
PM Modi Ethiopia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळाला इथिओपियाचा सर्वोच्च सन्मान; म्हणाले, 'माझ्यासाठी...'
आदिस : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या इथिओपियाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान इथिओपियाने पंतप्रधान मोदींना सर्वोच्च सन्मान इथिओपियाचा ‘ग्रेट ऑनर निशाण’ देऊन सन्मानित केले. इथिओपियाने पंतप्रधान मोदींना सन्मानित करताना जुन्या परंपरा मोडत मोदींना गौरविले आहे.
पंतप्रधान मोदी हे इथिओपियाचा सर्वोच्च सन्मान, इथिओपियाचा ‘ग्रेट ऑनर निशाण’ने सन्मानित झालेले पहिले परदेशी राष्ट्रप्रमुख आहेत. हा सर्वोच्च सन्मान मिळवणारा भारत जगातील २५ वा देश आहे. मोदींपूर्वी कोणत्याही भारतीय पंतप्रधानांना इतके सर्वोच्च सन्मान मिळालेले नाहीत. आदिस आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात आयोजित एका विशेष समारंभात पंतप्रधान मोदींना हा सन्मान प्रदान करण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाने नवी दिल्लीत जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत-इथिओपिया भागीदारी मजबूत करण्यासाठी त्यांच्या अपवादात्मक योगदानासाठी आणि जागतिक राजकारणी म्हणून त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वासाठी पंतप्रधानांना सन्मानित करण्यात आले आहे.
हेदेखील वाचा : India Jordan At 75: PM Modi यांचा जॉर्डन दौरा आहे एक बुद्धिबळाची चाल; इतर कोणत्याही अरब देशाकडे नाहीये ‘अशी’ अद्वितीय ढाल
सन्मानित होताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण असून, एक भाग्यवान आहे’. दरम्यान, जॉर्डनचा दौरा पूर्ण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी इथिओपियात पोहोचले. या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांच्याशी भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी इथिओपियाचे पंतप्रधान अहमद अली यांना आपला बंधू-मित्र म्हटले आहे.
इथिओपियाच्या भूमीत असणे एक भाग्य
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘इथिओपियाच्या या महान भूमीत तुम्हा सर्वांमध्ये असणे हा एक भाग्याचा क्षण आहे. मी दुपारी इथिओपियाला पोहोचलो. आगमनानंतर, मला येथील लोकांमध्ये असलेला उत्साह आणि आपुलकीचा अनुभव आला. पंतप्रधान अली यांनी विमानतळावर माझे स्वागत केले आणि मला फ्रेंडशिप पार्क आणि सायन्स म्युझियममध्ये नेले. या ठिकाणी आमच्यात अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर चर्चा झाली.
इथिओपियाला भेट देऊन मला खूप आनंद
इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदी म्हणाले, “इथिओपियाला भेट देऊन मला खूप आनंद होत आहे. ही माझी इथिओपियाची पहिली भेट आहे. पण मी येथे पाऊल ठेवताच, मला आपलेपणा आणि आत्मीयतेची भावना जाणवली.”