका अत्यंत बळकट आहे. तसेच संयुक्त राष्ट्रात चीन सोडला तर इतर देश भारताचे मित्र आहेत. या देशांनी नेहमीच भारताची साथ दिली आहे. यामुळे पाकिस्तान भारताच्या हितसंबंधांना जास्त नुकसान पोहचवू शकणार नाही.
मात्र सध्या पाकिस्तानला मिळालेल्या अध्यक्षपदामुळे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिशषदेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशाला पद मिळणे संयुक्त राष्ट्रांवरील भारताची विश्वासहार्यता कमी करत आहे.