पंतप्रधान मोदींनी नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याशी साधला संवाद; ट्विट करून म्हटले...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याशी संवाद साधला. यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी शांतता आणि स्थैर्य राखण्याच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याचे पुन्हा एकदा सांगितले. याबाबतची माहिती पंतप्रधान मोदींनी ट्विटवरून दिली. तसेच नेपाळमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शोकही व्यक्त केला.
पंतप्रधान मोदींनी ट्विट करत म्हटले की, ‘नेपाळच्या अंतरिम सरकारच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याशी संवाद साधला. अलिकडच्या काळात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. आता शांतता आणि स्थैर्य टिकवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना भारताचा दृढ पाठिंबा असल्याचे पुन्हा सांगितले. उद्याच्या राष्ट्रीय दिनानिमित्त मी त्यांना आणि नेपाळच्या जनतेला माझ्या शुभेच्छा देतो’, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
Had a warm conversation with Mrs. Sushila Karki, Prime Minister of the Interim Government of Nepal. Conveyed heartfelt condolences on the recent tragic loss of lives and reaffirmed India’s steadfast support for her efforts to restore peace and stability. Also, I extended warm…
— Narendra Modi (@narendramodi) September 18, 2025
दरम्यान, नेपाळमध्ये सध्या राजकीय घडामोडी वाऱ्याच्या वेगाने घडताना दिसत आहेत. अवघ्या काही दिवसांत पंतप्रधानपद, मंत्रिमंडळ आणि रस्त्यावरचे आंदोलन या सर्वच गोष्टींनी नेपाळच्या लोकशाहीला मोठा धक्का दिला आहे. सुशीला कार्की यांनी अंतरिम पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि केवळ तीन दिवसांतच त्यांच्या विरोधात जनरेशन-झेड रस्त्यावर उतरले.
हेदेखील वाचा : ‘Right… Mrs सुशीला कार्की…; PM मोदींनी नावाआधी वापरलेल्या या शब्दाचा अर्थ तरी काय?
15 सप्टेंबरला आंदोलकांकडून जोरदार निदर्शने
सोमवारी (१५ सप्टेंबर) राजधानी काठमांडूमध्ये कार्की यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर जोरदार निदर्शने झाली. हम नेपाली संघटनेचे प्रमुख सुदान गुरुंग यांच्या नेतृत्वाखाली तरुणांनी घोषणाबाजी केली “सुशीला कार्की मुर्दाबाद”. निदर्शकांचे म्हणणे असे होते की, पंतप्रधानपदी आल्यानंतर कार्की यांनी आपले विचार वचनाप्रमाणे टिकवले नाहीत. ज्यांनी त्यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला, त्यांच्याच मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले.
घडामोडींमध्ये होता अमेरिकेचा हात?
नेपाळ हा हिमालयाच्या कुशीतला एक लहानसा पण धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा देश. शेजारी भारत आणि चीन या दोन महासत्तांच्या सावलीत असलेला हा देश नेहमीच जागतिक राजकारणाचा भाग राहिला आहे. परंतु, अलीकडच्या काळात झालेल्या सत्तापालटामुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. या सगळ्यामागे अमेरिकेचा काही अजेंडा असल्यााच अंदाज आता व्यक्त केला जात आहे.
हेदेखील वाचा : Gen-Z protest : नेपाळचे संपूर्ण राजकारण अवघ्या 3 दिवसांत बदलले; सुशीला कार्की यांच्या विरोधात Gen-Z मैदानात उतरले