Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुढच्या सात दिवसात होणार पाकिस्तानचा खेळ खल्लास! पाकिस्तानी वंशाचे अमेरिकन व्यवसायीकाने का म्हण्टलं असं? देशाकडे फक्त तीन आठवड्यांचा पैसा शिल्लक

पाकिस्तान पुढील सात दिवसांत अधिक पेट्रोलियम उत्पादने खरेदी करू शकणार नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे. असं साजिद तरार यांनी म्हण्टलं आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 24, 2023 | 10:55 AM
पुढच्या सात दिवसात होणार पाकिस्तानचा खेळ खल्लास! पाकिस्तानी वंशाचे अमेरिकन व्यवसायीकाने का म्हण्टलं असं? देशाकडे फक्त तीन आठवड्यांचा पैसा शिल्लक
Follow Us
Close
Follow Us:

पाकीस्तान :  पाकीस्तानमधील (pakistan financial crisis) परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे. 1947 मध्ये भारतापासून वेगळे झालेला पाकिस्तान आज पूर्णपणे विघटनाच्या मार्गावर आहे. भीषण आर्थिक संकटाने वेढलेल्या या देशाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. आपला देश लवकरच श्रीलंकेसारखा (Shrilanka) गरीब होईल अशी भीती आता  व्यक्त करण्यात येत आहे. अलीकडे समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडे  परकीय चलनाच्या साठ्यात फक्त $4.3 अब्ज शिल्लक आहेत, म्हणजेच देशात फक्त तीन आठवड्यांचा पैसा शिल्लक आहे.   या देशाचा खेळ अवघ्या सात दिवसांत संपणार आहे. असं म्हण्टलंय अमेरिकेत स्थायिक झालेले पाकिस्तान वशांचे साजिद तरार यांनी. 

काय म्हणाले साजिद तरार

साजिद तरार यांनी ट्विट करत म्हण्टलंय की, ‘पाकिस्तान पुढील सात दिवसांत अधिक पेट्रोलियम उत्पादने खरेदी करू शकणार नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशाने आता पाकिस्तानचा खेळ संपेल. श्रीलंकेत जसे घडले तसेच सर्व काही घडणार आहे. 

कोण आहेत साजिद तरार

सध्या अमेरिकन असलेले साजिज तररा मुळच्या पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मंडी बहाउद्दीनचे रहिवासी आहेत.  साजिद हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे समर्थक आहे. साजिद आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेत गेले आणि नंतर इथेच स्थायिक झाले. ते अनेकदा पाकिस्तान सरकारच्या धोरणांवर टीका करतात आणि त्या धोरणांमुळेच आज देशाची ही स्थिती आहे असे त्यांचे मत आहे.

Its an unfortunate reality that if Pakistan is not able to buy more petroleum products within the next 7 days. The game is over. Everything will come down like Sri lank. Dual citizens are still busy looting, and the nation is sleeping. — Sajid N. Tarar (@sajidtarar) January 23, 2023

पाकिस्तानात परिस्थिती गंभीर

6 जानेवारीच्या एका अहवालात असे म्हटले होते की देशाचा चलन साठा दशकानंतर सर्वात कमी पातळीवर आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचे मूल्य 20 टक्क्यांनी घसरले आहे. पाकिस्तान सरकार लवकरच मिनी बजेट सादर करणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) उपस्थित केलेल्या चिंतेचा या अर्थसंकल्पात उल्लेख केला जाईल. या चिंतेमुळेच पाकिस्तानला बेलआउट पॅकेज मिळत नाही. या अटींची पूर्तता झाल्यावरच बेलआउट पॅकेज मिळू शकेल, असे आयएमएफचे म्हणणे आहे.

 अधिक समस्या वाढतील 

पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार, आयएमएफच्या अटी लागू केल्यास सर्वसामान्यांच्या अडचणी दुपटीने वाढतील, असे बहुतांश लोकांचे मत आहे. त्यांच्या मते, आयएमएफच्या प्रस्तावानंतर देशातील महागाई आणखी वाढेल. आधीच व्याजदर गगनाला भिडले आहेत आणि महागाई नियंत्रणाबाहेर आहे. युक्रेनमधील युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा वेग मंदावण्याबरोबरच दैनंदिन वस्तूही महाग झाल्या आहेत. डॉनच्या वृत्तानुसार, सरकारने आधीच विजेच्या दरात 30 टक्के आणि गॅसच्या किमती 60 ते 70 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय नवीन कर दरही लागू केले जाऊ शकतात. यासोबतच व्याजदरात आणखी वाढ करण्याचीही तयारी सुरू आहे.

Web Title: Pakistani american businessman sajid tarar says it an end game for pakistan in few days as they have less money nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2023 | 10:45 AM

Topics:  

  • pakistan
  • Pakistan Financial Crisis

संबंधित बातम्या

IND vs PAK: २०२६ मध्ये पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! ‘या’ दिवशी येणार आमनेसामने
1

IND vs PAK: २०२६ मध्ये पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! ‘या’ दिवशी येणार आमनेसामने

India Diplomacy : पाकिस्तानची उलटी गिनती सुरू! ट्रम्प आता भारताच्या प्रेमात; 2026 मध्ये बदलणार जगाचा नकाशा
2

India Diplomacy : पाकिस्तानची उलटी गिनती सुरू! ट्रम्प आता भारताच्या प्रेमात; 2026 मध्ये बदलणार जगाचा नकाशा

जय हिंद! पाकिस्तानचा कुरापत काढण्याचा प्रयत्न; Indian Army ने दाखवला इंगा, थेट…
3

जय हिंद! पाकिस्तानचा कुरापत काढण्याचा प्रयत्न; Indian Army ने दाखवला इंगा, थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.