ह्यूमनॉइड रोबोट्सची फुटबॉल स्पर्धा(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
First AI Football Match : बिजिंग : अलीकडच्या अत्याधुनिक जगात एआमुळे अनेक आश्चर्यचकित करणाऱ्या घटना पाहायला मिळत आहे. अलीकडेच चीनने या एआय तंत्रज्ञाच्या मदतीने रोबोट्सच्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये मानवाऐवजी रोबोट्स मैदानात उतरले होते.
चीनच्या बिजिंगमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.काळ्या आणि जांभळ्या रंगाच्या मानवी रोबोट्समध्ये ही स्पर्धा होती. या रोबोट्सला जर्सी घालून मैदानात उतरवण्यात आले होते.हे ह्यूमनाईड रोबोट्स बॉलला किक मारुन गोल करत होते, तसेच खेळताना पडत देखील होते. या रोबोट्सला एआय तंत्रज्ञाच्या मदतीने नियंत्रित केले जात होते. सध्या या स्पर्धेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा सामना दोन भागांत खेळवला गेला होता. यामध्ये चार संघ उतरवण्यात आले होते. चारही संघांनी 10 मिनीटांचा सामना खेळला ऑगस्टमध्ये बिजिंगमध्ये जागतिक ह्यूमनॉईड रोबोट्स स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या पूर्वतायारीसाठी या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.हा पूर्ण सामान एआय तंत्रज्ञानाद्वारे चावल्या जाणाऱ्या रोबोट्सने खेळला होता. या सामान्याचा उद्देश रोबोट्सची निर्णय घेण्याची क्षमता तपासणे, त्याची चपळता आणि संतुलनाची क्षमता पाहणे होता.
या सामान्यामध्ये गोल केल्यानंतर, गोल वाचवल्यानंतर रोबोट्स अगदी मानवासारखे आनंदी होताना दिसले. जसे एखाद्या मानवी सामन्यात गोल केल्यावर खेळाडू आनंदाने हवेत उडी मारतो, आपल्या खेळाडून मित्रांना मिठी मारतो अगदी तसेच हे रोबोट्स करत होते. भविष्यात हे मानवी आकाराचे ह्यूमनॉईड रोबोट्सचे अधिकाधिक खेळ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील चीनमध्ये रोबोट्सची बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
What you are seeing now at the World Robot Soccer Competition is Booster T1 – Tsinghua Vulcan leads 4:0 🦾🤖🦿⚽️
This humanoid robot can kick, dribble, plan, make decisions, cooperate and shoot completely autonomously. pic.twitter.com/FKn4BkzgiA
— CyberRobo (@CyberRobooo) June 29, 2025
हे एआय रोबोट्स बूस्टर रोबोटिक्स कंपनीने तयार केलेले आहे. कंपनीच्या सीईओंच्या मते, ह्युमनॉइड़ रोबोट्सची चाचणी घेण्यासाठी, त्यांच्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये योग्य संतुलनासाठी ही स्पर्धा उपयोगी ठरत आहे. या सामन्यामुळे रोबोट्सवर एआयच्या मदतीने मानवी नियंत्रण कितपत ठेवता येईल हे पाहणे महत्त्वाचे आहे. सध्या या मनोरंजक सामन्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
‘पैगंबर मुहम्मद यांच्या व्यंगचित्रावरुन पेटला वाद’ ; मुस्लिम समाज आक्रमक ४ जणांना अटक