Peace Talks : अमेरिकेसाठी धोक्याची घंटा? चीन इराणला गुपचूप पुरवतोय घातक शस्त्र, शांतता बैठकीपूर्वी मोठा खुलासा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया )
अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी दावा केला आहे की, चीन इराणला (China) अत्याधुनिक हावई संरक्षण प्राणी पुरवण्याच्या तयारीत आहे. येत्या काही दिवसांत इराणला एक मोठी खेप मिळण्याची शक्यता आहे. यामुळे पश्चिम आशियातील तणावा वेगळे स्वरुप मिळण्याची भीती तज्ज्ञांनी वर्तवली आहे. विशेष म्हणजे हा खुलासा अशा वेळी करण्यात आला आहे जेव्हा चीनने इराणला वाटाघाटी चर्चेच्या टेबलावर आणल्याचा दावा केला जात होता.
मात्र आता इराण(Iran) ला तिसऱ्या देशामार्फत शस्त्रास्त्रे पुरवली जात आहेत. यामुळे चीनच्या दुटप्पी धोरणावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. यामुळे अमेरिकेचीही चिंता वाढली आहे. चीन इराणला मॅनपॅड्स म्हणजे खांद्यावरुन डागता येणारी क्षेपणास्त्रे देखील पुरवत असल्याचे अमेरिकन गुप्तचर संस्थांनी म्हटले आहे. कमी उंचीवरुन उडणाऱ्या विमानांसाठी ही प्रणाली घातक ठरु शकते. अलीकडे इराणने अमेरिकेचे F-15 फाटर जेट अशा प्रकारच्या हीट-सीकिंग मिसाइलने पाडल्याचा दावा केला होता. चीनने इराणला प्रगत शस्त्रे पुरवली तर अमेरिकेच्या सैन्यासमोर मोठी आव्हाने उभी राहू शकतात.
परंतु वॉशिंग्टन येथील चीनच्या दूतावासाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. चीनने या संघर्षात कोणत्याही देशाला शस्त्र पुरवली नाहीत. अमेरिकेने कोणत्याही पुरव्याशिवाय अफाव पसरवणे थांबवावे असे दूतावासाने स्पष्ट केले आहे.
सध्या या नव्या खुलाशामुळे मध्यपूर्वेतील तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. चीन इराणला शस्त्र पुरवत असल्यास अमेरिकेसाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे अमेरिका स्वसंरक्षणासाठी इराणवर लष्करी कारवाईचा पर्याय अवलंबू शकतो. हा शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना मोठा धोका मानला जात आहे.






